साठेकरार आणि खरेदीखत या दोन्हीमध्ये काय फरक आहे ? त्यांचा वापर कधी आणि का करतात याबद्दल थोडक्यात आणि महत्वाची माहिती !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

साठे करार व खरेदीखत हा शब्द किंवा हा करार आपल्यापैकी अनेकांनी ऐकले असतील, बघितले असतील किंवा हे शब्द जरी काना वरून निश्चित पणे गेले असतील. ज्या विविध प्रकारचे करार विविध जमिनी संदर्भात करण्यात येतात त्यापैकी साठे करार आणि खरेदीखत हे दोन करार सगळ्यात जास्त प्रमाणात करण्यात येतात.

म्हणूनच साठे करार आणि खरेदीखत हे दोन्ही करारातील माहिती आणि ह्या दोन्ही करारातील फरक हे आपल्याला माहिती असणे फार आवश्यक आहे. आता पहिला होता तो साठे करार आणि दुसरा होता तो खरेदीखत आता या दोहनी मधील मुलभुत फरक काय आहे.

साठे करार व खरेदीखत यातील मुलभुत फरक: तर सगळ्यात पहिल्यांदा जो मुद्दा येतो. तो 1)मालमत्ता किंवा मालकी हस्तान्तरणाचा: i)तर साठेकरार ने मालकी हस्तान्तरण होते का ? तर होत नाही. साठे करार हा कोणत्याही दोन व्यक्ती मध्ये एखाद्या मालमत्तेमध्ये करण्यात येतो.

तेव्हा त्याच अग्रीमेन्ट टू सेल किंवा अग्रीमेन्ट टू अग्री या स्वरुपाचा तो करार असतो. म्हणजे त्या दोन्ही पक्ष्यांमध्ये काहीतरी ठरलेल आहे, आणि त्याची अंमलबजावणी भविष्यात होईल, या संदर्भात तो साठेकरार असतो. साहजिकच साठे करारानी कोणत्याही मालमत्तेची मालकी हि एका व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्ती कडे हस्तान्तरित होत नाही.

ii)मात्र खरेदी खताचा जेव्हा आपण विचार करतो.तेव्हा खरेदीखताने मात्र एखाद्या मालमत्तेची जी मालकी आहे, ती एका व्यक्ती कडून दुसऱ्या व्यक्ती कडे हस्तान्तरित होत असते. आता हे करायची कारण काय असतात, म्हणजे साठे करार करण्याची तर पाहिलं व्यवहारिक कारण असू शकत.

2)व्यवहारिक कारण : i)म्हणजे एखाद्या मालमत्तेचा व्यवहार हा शंभर रुपयाचा ठरलेला आहे आणि तो जर टप्या टप्याने जर होणार आहे तर तो टप्या टप्याने होण्या करिता आधी तो साठे करार केला जातो. जेणेकरून विकणारा आणि खरेदी करणारा ह्या दोघांच्या आणि त्या व्यवहाराला एक कायदेशीर स्वरूप येईल. दोघांच्याही कायदेशीर हक्कांना पुरेसे संरक्षण मिळेल, आणि जेव्हा तो व्यवहार पूर्ण होतो तेव्हा मग त्याच खरेदीखत करण्यात येत.

ii)म्हणजे उदाहरणार्थ शंभर रुपयाचा व्यवहार ठरला. पन्नास रुपयाचा व्यवहार करताना साठे करार ठरला आणि उरलेला पन्नास रुपयाचा व्यवहार करताना  खरेदीखत करायला होतो म्हणजे जेव्हा पन्नास रुपयाचा साठे करार झाला तेव्हा मालकी हस्तान्तरण झाले नाही. तर उरलेला हा सगळा व्यवहार पूर्ण झाल्या नंतर त्याची मालकी हस्तान्तरित होते.

3) तिसरे मुख्य कारण – सत्ताप्रकार: आता आपल्या सगळ्यांना कल्पना आहे कि आपल्या महाराष्ट्रा मध्ये जमिनिचे मुख्यत: दोन कायदेशीर प्रकार आहेत. 1)नियंत्रित सत्ता प्रकार 2)अनियंत्रित सत्ता प्रकार.  i)आता अनियंत्रित सत्ता प्रकाराची जर जमीन असेल आणि त्याचा व्यवहार जर पूर्ण होत असेल, तर त्याच थेट खरेदीखत होऊ शकत त्याला कोणाच्याही कोणत्याही पूर्व परवानगीची वैगेरे अजिबात आवश्यकता नसते.

ii)मात्र जर नियंत्रित सत्ता प्रकार असेल तर अश्या मालमत्ते संदर्भात थेट हस्तान्तरण किंवा खरेदी विक्री करता येत नाही. त्या अगोदर कोणाची तरी कुठल्या तरी कार्यालयाची किंवा अधिकाऱ्याची पूर्व परवानगी आवश्यक असते व त्याच्या करिता काय करतात, आधी साठेकरार करण्यात येतो.

