शरद पवार ग्रामसमृद्धि योजना II 100% अनुदान शा’सन नि’र्णय आला II फॉर्म कुठे आणि कसा भरावा याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या!

शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो शरद पवार ग्राम समृद्धी योजनेचा शा’सन नि’र्णय आलेला आहे. त्याचा अर्ज कुठे भरायचा कसा भरायचा आणि काय भरायचा याची परिपूर्ण माहिती आज आपण बघणार आहोत. जस कि तुम्हाला माहीत असेलच शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेमध्ये गाई,म्हशी, शेळी पालन,

कुकुटपालन यांच्यासाठी गोठा बांधण्यासाठी शंभर टक्के अनुदान मिळणार आहे. त्याचे नियम व अटी काय आहेत हे आपण पाहणार आहोत. या शासन निर्णयामध्ये कोणकोणते महत्त्वाचे मुद्दे आहेत ते आपण पाहणार आहोत. सर्वप्रथम हा शा’सन नि’र्णय आहे शरद पवार ग्राम समृद्धी योजना, राज्य योजना म्हणून राबविण्यातचा.

महाराष्ट्र शा’सनाचा हा शा’सन निर्णय आहे या शा’सन नि’र्णयानुसार: प्रत्येकाच्या वार्षिक उत्पन्नाचा मोजमाप करण्याची सुद्धा तेवढीच आवश्यकता आहे, जेणेकरून प्रत्येक कुटुंब आपल्या वैयक्तिक निर्णय योग्य प्रकारे घेण्यास प्रवृत्त होतील. यासाठी एक ॲप विकसित करण्यात येईल त्या अनुषंगाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत काही योजनांच्या नियोजनातून शरद पवार ग्राम समृद्धी योजना,राज्य योजना राबवण्यात शासन मान्यता देत आहे.

या योजनेचा शा’सन नि’र्णय खाली दिल्याप्रमाणे आहे: ही योजना राबविण्याच्या अनुषंगाने ग्रामीण भागातील कामाची मागणी करणाऱ्या प्रत्येक पात्र लाभार्थ्यांना शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेअंतर्गत खालील नमूद केलेल्या चार वैयक्तिक कामांना सर्वोत्तम प्राधान्यक्रमाने सर्व ग्रामपंचायत क्षेत्रात राबविण्यात यावे.

दिनांक 9 ऑक्टोंबर 2012,शासन निर्णय मधील एका गावात जास्तीत जास्त पाच गोठयांची मर्यादा या शासन निर्णयान्वये वगळण्यात येत आहे. त्यामुळे मित्रांनो ज्याला मागेल त्याला या योजनेचा अनुदान मिळणार आहे.आतापर्यंत काय होतं तर आपल्याकडे गोठ्यासाठी योजना होती परंतु 5 गोठयांची मर्यादा घातल्यामुळे ते शक्य होत नव्हतं.

त्यातली पहिली योजना आहे गाय व म्हैस यांच्यासाठी पक्का गोठा बांधणे. या कामाला नियोजन विभागाच्या दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजी च्या शासन परिपत्रकातील परिशिष्ट 9 मधील अनुक्रमांक 75 नुसार नरेगा अंतर्गत रुपये 77 हजार 188 इतका अंदाजित खर्च येईल त्याचा तपशील खालील प्रमाणे आहे.

अकुशल खर्च:-रु.6188 ( प्रमाण आठ टक्के) कुशल खर्च:- रु.71000/-( प्रमाण 92 टक्के) एकूण:-रु.77188/-( प्रमाण 100 टक्के). अशाप्रकारे जवळपास 87 हजार 188 रुपये तुम्हाला या योजनेअंतर्गत मिळणार आहे. दुसरी योजना आहे शेळीपालन शेड बांधणे: यासाठी 49 हजार 284 रुपये हे शंभर टक्के अनुदान आपल्याला मिळणार आहे.

