शेअर खरेदी करण्यासाठी योग्य किंमत अशी ठरवावी ह्याबद्दल महत्वाची माहिती जाणून घ्या !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

एखाद्या कंपनीची स्टॉक प्राईस बघितली तर एक गोष्ट लक्षात येईल की प्रत्येक सेकंदाला ती किंमत बदलत असते. समजा तुम्ही एखादी वस्तू विकत घेतली आणि तिची किंमत प्रत्येक सेकंदाला बदलत असेल, तर अशा वस्तूंची खरेदी किंमत किती असावी? हे कसं कळणार? अगदी तसंच स्टॉक आहे समजा डाबर कंपनीचा तो प्रत्येक सेकंदाला बदलतोय.

प्रत्येक सेकंदाला खाली जातो किंवा वर जातो मग त्या कंपनीची योग्य प्राईस काय असेल? कोणत्या किमतीला तो स्टॅक खरेदी करावा? जेणेकरून आपल्याला पुढे जाऊन फायदा होईल हे कसं ओळखणार? आता उदाहरण देतो आपण डाबर कंपनीचं. प्रत्येक सेकंदाला किंमत बदलते, याचा अर्थ कंपनी मध्ये काही बदल होतात का?

प्रत्येक सेकंदाला कंपनीमध्ये काही गुंतवणूक येते-जाते किंवा सेल अचानक वाढतो अचानक कमी होतो प्रत्येक सेकंदाला या व्हॅल्यू बदलत राहतात. असं काही होतं का? प्रत्येक सेकंदाला कंपनीचे बॅलन्स शीट बदलते का? असं काहीच होत नाही. शेअरची किंमत कमी जास्त होते म्हणजेच कंपनीचे व्हॅल्युएशन प्रत्येक सेकंदाला बदलतं. आणि हे सगळं डिपेन्ड असतं डिमांड आणि सप्लाय वर. डिमांड आणि सप्लाय हे अनेक पॅरामीटर्स वरून ठरत असतात.

मग मी बाय केलेला स्टॉक योग्य किमतीमध्ये बाय केला की नाही? हे कसं कळणार? त्यासाठी आपण पी इ रेशो चेक करतो. इ पी एस चेक करतो. पण इंटरंशिक व्हॅल्यू काय असते? हेच आपल्याला माहिती नाही. त्या कंपनी ची खरी किंमत काय असायला हवी? हे ठरवण्यासाठी बेंजमिन ग्राहम यांनी एक थियरी बनवली होती. हो तेच बेंजामिन ग्राहम ज्यांनी इंटेलिजंट इन्वेस्टर हे पुस्तक लिहिलं. मग ते फॉर्म्युला काय सांगतात? ते पहिल्यांदा पाहू.

V=EPSx(8.5+2g)x4.4/Y आता या सगळ्या चा अर्थ काय होतो? V=value expected from the growth formula over the next 7 to 10 years. पुढच्या सात ते दहा वर्षांमध्ये आपल्याला काय ग्रोथ एक्स्पेक्ट आहे. ते आपण या व्हि च्या माध्यमातून बघू शकतो. म्हणजे काय? सिम्पली आपण याला म्हणू शकतो. स्टॉक ची प्राईज आता काय असायला हवी? EPS= earning per share.

म्हणजे प्रत्येक शेअर मधून किती रुपये माझं अर्निंग होईल? समजा मी एखाद्या कंपनीमध्ये शंभर रुपयाची गुंतवणूक करतो. तर शंभर रुपये च्या माध्यमातून मला किती रुपये मिळतील. अर्निंग पर शेर माझं किती असेल? आता 8.5 हे काय आहे? 8.5=P/E base for a non growth company. नॉन ग्रोथ कंपनीचा हा एक पीई रेशिओ आहे.

g म्हणजे काय. g=reasonably expected 7 to 10 years growth rate. सात ते दहा वर्षा मधला एक एक्स्पेक्टेड ग्रोथ रेट आपण याला म्हणू शकतो. आणि 4.44= average yield of AAA corporate bonds. Y=the current yield on AAA corporate bonds. म्हणजे काय? त्या ट्रिपल ए कॉर्पोरेट बॅंड चा आता सध्या काय रेट चालू आहे? ते आपण वाय वरून ठरू शकतो.

आता या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला ऑनलाइन मिळतात. कुठेही जाण्याची गरज नाही. आता हे आपण प्रॅक्टिकली करून पाहतोय जेणेकरून तुम्हाला समजेल कशा प्रकारे याचं कॅल्क्युलेशन केले जातं. हा फॉर्म्युला घाबरण्याचं काहीच गरज नाही. एकदम सोपा सिम्पल अँड इझी कॅल्क्युलेशन करू शकतो.

सगळ्यात आधी आपण उदाहरण घेणार आहोत आयटीसी कंपनी चा जी खूप कॉमन आहे. प्रत्येक जण आयटी मधी इंन्वेस्ट करतो. खूप सेफेस्ट कंपनी माणली जाते. आता याच्या साठी कोण कोणत्या गोष्टी आवश्यक असतात? ते आपण बघितलेच आहेत. आता आपण या सगळ्या व्हॅल्यू फाईंड आऊट करण्याचा प्रयत्न करणार आहोत. मग हे कुठे मिळेल? मनीकंट्रोल असेल, स्क्र्रिनर असतील, वेगवेगळ्या वेबसाईट आहेत.

त्यावरून हा सगळा डाटा आपल्याला मिळतो. आता मी स्क्रिनर वरून हा डाटा घेतोय. ITC कंपनीचा EPS आहे 10.8 sales growth आहे 6.58 Y म्हणजे yield on AAA corporate bonds. आहे 6.7 आता या सगळ्या व्हॅल्यू आपण या फॉर्म्युला मध्ये ऍड करणार आहोत. जेव्हा आपण सगळे ऍड करू तेव्हा त्याचा रिझल्ट असेल म्हणजेच इंटरंशिक व्हॅल्यू येईल. ती आहे 153.65 रुपये.

जेव्हा हा स्टॉक मी १५३ रुपये ला बाय करणार, तिच किंमत माझ्यासाठी योग्य असेल. आणि तिथून पुढे मला खूप चांगलं प्रॉफिट होण्याची शक्यता आहे. कारण एखाद्या वस्तूची फेअर व्हॅल्यू काय आहे? याला फाईंड आऊट करणं खूप महत्त्वाचं असतं. समजा तुमच्या गावांमध्ये एखादं घर आहे. प्लॉट आहे. फ्लॅट आहे. जे काही असेल, त्याची‌ मागणी असते. मार्केटमध्ये वेगवेगळे लोक वेगवेगळ्या बोली लावत असतात.

कोणी मागतो पन्नास लाखाला. कोणी मागील साठ लाखाला. कोणी म्हणेल आरे यार याचे तीस लाख सुद्धा किंमत होणार नाही. म्हणजेच काय? प्रत्येकाच्या दृष्टीने त्याची वेगवेगळी व्हॅल्यू असते. पण त्यासाठी काही ठोस असा फॉर्म्युला आहे का? बिल्कुल नाही. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या पॅरॅमिटर नी त्याचं व्हॅल्युएशन करण्याचा प्रयत्न करतात. आणि याच प्रमाणे अजून एका स्टोक चं व्हॅल्युएशन आपण पाहणार आहोत.

आणि त्या स्टॅक चं नाव आहे, जस्ट डायल. जस्ट डायल तर तुम्हाला माहितीच असेल. याचा आपण थोडंसं व्हॅल्युएशन करण्याचा प्रयत्न करू. आता याचा EPS आहे चाळीस. g व्हॅल्यू येते १०. आणि yield आहे 6.79 आता या सगळ्याच आपण कॅल्क्युलेशन केलं. तर आपल्याला answer मिळेल सातशे अडतीस रुपये. सातशे अडतीस रूपयाला जर हा स्टॅक आपल्याला मिळत असेल तर त्याला आपण फेअर व्हॅल्यू म्हणू शकतो.

त्याची ती इंतेंसिक व्हॅल्यू असेल. सातशे अडतीस रुपये ला आपण याला बाय करू शकतो. मी कुठल्याही प्रकारे तुम्हाला रेकमेंडेशन देत नाही. फक्त एक्झाम्पल दाखवतोय. ज्या एक्झाम्पल मधून आपल्याला समजेल कशा प्रकारे स्टॉक ची ग्रोथ आपण एक एक्स्पेक्ट करू शकत. आणि कुठल्या प्राईज ला आपण बाय करायला हवं. आता ITC चा जर आपण चार्ट बघितला. तर १५३.६५ रुपयाला आपल्याला बाय करायचं होतं.

