शेअर मार्केट, स्टॉक मार्केट बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन (मूलभूत माहिती)।। ज्यांना शेअर मार्केट जुगार वाटतो त्यांचा गैरसमज फक्त दहा मिनिटांमध्ये दूर होईल !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

या लेखाच्या माध्यमातून शेअर मार्केट स्टॉक मार्केट बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन वाचायला मिळेल ज्यामुळे तुमचे अनेक गैरसमज दूर होतील तुमच्या मनातील सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील. शेअर मार्केट च्या माध्यमातून अगदी सामान्य माणूसही लाखो करोडो रुपये कमवू शकतो. ज्यांना शेअर मार्केट जुगार वाटतो त्यांचा गैरसमज फक्त दहा मिनिटांमध्ये दूर होईल.

सर्वात पहिला प्रश्न निर्माण होतो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करावी? समाज्यात दोन प्रकारचे लोक असतात, पहिले फक्त आजचा विचार करतात कारण त्यांचे मत असतं उद्याचा विचार करून काय फायदा दुसरे लोक असतात उद्याचाही विचार करतात.

उदाहरणार्थ राम आणि राहुल नावाची दोन मुले असतात, एका कंपनीमध्ये ते काम करत असतात. दोघांनाही पंधरा हजार रुपये पगार असतो तर राहुल एक बाईक विकत घेतो व त्यासाठी सहा हजार रुपये EMI भरतो ब्रँडेड मोबाईल विकत घेतो, त्याचा EMI हजार रुपये असतो.

पेट्रोलचा खर्च दोन हजार रुपये बाकी पैसे घर खर्च व इतर खर्चासाठी तो वापरतो. सेविंग मात्र त्याची झिरो असते, पण राम मात्र भविष्याचा विचार करणारा मुलगा असतो. त्याने आपल्या दोन महिन्याचा पगार साठवून त्यातील 20 हजार रुपयांची सेकंड हॅन्ड बाईक खरेदी केली. कारण बाईक चा वापर फक्त घर ते ऑफिस एवढा होणार होता. लाखो रुपये त्यासाठी खर्च करण्याची गरज नव्हती, म्हणून राम कोणत्याही प्रकारचा EMI भरावा लागत नव्हता.

घर खर्च व त्याचा इतर खर्च फक्त सात हजार रुपयांमध्ये पूर्ण होऊ लागला. पेट्रोल खर्च दोन हजार रुपये टोटल खर्च होतात याचा नऊ हजार रुपये बाकी राहायचे शिल्लक सहा हजार रुपये. महिन्याला सहा हजार रुपयांची गुंतवणूक करायला त्याने सुरुवात केली. पहिल्यांदा सर्व गुंतवणूक त्याने FD च्या स्वरूपात केली काही महिन्यात त्याला शेअर मार्केट बद्दल माहिती मिळाली.

त्यांने दोन महिने शेअर मार्केटचा अभ्यास करून गुंतवणूक करायला सुरुवात केली. पहिल्यांदा हजार, 2000, 3000 असे करत तो रक्कम वाढत गेला. त्याने 50 टक्के रक्कम FD व इतर सेविंग स्कीम मध्ये इन्वेस्ट केले व बाकी 50 टक्के रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवली पुढच्या पाच वर्षात राहुल पगाराची वाट बघायचा कारण EMI भरावे लागत होते, तिकडे राम मात्र लाखो रुपयांचा मालक बनला होता.

कर्जमुक्त जीवन व तो स्वतः करोडपती म्हणला होता. याचा अर्थ शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक प्रत्येकाने करायला हवे जरी तुमचा इन्कम पाच हजार असेल अथवा पाच लाख रुपये. प्रत्येकाने त्याच्या ऐपती नुसार काही रक्कम शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करायला हवी. सुरुवात भले एक हजार रुपयापासून करा गुंतवणूक करण्यासाठी कोणती पैशाची अट नसते कोणीही कधीही किती पैशाची गुंतवणूक शेअर मार्केटमध्ये करू शकतो.

पुढचा प्रश्न असेल शेअर मार्केट चालत कसे? शेअर मार्केट म्हणजे काय त्यावर नियंत्रण कोण करतं? भारत देशामध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज BSE आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज NSE. ज्या कंपन्या स्टॉक मार्केट मध्ये लिस्टेड आहेत त्या सर्व BSE व NSE च्या माध्यमातून बनल्या आहेत.

