समुद्राच्या खोल पाण्यात चालणा-या प्रकाशाच्या खेळाबाबत तुम्हाला माहिती आहे का?

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

लहानपणी जर तुम्ही गांवात रहात असाल, किंवा सुट्टीमध्ये तुम्ही गावी जात असाल, तर रात्रीच्या मिट्ट काळोखात आकाशात चमचमणारे तारे आणि चांदण्या पाहून हरखून गेले असाल. पण हे झालं आकाशातील द्रृष्य. अशाच प्रकारे चमकणारे काजवे तुम्ही नक्कीच पाहिले असणार आणि त्यांना दोन्ही हात जुळवून पकडण्याचा प्रयत्न देखील केला असणार. असेच प्रकाशमान होणारे प्राणी समुद्रात देखील आहेत.

समुद्रातील अनेक प्राणी प्रकाश उत्सर्जित करू शकतात आणि याचं शास्त्रीय नांव आहे बायोल्युमिनेसन्स. समुद्रातील सर्व प्राण्यांपैकी सुमारे तीन चतुर्थांश प्राणी बायोल्युमिनेसेंट आहेत आणि हे प्राणी पृष्ठभागापासून ते ४,००० मीटर खोलपर्यंत कुठेही राहू शकतात. हे प्रकाश उत्सर्जन म्हणजे जोडीदारांशी संवाद साधण्याचा, शिकार आकर्षित करण्याचा किंवा महासागरांच्या अंधारात भक्षकांपासून सुटका करण्याचा एक प्रभावी मार्ग आहे.

 

 

बायोल्युमिनेसेन्स हा “बायोस” म्हणजे ग्रीकमध्ये जीवन आणि “लुमेन” म्हणजे लॅटिनमध्ये लाईट किंवा प्रकाश असा आहे. बायोल्युमिनेसेन्स ही काही सजीवांची स्वतःचा प्रकाश उत्सर्जित करण्याची क्षमता आहे. महत्वाचं म्हणजे बायोल्युमिनेसेन्स ही एक रासायनिक प्रक्रिया आहे आणि त्या करीता सूर्यप्रकाश किंवा टॉर्च सारख्या कोणत्याही बाह्य प्रकाशाची आवश्यकता नसते.

प्राणी प्रकाश निर्माण करण्याचे एक कारण म्हणजे संवाद साधणे. समुद्रात सूर्यप्रकाश काहीशे मीटरपेक्षा जास्त खोलवर प्रवेश करू शकत नाही. त्याखाली पूर्ण अंधार असतो. रात्रीच्या वेळी चंद्रप्रकाशातील अंधुक चमक वगळता समुद्राचा पृष्ठभाग देखील गडद असतो, त्यामुळे प्रकाश हा प्राण्यांसाठी संवाद साधण्याचा उत्तम मार्ग असतो. पण ते कोणाशी संवाद साधत असतात आणि इतर कोणते प्राणी हे सिग्नल पहात असतात? सागरी प्रजातींसाठी प्रकाश उत्सर्जित करणे किंवा अंधारात प्रकाश शोधणे त्यांना भागीदार किंवा खाण्यासाठी काहीतरी शोधण्यास मदत करते. उदाहरणार्थ एंग्लर मासा त्याच्या चकाकणाऱ्या अंगाचा वापर करून लहान शिकार आकर्षित करतो. अर्थात, शिकार खाण्याची इच्छा नसते तेव्हां बायोल्युमिनेसेन्सचा वापर ते संरक्षणासाठी करू शकतात.

प्रकाशाचा वापर करून अनेक भिन्न रणनीती आखल्या जाऊ शकतात. ल्युमिनेसेंटचा प्रकाश हा भक्षकांना काही सेकंदांसाठी थक्क करून सोडण्याचा एक मार्ग आहे. कल्पना करा की तुम्ही काही मिनिटांसाठी अंधाऱ्या खोलीत आहात. जर कोणी आंत येऊन तुमच्या डोळ्यांकडे फ्लॅशलाइट दाखवला, तर तुम्ही काही सेकंदांसाठी आंधळे व्हाल आणि काहीही पाहू शकणार नाही—संभाव्य शिकार पकडण्यासाठी तेव्हढा वेळ नक्कीच पुरतो.

काही मासे प्रति-प्रकाशासाठी बायोल्युमिनेसेन्स वापरतात. सामान्यतः हे दिवसा पृष्ठभागावर पोहतात, तेव्हां त्यांच्यावर पडलेल्या सूर्यप्रकाशामुळे त्यांची सिल्हूट किंवा आक्रृती त्यांच्या खालील बाजूस पोहणाऱ्या भक्षकांना दिसते. काही मासे सिल्हूटमध्ये व्यत्यय आणण्यासाठी आणि स्वतःला भक्षकांपासून लपवण्यासाठी त्यांच्या पोटातून प्रकाश निर्माण करू शकतात. काही जीवाणू आणखी एक रणनीती आखतात; त्यांच्या शरीराचा काही भाग चमकदार लक्ष्य म्हणून वेगळा करणे. काही सरपटणारे प्राणी ज्या प्रकारे शिकारीपासून स्वतःचा जीव वाचवण्यासाठी त्यांच्या स्वतःच्या शेपट्या विलग करू शकतात, त्याप्रमाणेच शिकारी चमकणाऱ्या अलिप्त भागाचा पाठलाग करतो आणि मूळ जीव सुखरूपपणे निसटू शकतो.

बायोल्युमिनेसेंट जीव जमिनीच्या पृष्ठभागावर खूपच कमी प्रमाणात दिसून येतात. तुम्ही तुमच्या बागेत किंवा ग्रामीण भागात बायोल्युमिनेसेंट फायरफ्लाय किंवा काजवे पाहिले असतील पण असे अभावानेच आढळतात. समुद्रात मात्र ते सर्वत्र आढळतात. उदाहरणार्थ मासे, स्क्विड, जेलीफिश, काही कोरल, विविध प्रकारचे सागरी वर्म्स, स्टेनोफोर्स, आणि क्रस्टेशियन्स.

निसर्ग हा चमत्कृतीपूर्ण आहे आणि तुम्ही त्याच्या जितकं जवळ जाल, तितकं तो तुम्हांला अधिक स्तिमित करेल हे नक्की.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा