सौर वीज विकून पैसे कमवा || शेतकऱ्यांसाठी सरकारची जबरदस्त योजना ।। नेट मीटरिंग ने अतिरिक्त असलेली सौर ऊर्जा विकून कमवा पैसे. जाणून घ्या महत्वाची माहिती !

अर्थकारण लोकप्रिय शेती शैक्षणिक

मित्रांनो शेतकर्यांना आता सौर कृषी पंपातून वीज तर मिळणार आहे. मात्र अतिरिक्त निर्माण होणारी वीज, नेट मिटरींग द्वारे महावितरण कंपनीच्या ग्रिड मध्ये टाकून, प्रतियुनिट मोबदला मिळविता येणार आहे. मित्रांनो नेट मिटरींग याचा अर्थ होतो कि सौर पॅनल मधून निर्माण होणारी वापरा शिवायची अतिरिक्त वीज, ग्रिडला परत पाठविणे. काय आहे नेट मीटरिंग योजना? याची सविस्तर माहिती पाहू.

मित्रांनो या ठिकाणी महाराष्ट्र शासनाच्या उद्योग ऊर्जा व कामगार विभाग आहे. त्याने दिनांक १२ मे २०२१ रोजी हा जीआर प्रकाशित केलेला आहे. या जी आर मध्ये, या योजनेसंदर्भात मध्ये उल्लेख केलेला आहे. या जी आर चे टायटल आहे, राज्यातील कृषी पंप विज जोडणी यांचे सौर ऊर्जेद्वारे विद्युतीकरण करण्याचे अभियान.

मित्रांनो आता नेट मीटरिंग योजनेचे संदर्भामध्ये, या जीआरमध्ये ज्या ठिकाणी उल्लेख करण्यात आलेला आहे. या ठिकाणी आपण माहिती पाहूया. त्याचे पेज नंबर दहा वरती अभियानांतर्गत गट क मधील पारेषण सलग्न सौर कृषी पंप प्रस्थापित करणे. या घटकांमध्ये नेट मिटरींग या योजनेचा उल्लेख करण्यात आलेला आहे.

तर आपण याबद्दल सविस्तर माहिती घेऊ. केंद्र शासनाच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या अभियानाच्या गट क अंतर्गत शेतकऱ्यांना त्यांचे उत्पन्न वाढविण्याची संधी, उपलब्ध करण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडील सौर ऊर्जेद्वारे निर्माण होणारी अतिरिक्त वीज, नेट मीटरिंग द्वारे महावितरण कंपनीच्या ग्रिड मध्ये टाकण्यात यावी. सदर अतिरिक्त विजेपोटी निश्चित केलेल्या दराने महावितरण कंपनी द्वारे मोबदला देण्यात यावा.

मित्रांनो आता या योजने साठी चे निकष व उद्दिष्ट या ठिकाणी पाहूया. या अभियानांतर्गत शेतकऱ्यांकडे सद्यस्थितीत असणाऱ्या पारंपारिक पद्धतीच्या कृषी पंपाच्या क्षमतेच्या, दुप्पट क्षमतेपर्यंत सौर ऊर्जा निर्मिती यंत्र स्थापित करता येईल. म्हणजे पारंपरिक वीज जोडणी ज्या शेतकऱ्यांकडे केलेली आहे. त्यांना जी जोडणी या क्षमतेची मिळालेले आहे, त्या क्षमतेच्या दुप्पट क्षमतेचे सौर ऊर्जा निर्मिती संयंत्र त्या शेतकऱ्याला स्थापित करता येईल.

या अभियानांतर्गत एकुण पन्नास हजार कृषी पंपाचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारून, सौर उर्जिकरन करण्याचे नियोजित आहे. म्हणजे पारंपरिक विज जोडणी ज्या शेतकऱ्याकडे आहे. अशा पन्नास हजार शेतकऱ्यांना सौर ऊर्जा प्रकल्प उभरून, या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. सदर अभियान महावितरण कंपनी मार्फत राबविण्यात येणार असून, यात सदर अभियानाचा अंमलबजावणीच्या टप्प्यामध्ये त्या त्या आवश्यकतेनुसार महाउर्जा ही सहभागी असेल.

या अभियानात करिता महावितरण कंपनी अंमलबजावणी यंत्रणा राहील. सदर अभियानांतर्गत निर्मित सौर ऊर्जा वीज कृषी ग्राहक कृषीपंपासाठी वापरू शकेल. व अतिरिक्त वीज ग्रीडमधून ज्यावेळी सौर ऊर्जा उपलब्ध नसेल, त्यावेळी वापरू शकेल. म्हणजे मित्रांनो ज्यावेळेस सौर उर्जा उपलब्ध नसेल. म्हणजेच रात्रीच्या वेळेस. सदर शेतकरी कृषी पंपासाठी पारंपरिक ग्रीड मधील वीज वापरू शकणार आहे.

व दिवसा सौर कृषी पंप यातून निर्माण होणारी वीज आवश्यकतेनुसार स्वतः वापरू शकतो. किंवा अतिरिक्त निर्माण होणारी वीज ही रिव्हर्स ग्रिड मध्ये पाठविण्यात येईल. शेतकऱ्यांनी ग्रिड ला केलेल्या अतिरिक्त वीज पुरवठ्याची आकारणी, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने ठरवून दिलेल्या, फिड इन टेरिफ प्रमाणे करण्यात येईल.