सोप्या भाषेत सांगायचं झालं तर BSE व NSE स्टॉक मार्केट वर नियंत्रण ठेवतात. यामध्ये कंपन्या कशा प्रकारे ऍड केल्या जातात हे पाहू. उदाहरणार्थ एक्स वाय झेड कंपनीचा बिझनेस ग्रो व्हायला लागला आहे. त्यासाठी त्यांना एक्सपान्शन करावे लागणार, एक्सपान्शन करायचं म्हटलं तर दहा लाख रुपये गुंतवणूक करावी लागणार, तेवढी गुंतवणूक करणे कंपनीला शक्य नसेल किंवा येवडा पैसा कंपनी उभा करू शकणार नसेल तर ते स्वतःचा IPO लाँच करतात.

IPO म्हणजे Initial public offering. 10 लाख रुपयांना समजा 10 हजार स्टॉक मध्ये कन्व्हर्ट केले तर एक स्टॉक ची किंमत बनते 100 रुपये म्हणजेच कंपनी 100 रुपयाचा एक स्टॉक असे 10 हजार ट्रेडर्स ला विकते. असे सर्व स्टॉक विकून कंपनी 10 लाख रुपये उभे करते.

एक्सपान्शन करून स्वतःचा बिझनेस वाढवते. आता प्रश्न पडतो कंपनीच ठीक आहे. यात स्टॉक खरेदी करणाऱ्याला काय फायदा? जेंव्हा तुम्ही 100 रुपयेचे 10 स्टॉक खरेदी करता तेव्हा तुमची टोटल 1000 रुपयाची गुंतवणूक होते काही दिवसांनी हीच रक्कम कमी अथवा जास्त होत असते.

सतत स्टॉक चे रेट बदलत असतात. कारण आहे कंपनीची कंडिशन, कंपनीची ग्रोथ जेव्हा कंपनीला ऑर्डर मिळते तेव्हा कंपनीचा सेल वाढायला लागतो. याचा अर्थ कंपनीला नफा होतो. दहा लाखाची कंपनी पंधरा लाखाची बनते पुढे जाऊन तीच कंपनी 20 लाखाची बनते.

आधी दहा लाखाचे शेअर आता 20 लाखाचे बनले. म्हणजे तुम्ही जे 1000 रुपयांचे 10 शेर खरेदी केले होते ते त्याची किंमत आज 200 रुपये झाली आहे. म्हणजे टोटल होतात 2000 रुपये. 1000 रुपये गुंतवणूक करून 2000 रुपये रिटर्न मिळाले. हे 2000 रुपये तुम्हाला हवे असतील तर withdraw करू शकता किंवा पुढेही continue करू शकता.

कंपनी चांगली असेन तर पुढेसूद्धा चांगला परफॉर्मन्स देत जाईल, आजून स्टॉक ची किंमत वाढायला लागेल त्यासाठी लॉन्ग टर्म विचार करू शकता, पण जर वाटत असेन इथून पुढे कंपनी हवी तेव्हडी ग्रो होणार नाही. कंपनी च्या व्यवस्थापणे मध्ये काही तरी प्रॉब्लेम्स पाहायला मिळत आहे. अश्या वेळी स्टॉक विकणे फायद्याचे राहील.

थोडक्यात सांगायचे झाले तर कंपनी च्या परफॉर्मन्स वर गुंतवणूक किती व कशी करायची हे ठरवावं लागत. यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. Share मार्केट जुगार नाही तर रिअल फॅक्ट व अच्युअल कंडिशन वर चालणार मार्केट आहे. तुम्ही स्टॉक खरेदी करता याचा अर्थ तुम्ही सुध्दा त्या कंपनी चे मालक बनता.

भलेही तुमची 0.001% मालकी असेन किंवा 1% असेन जेवढे जास्त स्टॉक खरेदी कराल तेवढे जास्त मालकी हक्क तुम्हाला मिळेल. काही कंपन्या त्यांचा जेवढा फायदा होईल त्यानुसार स्टॉक होल्डर्स ना डिव्हिडेंट देतात जेंव्हा एखादा शेअर खरेदी करून त्याच दिवशी त्याला पुन्हा विकता तेव्हा त्याला इंट्राडे इन्वेस्टमेंट म्हणतात.