त्याचप्रमाणे शेळीपालनामध्ये मित्रांनो हे स्पष्ट करण्यात येत आहे की शेळीपालनाच्या शेडसाठी प्रत्येक दहा शेळ्यांसाठी एक गट समजण्यात येईल व त्याप्रमाणे परिपत्रकानुसार अनुदान अनुज्ञेय करण्यात येईल. तसेच ज्या लाभार्थ्यांकडे दहापेक्षा अधिक शेळ्या असतील त्यांना शेळ्यांसाठी चे दोन गट लक्षात घेऊन दोन पट अनुदान राहील मात्र एका कुटुंबास जास्तीत जास्त 30 जणांन करता तीन पट अनुदान मंजूर करण्यात येईल.

तिसरी योजना आहे कुकुटपालन शेड बांधण्यासाठी: या कामाला नियोजन विभागाच्या दिनांक 2 सप्टेंबर 2020 रोजी च्या शासन परिपत्रक आतील परिशिष्ट 9 मधील, अनु क्रमांक 77 नुसार नरेगा अंतर्गत रुपये 49 हजार 760 इतका अंदाजित खर्च येईल हा खर्च तुम्हाला अनुदान म्हणून मिळणार आहे.

त्याचबरोबर जी चौथी योजना आहे ती आहे भू संजीवनी नाडेप कंपोस्टिंग ही योजना. ही योजना जमीनीचे आरोग्य सुधारणा केल्यास कृषी उत्पादनात मोठ्या प्रमाणावर भर पडू शकते म्हणून राबविण्यात येणार आहे. शेतातील कचऱ्यावर कंपोस्टिंग द्वारे प्रक्रिया केल्यास त्यातील सेंद्रिय पदार्थ, त्याच पद्धतीने सूक्ष्मजीव तसेच गांडूळ द्वारे कुजून त्यापासून उत्तम प्रकारचे सेंद्रिय कंपोस्ट खत तयार होते.

या खताचा वापर शेतात मोठ्या प्रमाणावर केल्यास जमिनीच्या आरोग्य सुधारणा होऊन कृषी उत्पादनात मोठी भर पडू शकते अशा सेंद्रिय पदार्थांमध्ये सर्वच प्रकारचे सूक्ष्मजीव मोठ्या प्रमाणावर असतात. योग्य परिस्थितीत या सूक्ष्म जीवांची संख्या वाढते आणि मोठ्या संख्येत असलेले सूक्ष्मजीव सेंद्रिय पदार्थांचे विघटन झपाट्याने करतात.

या योजनेसाठी सरकारकडून तुम्हाला 10 हजार 537 रुपये इतकी शंभर टक्के अनुदान मिळणार आहे. या शासन निर्णयाचा हेतू कसा आहे की वरील प्रकारची कामे करून गावातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील आणि राज्यातील शंभर टक्के कुटुंबांना समृद्ध करावयाचे आहे.

यात कृषी व पशुसंवर्धन विभागाची विशेष मदत लागणार आहे.अंतः या विभागांनी जिल्हा व तालुका प्रशासनाला स्वतः पुढाकार घेऊन मदत करावी. सुरुवातीच्या टप्प्यात अनेक गावात किमान लाभार्थ्यास लखपती करून बघावे.याचा पाठपुरावा ॲपच्या माध्यमातून करण्यात येईल.

तर हा आहे महाराष्ट्र शासनाचा शरद पवार ग्रामसमृद्धी योजनेचा शासन निर्णय.आता या योजनेचा फॉर्म कुठे भरायचा आहे आणि त्याचा लाभ कसा घ्यायचा ते पाहूया. या योजनेचा तुम्हाला फॉर्म भरून सरपंच, ग्रामसेवक किंवा ग्रामविकास अधिकारी यांच्याकडे करायचा आहे.

या फॉर्म मध्ये सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत चे नाव टाकायचे आहे. तसेच तालुका आणि जिल्हा टाकायचा आहे. तुमचा चे फोटो लावायचा आहे,तसेच खाली अर्जदाराचे संपूर्ण नाव यापुढे तुम्हाला तुमचे पूर्ण नाव आणि खाली पत्ता टाकायचा आहे. त्यानंतर तुम्हाला कोणत्या योजनेसाठी अनुदान हवे आहे ती योजना खाली दिलेल्या तक्त्यातून निवडायची आहे आणि त्याच्यापुढे टीक करायचे आहे.

यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की प्रत्येक योजनेसाठी तुम्हाला वेगळा फॉर्म भरावा लागणार आहे. त्याच्यानंतर तुम्हाला तुमची पात्रता काय काय असणार आहे हे टाकताना तुम्ही अनुसूचित जातीमध्ये येता की अनुसूचित जमातीमध्ये, भटक्या जमाती मध्ये येता ते टाकायचे आहे, तसेच दारिद्र्यरेषेखालील आहात की महिलाप्रधान कुटुंबातील आहात तसेच जर तुम्ही इंदिरा आवास योजनेचे लाभार्थी असाल तर त्याच्यापुढे तुम्हाला फक्त टीक करायचे आहे.

त्यानंतर मित्रांनो कृषी कर्ज माफी योजना 2008 नुसार अल्पभूधारक जमीन असलेला शेतकरी व सीमांत शेतकरी लाभार्थी अल्पभूधारक व सीमांत शेतकरी असल्यास त्यापुढे टीक करायचे आहे. तसेच लाभार्थ्याचे नावे जमीन जागा आहे का त्याची होय किंवा नाही असे टीक करायचे आहे.

लाभार्थी सदर गावचा रहिवासी असल्याबाबत दाखला जोडलेला आहे का त्या पुढे टिक करायचे आहे. लाभार्थी आधार कार्ड, बँक पासबुक झेरॉक्स जोडलेली आहे काय त्यापुढे टीक करायचे आहे ,आम्ही लाभार्थी रहिवासी असलेल्या ग्रामपंचायत मध्ये येत आहे का?त्या पुढे टिक करायचे आहे आणि अर्जासोबत कामाच्या प्रकारानुसार आणि ही टीक केलेली कागदपत्रे आपल्याला सोबत जोडायचे आहेत.

त्यानंतर शेवटी तुमच्या म्हणजेच अर्जदाराच्या कुटुंबातील 18 वर्षावरील सदस्यांची स्त्री, पुरुष आणि एकूण संख्या किती आहे ती तुम्हाला जिथे टाकायची आहे. आणि खाली घोषणापत्र आहे तिथे तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे व खाली सही करायची आहे.

या अर्जासोबत तुम्हाला कुटुंब ओळखपत्र (जॉब कार्ड), ऑनलाइन फोटोकॉपी, 8अ सातबाराचे उतारे, ग्रामपंचायत मालमत्ता नमुना 8अ चा उतारा ,जॉब कार्ड देताना मनरेगा मध्ये त्याची नोंद असली पाहिजे नसेल तर ती करून घ्यावी लागेल.त्याच्यासोबतच आधार कार्ड रहिवासी दाखला बँक पासबुक झेरॉक्स हे जोडायचे आहेत.

हा फॉर्म भरून दिल्यानंतर पुढची पायरी आहे की तो अर्ज ग्रामसदस्याला दिला असेल किंवा ग्रामसेवकाला दिला असेल ते हा तुमचा फॉर्म बघतील आणि खाली छाननी पत्रांमध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचे आहे तालुका टाकायचा आहे आणि पात्र असल्यास सदर लाभासाठी शिफारस आहे का नाही हे तुम्हाला टाकायचे.

आहे तर हे छानणी पत्र तपासून तुम्हाला या योजनेचा लाभ द्यायचा की नाही ते ठरवण्यात येणार आहेत आणि तुमचं नरेगा चे जॉब कार्ड आहे, त्यामध्ये तुमचं नाव येणार आहे. आणि त्या योजनेचा तुम्हाला फायदा मिळणार आहे. यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला पाहायला मिळाली असेल की मनरेगा मध्ये ज्यांच्या जॉब कार्ड आहे, ज्यांच्या रोजगार हमी योजनेसाठी कार्ड आहे, त्यांना या योजनेचा लवकर लाभ मिळतो. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या योजनेचा लाभ घेऊ शकता.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी.

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.