म’हावितरण देणार शे’तकऱ्यांना 30 ह’जार रुपये प्रती एकर ।। कृषी वाहिनी योजना काय आहे? पात्रता काय? लाभ काय? अर्ज कसा करावा? ही संपूर्ण माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शेती

नमस्कार मित्रांनो, म’हाराष्ट्र शा’सनाने महावितरण तर्फे सौर कृषी वाहिनी योजना सुरू केली आहे, तर या योजनेअंतर्गत शेतकरी असतील, ग्रामपंचायत असेल, कारखाने असेल यांनी शासनाला जमीन भाड्याने द्यायची आहे.जमीन भाड्याने दिल्यानंतर त्या जमिनीचे तुम्हाला प्रति एकर तीस हजार रुपये वर्षाला भेटणार आहे.

आणि ही जमीन तुम्ही सौर कृषी पंपासाठी भाड्याने देणार आहे. तर यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा व यासाठी पात्रता काय आहे, यासंबंधीची ही पूर्ण माहिती आहे. मित्रांनो, तुमची जमीन जर पडून असेल तर भाडेतत्त्वावर शासनाला ती जमीन द्यावी व त्या जमिनीचे तुम्हाला प्रति एकर तीस हजार रुपये वर्षाला मिळणार आहे

यासाठी ऑनलाईन अर्ज कसा करायचा हे पाहणार आहोत पण त्या अगोदर तुम्हाला www.mahadiscom.in/solar-mskvy या वेबसाइटवर जायचे आहे. भाषा मराठीत करून घ्यायची म्हणजेच समजायला सोपे जाते व नंतर सुविधा या पर्यायावर क्लिक करायचे आहे. आता अगोदर मार्गदर्शक सूचना बघूया व नंतर ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची माहिती बघूया.

अर्जदारास मार्गदर्शक सूचना: 1)अर्जदार स्वतः शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, कोऑपरेटिव सोसायटी, वॉटर यूजर असोसिएशन, साखर कारखाने , जल उपसा केंद्र ग्रामपंचायत व इतर संस्था यापैकी कुणीही असू शकतात. 2)महावितरण याला भाडेतत्त्वावर देण्यात येणाऱ्या जागेचे क्षेत्रफळ कमीत कमी दहा एकर व जास्तीत जास्त पन्नास एकर असावे.

3)जमीन मालकांची संख्या एक पेक्षा जास्त असल्यास त्यांच्यापैकी एका व्यक्तीला नामनिर्देशित करून त्या नावाने अधिकार पत्र देणे बंधनकारक राहील. 4)अर्जदार/ अधिकार प्राप्त प्रतिनिधीने सातबारा, आठ अ, फेरफार उताराच्या दाखल्याच्या मूळ प्रति पोर्टल वर अपलोड कराव्यात.

5)अर्जामध्ये काही त्रुटी आढळल्यास त्याची पूर्तता करण्यासाठी अर्जदाराने पुन्हा महावितरणाच्या वेबसाईटवर जाऊन माहिती अपलोड करावी. 6)अर्जदारास महावितरण’कडून एक उपभोक्ता क्रमांक देण्यात येईल. 7)अर्जदार/ अधिकार प्राप्त प्रतिनिधीने जागेच्या सर्वेक्षणासाठी जागेवर उपस्थित रहावे.

8)महावितरणाच्या 33/11 के .व्ही उपकेंद्र जवळील जमिनीला प्राधान्य देण्यात येईल. 9)अर्जदार/ अधिकार प्राप्त प्रतिनिधीकडून प्रस्तावित एका गटातील, एका जागेकरिता एकच अर्ज स्वीकारण्यात येईल. 10)महावितरण कंपनीला भाडेतत्त्वावर दिलेल्या प्रस्तावित जागेपैकी प्रत्यक्षात हस्तांतरित केलेल्या जागेचा करारनामा करण्यात येईल.

11)महावितरणाला भाडेतत्वावर देण्यात येणारी प्रस्तावित जमीन क्लिअर टायटल देणे ही जबाबदारी अर्जदाराची असेल.
12) महावितरणाला भाडेतत्वावर देण्यात येणारी प्रस्तावित जमीन ही अतिक्रमण मुक्त, तारण मुक्त, कर्जमुक्त व इतर कोणत्याही संस्थेचा योजना मुक्त देणेही जबाबदारी अर्जदाराची असेल.

13)महावितरणाला भाडेतत्त्वावर देण्यात येणाऱ्या प्रस्तावित जमिनीची मोजणी नकाशा प्रमाणे हद्द ठरविणे व निश्चित करणे ही जबाबदारी अर्जदाराची असेल. पाच किलोमीटरच्या आतील सबटेशन बनवले आहे तिथे हा अर्ज करता येईल. अर्ज करण्यासाठी वेबसाईट वर जायचे आहे.