जेव्हा शेअर काही दिवस तसाच ठेवून एका दिवसापेक्षा जास्त किंवा काही महिन्यात विकला तर त्याला शॉर्ट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतात. जेव्हा सहा महिन्यानंतर तोच शेअर विकला तर त्याला लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट टर्म इन्व्हेस्टमेंट म्हणतात ही सर्व माहिती होती स्टॉक संदर्भात.

आता प्रश्न पडतो स्टॉक ची खरेदी विक्री कशी होते पूर्वी शेअरची खरेदी विक्री कागदपत्रांद्वारे होत असे ही प्रोसेस खूप किचकट होती पण सध्या हे काम ऑनलाईन मोबाईल चे किंवा लॅपटॉप च्या माध्यमातून काही सेकंदांमध्ये करता येतं. तुम्हाला जो शेअर खरेदी करायचा आहे त्यावर क्लिक करून बाय किंवा सेल करू शकता.

शेअर खरेदी विक्री तुमचा ब्रोकर मॅनेज करतो त्यासाठी प्रत्येक ट्रेडर शेअर खरेदी-विक्री करण्यासाठी डिमॅट अकाउंट ओपन करावे लागतं. ज्याप्रमाणे बँक अकाउंट असते अगदी त्याचप्रमाणे डिमॅट अकाउंट असतं. बँक अकाउंट वरून तुमचे पैसे डिमॅट अकाउंट वर ट्रान्सफर होतात व ज्या किमतीचा शेअर तुम्ही परचेस करता तेवढे पैसे डिमॅट अकाउंट वरून concern शेअर होल्डर कडे ट्रान्सफर होता.

त्याच्या उलट जेव्हा शेअरची विक्री कराल तेव्हा तुमच्या डिमॅट अकाउंट वरती तेवढे पैसे जमा होतील. काही ठिकाणी डिमॅट अकाउंट ओपन करणे फ्री असते पण त्यांचे ब्रोकरेज जास्त असते. म्हणजेच सुरुवातीचे पाचशे रुपये वाचवण्यासाठी पुढे आपण हजारो लाखो रुपये खर्च करतो कारण सुरुवातीला एवढी माहिती नसते की ब्रोकर तुमच्या टोटल ट्रेडिंग मधील काही पर्सेंट रक्कम स्वतःकडे ठेवत आहे.

अकाउंट ओपन करताना डिटेल्स पाहायला विसरू नका कोणतीही कंपनी स्वतःचे निगेटिव्ह पॉईंट्स सांगत नाही कशाप्रकारे तुमच्याकडून जास्त पैसे घेणार आहेत त्याची माहिती देतो मला देत नाही प्रत्येक जण फक्त स्वतःच्या चांगल्या गोष्टी सांगतो एकदा त्यांच्या कंडीशन वाचून पहा त्यांची चार्ज करण्याची पद्धत पहा.

मी ट्रेडिंग साठी झिरोधा (Zerodha) डिमॅट अकाउंट युज करतो. कारण त्यांचे ब्रोकरेज सर्वात कमी आहे, कोणत्याही प्रकारची हिडेन चार्जेस तुमच्याकडून घेत नाही. या क्षेत्रातील सर्वात मोठ्या कंपन्या पैकी झिरोधा (Zerodha) एक नामांकित कंपनी आहे. तुम्हालाही झेरोधा मधून अकाउंट ओपन करायचे असेल तर apply करू शकता.

खूप सोपी पद्धत आहे काही मिनिटातच डिटेल्स भरून होतील त्या सोबत तुमच्या फोन नंबर वर झेरोधा ची टीम कॉल करेल. तुम्हाला व्यवस्थित माहिती सांगेल जरी तुम्हाला शेअर मार्केट बद्दल काहीही नॉलेज असेल तरीही झिरोधा चे मॅनेजर सर्व काही समजावून सांगतील. ते ही विनामूल्य.

सेन्सेक्स व निफ्टी म्हणजे काय असते? सुरवातीला आपण BSE आणि NSE ची माहिती मिळवली होती, त्याच्याशी निगडितच आहे सेंसेक्स निफ्टी. बी. एस. ई मध्ये जवळपास पाच हजार कंपन्या लिस्टेड आहेत. बी.एस.ई 5000 कंपनीच्या शेअरची तुलना करू शकत नाही.