शेतकऱ्या मार्फत ग्रिडला निर्यात करण्यात येणारी वीज, सौर ऊर्जा पॅनल द्वारे निर्मिती झालेल्या, विजेच्या पन्नास टक्के पर्यंतच मर्यादित असेल. शेतकऱ्यांमार्फत निर्माण होणारी वीज रोहित्र क्षमतेपेक्षा जास्त होऊ नये. याकरिता रोहित्र क्षमतेच्या सत्तर टक्के एवढी सौर क्षमता मंजूर करण्यात येईल.

यात प्रथम येणाऱ्यास, प्रथम प्राधान्य देण्यात येईल. या अभियानांतर्गत असे प्रकल्प ऑनलाइन पोर्टल द्वारे स्टेट नोडल एजन्सी नोंदणी करणे बंधनकारक राहील. सदर अभियानांतर्गत घटकाची अंमलबजावणी केवळ संमिश्र वाहिनीवर राबविण्यात येईल. या अभियाना अंतर्गत उभारण्यात येणारे सौर ऊर्जा प्रकल्पाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधीत उत्पादक अथवा विकासकाची राहील.

म्हणजेच मित्रांनो आपल्या शेतामध्ये जी कंपनी सौर कृषी पंप अन इन्स्टॉल करून देणार आहे. ही कंपनी प्रकल्पाची म्हणजेच सौर ऊर्जा पंपाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी त्या कंपनीकडे असणार आहे. की मग वीकासकाची म्हणजेच त्या शेतकऱ्यांची ती जबाबदारी, या ठिकाणी राहणार आहे. आता या योजनेसाठी लाभार्थी शेतकऱ्याला अनुदान कशा पद्धतीने उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ते या ठिकाणी पाहुया.

अनुदानामध्ये केंद्र शासनाचा हिस्सा सुद्धा असणार आहे. या अभियानांतर्गत पारेषण संलग्न सौर कृषी पंप स्थापित करण्यास, प्रत्यक्षात आलेल्या खर्चाच्या रकमेच्या तीस टक्के रक्कम केंद्र शासनामार्फत संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. त्यानंतर मित्रांनो राज्य शासनाचा सुद्धा हिस्सा असणार आहे.

यामध्ये या अभियानांतर्गत सलग्न सौर कृषी पंप स्थापित करण्यास, प्रत्यक्षात आलेल्या खर्चाच्या रकमेच्या तीस टक्के रक्कम राज्य शासनामार्फत संबंधित शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे. केंद्र शासनाने आता राज्या करिता मंजूर केलेल्या सौर कृषी पंप करीता सुमारे एकुन रुपये ६७.५० कोटी निधीची आवश्यकता आहे. राज्याकरीता मंजूर झालेल्या पंपसंख्येत भविष्यात वाढ होण्याची शक्यता आहे.

पाच वर्षात एकूण पन्नास हजार पंपाचे उद्दिष्ट असून, जर केंद्र शासना कडून कमी उद्दीष्ट देण्यात आल्यास. या अभियानाच्या परिणामाचा विचार करून, सुकानु समिती उरलेले उद्दिष्ट राज्याच्या हरित ऊर्जा किंवा अतिरिक्त विज विक्री कराद्वारे, निधी उपलब्ध करून, सदर उद्दीष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करेल. मित्रांनो पाच वर्षांमध्ये या योजनेसाठी पन्नास हजार पंपाचे उद्दिष्ट या ठिकाणी सरकारकडून निश्चित करण्यात आलेला आहे.

मात्र शेतकऱ्यांची मागणी स्व कृषिपंपाची खूप जास्त असल्या कारणाने, पन्नास हजार पंप हे या ठिकाणी लवकर संपणार आहे. त्यावेळेस लवकरात लवकर ज्या शेतकऱ्यांना या योजनेमध्ये सहभागी व्हायचे आहे. त्याने अर्ज हा करायला हवा. मित्रांनो या योजनेसाठी लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपामध्ये केंद्रशासन तीस टक्के रक्कम देणार असून.

राज्य सरकार तीस टक्के रक्कम देणार आहे. उर्वरित चाळीस टक्के रक्कम ही लाभार्थी हिस्सा असून या अभियानांतर्गत लाभार्थी हिस्सा चाळीस टक्के हा संबंधित शेतकऱ्याला हा टाकावा लागणार आहे. सदर माहितीच GR डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक कॉपी करून आपल्या ब्राऊजर मध्ये पेस्ट करा. https://www.maharashtra.gov.in/Site/Upload/Government%20Resolutions/Marathi/202105121147513610.pdf किंवा तुम्ही तो आपल्या टेलिग्राम चॅनेल वरूनही मिळवू शकतात.

(वरील माहिती www.youtube.com/techwithrahul या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे)

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

2 thoughts on “सौर वीज विकून पैसे कमवा || शेतकऱ्यांसाठी सरकारची जबरदस्त योजना ।। नेट मीटरिंग ने अतिरिक्त असलेली सौर ऊर्जा विकून कमवा पैसे. जाणून घ्या महत्वाची माहिती !

Comments are closed.