तेथे सुविधा ऑप्शन मध्ये अर्ज नोंदणी यावर क्लिक करायचे आहे व मग लोगिन पासवर्ड मागतात, new here to registration त्यावर क्लिक करायचे, म्हणजे तुम्हाला तुमच्या अकाउंट उघडायचे आहे. त्यासाठी युजर नेम तुम्ही काहीही टाईप करू शकता.

नंतर तुम्हाला आवडेल तो पासवर्ड टाका. त्यानंतर ऑपलीकन म्हणजेच तुम्ही जमीन मालक आहात का डेवलपर आहात का जे आहे ते टाईप करा त्यानंतर तुमचे नाव, तुमची सोसायटी असेल तर सोसायटीचे नाव,त्यानंतर पत्ता व मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमचा आधार कार्ड नंबर,पॅन कार्ड नंबर टाकायचा आहे.

व मग ईमेल आयडी टाकून पूर्ण माहिती भरून द्यायची आहे व नंतर send otp या पर्यायावर क्लिक करायचं आहे वर send केल्यावर तुम्ही जो नंबर दिला आहे त्यावर ओटीपी जाणार आहे, आलेला ओटीपी validate करायचा आहे. ओटीपी टाकल्यानंतर आता अर्ज सबमिट करायचा आहे.

नंतर welcome लिहून येईल व तुमचे युजरनेम दाखवेल account created successfully for saur krushi vahini yojna लिहून येईल, आता लॉगिन आयडी मधून लॉगिन करायचे आहे, नंतर यूजर व आयडी पासवर्ड टाकायचा, मग लॉगिन वर क्लिक करायचे.

डाव्या साईडला ऍड developers हे पर्याय आहे, त्यावर क्लिक करा, एक पर्याय register for owner यावर क्लिक केल्यावर, दोन पर्याय येईल एक जिल्हा व दुसरा तालुका जे जवळचे सबटेशन असेल तो तालुका निवडायचा आहे व search वर क्लिक करायचं आहे.

तालुका टाकून तुम्ही लोकेशन चेक करू शकता, अशाप्रकारे सबटेशन नंबर दिसेल, लोकेशन दिसेल जवळच्या सबटेशन नंबर वर क्लिक करायचे, सब स्टेशन नंबर लक्षात ठेवून सिलेक्ट करायचा आहे. सब टेशन नंबर निवडल्यावर त्या सबटेशन ची माहिती येईल, ऑपलीकन डिटेल भरायचे आहे.

त्यामध्ये तुमची माहिती भरायची आहे. तुम्ही जर शेतकरी असेल युवा शेतकऱ्यांचा गट असेल इ. त्यानंतर तुमचा पूर्ण नाव, तुमचा आधार कार्ड नंबर, सोसायटी असेल तर सोसायटी चा नंबर नंतर आधार कार्ड वरचा पत्ता, तुमच्या गाव, तालुका, जिल्हा पिन कोड नंबर व मोबाईल नंबर ही पूर्ण माहिती भरायची.

व त्यानंतर जमिनीचा तपशील द्यायचा आहे. यानंतर तुमचा सातबारा ,सातबारा क्रमांक, आठ अ क्रमांक, गट नंबर, तुमचा सर्वे नंबर, जिल्हा तालुका, गाव ही माहिती जमिनीच्या तपशील मध्ये भरायची आहे. त्यानंतर बँक डिटेल द्यायचे आहे. ज्या अकाउंट मध्ये पैसे हवे आहे,

त्याचे माहिती द्यायची आहे, बँक अकाऊंट नंबर द्यायचा आहे ,IFSC कोड टाका व search near by branch असेल ती शोधायची आहे म्हणजे, आपोआप माहिती येईल, तुमचे फक्त नाव टाका व पुढे संमती पत्र भरून त्यावर क्लिक करून तुम्हाला कागदपत्रे अपलोड करायचे आहे.

त्यात सातबारा, आधार कार्ड, बँकेच्या डिटेल व authorization letter ही पूर्ण माहिती भरून ती अपलोड करायचे आहे. आता शेवटचा पर्याय फेरफार व आठ अ उतारा हे तुम्हाला अपलोड करायचे आहे व हे सर्व कागदपत्र अपलोड करून तुमचे अर्जसबमिट करायचे आहे.

त्यानंतर तुम्हाला reference नंबर मिळेल तो तुमच्याकडे जपून ठेवायचा आहे. पुढची प्रक्रिया तुम्हाला मेसेज किंवा फोन द्वारे शासनातर्फे कळविण्यात येईल. अशाप्रकारे तुम्ही तुमची जमीन शासनाला सौर पंप कृषी योजनेसाठी भाडेतत्वावर देऊ शकता.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती हीसध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.