सपोज या लेवल ला आपण जर बाय केलं. 153. 65 रुपयांनी बाई करतोय. पण तिथून पुढे बघू शकता स्टॉक ची प्राईज कशाप्रकारे वर गेलेले आहे. अगदी त्याचप्रमाणे जस्ट डायल सुद्धा मी बाय करतोय. जेव्हा मी हा जस्ट डायल चा चार्ट पाहतो तेव्हा तुम्हाला समजेल. कशा प्रकारे या स्टॉक मध्ये ग्रोथ झालेली आहे. याच्या पेक्षा ही कमी होती. 738 रुपयांपेक्षा ही खूप कमी प्राईज ला मला हा स्टॅक मिळत होता.

पण त्यावेळी जर मी कॅल्क्युलेशन केला असत. तर ते कदाचित कमी येऊ शकलं असतं. आता अजून एक यामध्ये कॅच आहे. लक्षात घ्या. आज यांचा अर्निंग पर शेअर जर चाळीस रुपये असेल. तर तो उद्या ही तेवढाच असेल असे आपण म्हणू शकत नाही. जसजसा या कंपनीचा परफॉर्मन्स बदलत जाईल, जसं जसं यांचे प्रॅफिट्स वाढतील. कमी होतील. त्याप्रमाणे अर्निंग पर शेअर सुद्धा बदलत जाईल. ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे.

आणि ती लक्षात ठेवायला हवी. जसं जशा या फिगर बदलत जातील. तसतसे कंपनीची ईंन्ट्रेंसीक व्हॅल्यू सुद्धा बदलत जाईल. कदाचित कॉर्पोरेट बॅंड वर असणारा यिल्ड किंवा त्याचा रेट ऑफ इंटरेस्ट सुद्धा बदलत जाईल. कदाचित g ची व्हॅल्यू सुद्धा बदलत जाईल. आता g म्हणजे काय? g- reasonable expected 7 to 10 years growth rate. तो सुद्धा बदलत जाईल. कंपनीचा ग्रोथ रेट काय आहे? 6% आहे 7% आहे. कंपनी किती टक्क्यांनी ग्रो करते.

हे सुद्धा फाइंड आउट करणे गरजेचे आहे. कोणी सात वर्षाची ग्रोथ रेट एवढेच पकडेल. कोणी दहा वर्षाचे पकडेल. कोणी पाच वर्षाची पकडेल. मी इन ऍन एवरेज सात वर्षाचा पकडण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरून या फॅरम्युला मध्ये सगळ्या गोष्टी फिट्ट बसतील. म्हणजे एक कन्सेप्ट पहिली क्लियर होते. की याच्यामध्ये पॅरामिटर जशी बदलतील तशी ईंन्ट्रेंसीक व्हॅल्यू सुद्धा बदलत जाईल.

सपोज एखाद्या वर्षांमध्ये खूप चांगला कंपनीने परफॉर्मन्स केला असेल. आणि इ पी एस जस तुम्ही बघताय. जस्ट डायल याचा चाळीस रुपय आला. तो शंभर रुपये येईल. शंभर रुपये ला तर अजून व्हॅल्यू खूप जास्त वाढेल. पण रेगुलर लेझर कंपनीचा इपीएस दहा किंवा वीस रुपये असेल. तर काय होईल? आपण त्या वेळचा इपीएस बघून हसलो जाऊ शकतो. किंवा चुकीचे कॅल्क्युलेशन होऊ शकतं.

चुकीचा व्हॅल्युएशन होऊ शकतो. म्हणून इन ऍन एवरेज इ पी एस काय चालू आहे? यावर पण आपली नजर असायला हवी. त्याच्याबरोबर दुसरा अजून एक याच्या मध्ये कॅच आहे. तो तुम्ही समजून घ्या. या कॅल्क्युलेशन मध्ये कंपनीचे प्रमोटर कोण आहेत? त्यांचे व्हिजन काय आहे? त्याच बरोबर कंपनीवर डेट किती आहे? प्रोडक्ट कसा आहे? प्रोडक्टची कॉलिटी काय आहे? प्रोडक्ट ला फ्यूचर मध्ये ग्रोथ किती मिळणार आहे? कशी मिळणार आहे?

त्याचे कॉम्पिटेटर्स कोण आहेत? हा प्लेयर किती मोठा आहे? त्या अशा अनेक पॅरामिटर वर फोकस केला जात नाही. म्हणूनच फंडामेंटल अनालिसिस करण्यासाठी वेगवेगळ्या पॅरॅमिटरचा वापर केला जातो आणि ते पॅरामिटर कॅल्क्युलेट करून एक कम्बाईन रिझल्ट आपल्याला मिळतो हा स्टॉक बाय करायचा की नाही आणि तो किती रुपयाला करायचा.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.