त्यासाठी पाच हजार मधून 30 कंपन्या निवडल्या जातात, त्या 30 कंपन्या वेगवेगळ्या क्षेत्रातील असतात. उदाहरणार्थ फार्म, आयटी, इंजीनियरिंग ज्या इतर कंपन्यांच्या तुलनेत टॉप पोझिशन वर असतात. यामध्ये त्यांचा ट्रॅक रेकॉर्ड, टोटल इन्वेस्टमेंट, त्यांची ग्रोथ, लिडींग कॅपॅसिटी, मॅनेजमेंट अशा अनेक मुद्द्यांचा विचार केला जातो व फायनली त्यानुसार या 30 कंपन्या निवडल्या जातात.

या कंपन्या कशा परफॉर्म करतात त्याची कॅल्क्युलेशन केले जाते. तीस कंपन्यांच्या स्टॉक चे अवरेज करून एक कॅल्क्युलेशन द्वारे सेन्सेक्स फायनल केला जातो, सोप्या भाषेत या 30 कंपन्या इंडिकेट करतात की मार्केटमध्ये तेजी आहे की मंदी आहे. यालाच इंडेक्स असं म्हटलं जातं. NSE मध्ये सुद्धा सेम प्रोसिजर आहे.

फक्त बदल होतो आकड्यांचा NSE मध्ये टोटल सोळाशे कंपन्या लिस्टेड आहे. या 1600 कंपन्या मधून 50 कंपण्यांचा वेगळा group बनवला जातो हा ग्रुप पूर्ण NSE ला रिप्रेझेन्ट करतो या ग्रुप ला नाव देण्यात आलं निफ्टी. सेंसेक्स व निफ्टी हा इंडेक्स रिप्रेझेंट करतो व शेअर मार्केटच्या कॅल्क्युलेशन साठी हे दोन्ही खूप महत्त्वाचा रोल प्ले करतात.

पुढचा प्रश्न निर्माण होतो शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक का करावी सध्याची परिस्थिती पाहता गुंतवणूक करणे खूप महत्त्वाचा विषय व कठीण विषय बनत चालला आहे. कारण बँकेमध्ये केलेल्या FD चे रिटन्स फक्त सहा ते सात टक्के मिळत आहेत. एक वर्षानंतर सहा ते सात टक्के रिटन खूप कमी होतात, म्हणजे तुमची रक्कम डबल करण्यासाठी किमान आठ ते दहा वर्षे वाट बघावी लागते.

त्यासोबतच बँकांच्या इतर स्किम सुद्धा जवळपास सारख्याच रिटन देतात. रियल इस्टेट मधून चांगले रिटर्न मिळू शकतात पण त्यामध्ये करावी लागणारी गुंतवणूक खूप मोठी असते. एखादा फ्लॅट किंवा बंगला विकत घेण्यासाठी किमान वीस लाख रुपये गुंतवणूक करावी लागते आणि प्रत्येकाला एवढी मोठी गुंतवणूक करणे शक्य नसते.

म्हणून शेअर मार्केट सर्वात योग्य मार्ग मानला जातो. यामध्ये काही दिवसातच तुम्ही तुमचे पैसे डबल करू शकता. एक सामान्य माणूसही किमान वर्षभर तरी त्याचे पैसे डबल करू शकतो गरज आहे विचारपूर्वक गुंतवणूक करण्याची शेअर मार्केट जुगार नाही एक कौशल्य आहे. त्यामध्ये डोक्याचा वापर होतो.

पहिले डिमॅट अकाउंट ओपन करा व हळूहळू गुंतवणूक करायला सुरुवात करा. पाच हजार रुपये वेगवेगळ्या शेअर्समध्ये गुंतवा शेअरच्या किमती वाढणे किंवा कमी होणे यावरून तुम्हाला ॲटोमॅटीक मार्केटचा अंदाज येत जाईल सस्वतःवर विश्वास ठेवा व आजपासूनच कामाला लागा. लेखक शेअर मार्केट मधील अनुभवी व्यक्तिमत्व असून अनेक वर्षांपासून ट्रेडिंग चा अनुभव आहे.

1 thought on “शेअर मार्केट, स्टॉक मार्केट बद्दल बेसिक इन्फॉर्मेशन (मूलभूत माहिती)।। ज्यांना शेअर मार्केट जुगार वाटतो त्यांचा गैरसमज फक्त दहा मिनिटांमध्ये दूर होईल !

Comments are closed.