जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी ।। शासकीय मोजणी अर्ज नमुना, मोजणी फी।। आपल्या गावांमध्ये सध्या चालू महिन्यामध्ये कोणी अश्या प्रकारच्या शासकीय मोजणी साठी अर्ज केला आहे, ती माहिती ऑनलाईन कशी पहावी त्याविषयीची माहिती !

शेती शैक्षणिक

मित्रांनो अनेक शेतकरी बांधवांच्या मनामध्ये आपल्या जमिनीचे क्षेत्रफळाबद्दल अनेक प्रकारच्या शंका आणि अडचणी असतात, जसे सातबारावर जेवढी जमीन आहे, जेवढे क्षेत्रफळ आहे, तेवढी प्रत्यक्षात जमीन त्याच्या कब्जामध्ये आहे किंवा एखाद्या शेतकऱ्याने शेजारी, शेतकऱ्यांने त्याच्या जमिनीवर अतिक्रमण केलेले आहे का?

यासाठी आपल्या जमिनीची शासकीय मोजणी करून घ्यावी अशी प्रत्येकाची इच्छा असते परंतु माहितीच्या अभावामुळे अशा प्रकारची शासकीय मोजणी कशी करावी याची माहिती शेतकऱ्यांना नसते, त्यामुळे मित्रांनो अशा प्रकारची शासकीय मोजणी करण्यासाठी मोजणीचा अर्ज कशा प्रकारे भरावा? त्यासाठी कोणकोणती कागदपत्रे लागणार? शुल्क किती लागणार?

यामुळे तुमच्या गावात कोणत्या शेतकऱ्यांनी अशा शासकीय मोजणी साठी अर्ज केलेला आहे? याची सुद्धा माहिती आपण ऑनलाईन कशी पहावी या विषयीची सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत. त्यासाठी https://bhumiabhilekh.maharashtra.gov.in या लिंक वरून जाऊन अर्ज डाउनलोड करावा.

शासकीय मोजणीसाठीचा नमुना भरून तो अर्ज आपल्या उपअधीक्षक भूमी अभिलेख यांच्याकडे जमा करावयाचा आहे आणि जर तुम्ही शहरी भागातली असाल तर नगर भूमापन अधिकारी यांच्याकडे तुम्हाला अर्ज जमा करावा लागणार आहे. तर या फॉर्म मध्ये ता. आणि जिल्हा या ठिकाणी तुम्हाला तुमच्या तालुका आणि जिल्हा भरावयाचा आहे, श्री /श्रीमती च्यापुढे तुम्हाला संपूर्ण नाव आणि खाली संपूर्ण पत्ता भरावा लागेल.

तर मित्रांनो मोजणी करण्यासंदर्भात ची माहिती व मोजणी प्रकार या ठिकाणी मोजणीचा प्रकार लिहायचा आहे. मित्रांनो मोजणीचे तीन प्रकार असतात. 1.साधी मोजणी आहे, या मोजण्यासाठी शुल्क सुद्धा कमी लागते परंतु कालावधी सहा महिन्याचा असतो, सहा महिन्याच्या आत मोजणी आपणास करून दिली जाते.

2.तातडीची मोजणी यासाठी तीन महिने कालावधी लागतो आणि 3.अती तातडीची मोजणी याला दोन महिन्याचा कालावधी यासाठी लागतो. तर मित्रांनो या कालावधीमध्ये तुम्हाला ज्या प्रकारची मोजणी आवश्यक आहे ते तुम्ही टाकु शकता. उद्देश मध्ये कशासाठी तुम्हाला मोजणी करावयाची आहे,

तुम्हाला तुमच्या शेताची हद्द कायम करायची आहे किंवा अतिक्रमण केलेली आहे ते पाहायचे आहे असे याठिकाणी तुम्ही उद्देश भरावयाचा आहे. तुमचा तालुका गाव आणि गट नंबर तुमच्या शेताचा सर्वे नंबर या ठिकाणी व्यवस्थित भरावयाचा आहे. मित्रांनो आता महत्त्वाची माहिती पाहा:

या अर्जातील सरकारी खजिन्यात भरलेली मोजणी फीची रक्कम, चलन पावती क्रमांक व दिनांक ज्या वेळेस तुम्ही हा अर्ज भुमिअभिलेख कार्यालयांमध्ये जमा करण्यासाठी जाणार आहे त्या वेळेस तुम्हाला तुमच्या जमीनीचे एकूण क्षेत्रफळ आणि त्यासाठी लागणारी शासकीय मोजणीची शुल्क फी किती आहे त्याची माहिती दिली जाईल आणि ते शुल्क कोणत्या अकाउंट मध्ये भरावे यासाठी एक चलन दिले जाईल.