नंतर ती पूर्व परवानगी घेण्यात येते. आणि मग खरेदी खत करण्यात येत. म्हणजेच जर एखादी मालमत्ता जर नियंत्रित सत्ता प्रकाराची असेल तर कोणत्याही परिस्थितीत मग तुमचा व्यवहार पूर्ण हो किंवा नाही हो, उभय पक्ष तयार असोत किंवा नसोत त्या मालमत्तेच  हस्तान्तरण थेट होण हे केवळ अशक्य असत.

आणि मग ती कारवाही पूर्ण होईपर्यंत, खरेदी करणारा आणि विकणारा ह्या दोघांनी काहीतरी नोंदणीकृत अधिकृत करार करता यावा म्हणून मग एक साठेकरार करण्यात येतो. साठेकरार केल्या नंतर ती जी काही नियंत्रित सत्ता प्रकाराची जी काही पूर्तता असेल. ती पूर्तता करून त्याची परवानगी घ्यावी लागते. आणि ती एकदा काय परवानगी घेतली मग त्याच खरेदी खत करण्यात येत.

आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न असतो. 4)तो म्हणजे जर वाद उद्भवला या दोन्ही संदर्भात तर काय होत. आता एक लक्ष्यात घेतलं पाहिजे, कि आपण पाहिलं साठेकरार आणि खरेदीखत याचा सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय आहे तर मालकी हस्तान्तराचा. i)साठेकरार आणि मालकी हस्तान्तरण होत नाही. तर खरेदीखताने मालकी हस्तान्तरण होत असत. साहजिकच साठेकरारा मध्ये वाद निर्माण होतो. तेव्हा ज्याची मुळ मालकी आहे, त्याची मालकी गेलेली नसल्याने त्याचे पारडे थोडेसे जड असते.

ii)मात्र असाच वाद जर खरेदीखतामध्ये निर्माण झाल्यास तर एकदा खरेदीखताची नोंदणी झाली तर मग महसूल दफ्तरात त्याची नोंद हो किंवा न हो कायदेशीर दृष्ट्या त्याच हस्तान्तरण झालेल असत. साहजिकच अश्या परिस्थितीत जर वाद उद्द्भवला तर मुळ जमीन मुळ मालक जो आहे त्याच्या पेक्षा खरेदी करण्याऱ्याच पारड हे निश्चितपणे जड असत.

आणि अश्या वेळेला जमिन मालकाला किंवा मुळ मालकाला हि लढाई काहीशी कठीण असते. आता साठेकरार आणि खरेदीखत ह्या दोन्ही मधले हे महत्वाचे मुद्दे लक्ष्यात घेतले, कि आपण आपल्या परिस्थिती नुसार किंवा आपल्या व्यवहारा नुसार कोणता करार करावा.

हे आपण निश्चित करू शकतो जर आपला व्यवहार जर पूर्ण होत असेल तर खरेदीखत करायला काही हरकत नाही. पण जर आपला व्यवहार टप्या टप्याने होत असेल. तर जो वर तुम्हांला शेवटचा टप्पा जो काही असेल दहा टक्के, वीस टक्के , पन्नास टक्के मिळत नाही.

तो वर खरेदी खत करू नये कारण समजा जर खरेदीखत झालं आणि पुढचे पैसे नाही आले जर तुमची मालकी कायदेशीर दृष्ट्या हस्तान्तरित झालेली असते आणि त्यामुळे अश्या परिस्थित ती रक्कम परत मिळवण किंवा त्या जमिनिची मालकी परत मिळवण ते खरेदीखत रद्द बातल करण हि काहीशी असमान आणि कठीण लढाई असते.

म्हणून आपण जेव्हा आपण आपल्या मालमत्तेचा व्यवहार करत असतो तेव्हा त्या मालमत्तेच स्वरूप ते नियंत्रित असत किंवा अनियंत्रित, आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला व्यवहार हा टप्या टप्याने होणार आहेत का वन स्ट्रोक होणार आहे. जर वन स्ट्रोक होणार असेल तर आपण खरेदीखत करू शकतो.

पण जर टप्या टप्याने होणार असेल तर आधी साठेकरार करावा.आणि मग शेवटच्या टप्प्याचे जर पैसे मिळाले तर आपण खरेदीखत कराव. जेणेकरून आपल्या हक्कांवर विपरीत परिणाम येणार नाही. आणि जर वाद उद्दभवला तर आपल पारड काहीस जड असेल. तर आज आपण साठेकरार आणि खरेदीखत या बद्दल थोडक्यात आणि महत्वाची माहिती घेतली आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.