तर ते चलन भरल्याची पावती दिनांक, दिनांक या ठिकाणी तुम्हाला व्यवस्थित भरावयाचा आहे, त्यानंतर जमिनीच्या 7/12 मध्ये ज्या सर्व व्यक्तींची नावे आहेत त्या सर्व जणांना बोलावून त्यांचे पत्ते घेऊन त्यांची स्वाक्षरी त्या ठिकाणी घ्यावयाची आहे, आता पाच नंबरच्या मुद्द्यांमध्ये लगतच्या कब्जेधारकाची नावे लिहायची आहे.

ज्यावेळेस तुमची अशी शासकीय मोजणी करावयाची आहे, त्यावेळेस तुमच्या शेतीच्या पूर्व-पश्चिम -उत्तर – दक्षिण या चारही बाजूला असणाऱ्या शेतकऱ्यांची नावे आणि पत्ते मोबाईल क्रमांकासह तुम्हाला या ठिकाणी भरावयाची आहे, या अर्जासोबत तुम्हाला कोण कोणती कागदपत्रे जोडावी लागणार आहे ते पहा:

‌प्रस्तुत अर्ज, प्रस्तुत अर्जावर तुम्हाला टिक करावयाची आहे. तुम्हाला मोजणी फी भरणे बाबत चलन पावती सुद्धा या अर्जासोबत तुम्हाला जोडावयाची आहे आणि तीन महिन्यात तलाठी यांची स्वाक्षरी असलेले सातबारा तुम्हाला या अर्जासोबत जोडावे लागणार आहेत सर्व कागदपत्रे व्यवस्थित जोडल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी दिनांक टाकून अर्जदाराची स्वाक्षरी च्या वरती तुमची सही करायची आहे

आणि अंगठा असेल तर हअंगठयाचा निशाणा त्या ठिकाणी द्यावयाचा आहे, संपूर्ण अर्ज काळजीपूर्वक भरून मित्रांनो तुम्हाला उपअधीक्षक भूमिअभिलेख तालुका यांच्याकडे अर्ज जमा करावयाचा आहे आणि जमा करताना मित्रांनो एक काळजी घ्यावयाची आहे अर्जासोबत जी जी कागदपत्र जोडलेली आहे त्याच्या झेरॉक्स वर सही मारून तुम्हाला एक बंच तयार करावयाचा आहे

आणि त्या बंच वर भुमी अभिलेख अधीक्षक यांच्याकडे अर्ज जमा केल्याचे एक रीतसर पोच घ्यायचे आहे त्या पोच पावतीच्या आधारे तुम्ही पुढील कार्यवाही करू शकतात. त्यानंतर आपल्या गावांमध्ये सध्या चालू महिन्यामध्ये कोणी अश्या प्रकारच्या शासकीय मोजणी साठी अर्ज केला आहे, ती माहिती ऑनलाईन कशी पहावी

त्याविषयीची माहिती आपण पुढे पाहू या, ती माहिती पाहण्यासाठी आपल्याला गुगलच्या सर्च बार मध्ये टाईप करायचा आहे. Emojani फक्त आपल्याला ई मोजणी टाईप करून सर्च करायचा आहे, ई मोजणी सर्च केल्यानंतर आपल्या समोर पहिले टॅब दिसत आहे, ई मोजणी भूमि अभिलेख विभाग या टॅब वरती आपल्याला क्क्लिक करायचं आहे.

तुम्ही जर मोबाईल वरून हे करत असाल तर तुम्हाला या टॅब वर क्लिक केल्यानंतर डेस्कस्टॉप साईट वर जावे लागणार आहे. तरी उजव्या हाताला जे तीन टिंब दिसत आहे त्यावर क्लिक करून आपल्याला डेस्कटॉप साइटवर क्लिक करायचे आहे. डेस्कटॉप साईट वर क्लिक केल्यानंतर एक पेज आपणासमोर ओपन झालेले दिसेल, आता आपण नागरिकांसाठी या टॅब वर क्लिक करायचे आहे,

मित्रांनो नागरिकांसाठी यावर क्लिक केल्यानंतर आता प्रतीक्षा यादी आणि मोजणी फी अशा प्रकारच्या दोन टॅब दिलेल्या आहेत. तर आपल्याला प्रतीक्षायादी वरती क्लिक करायचे आहे, प्रतीक्षा यादीवर क्लिक केल्यावर आपणास आपला जिल्ह्य निवडावयाचा आहे, तालुक्याची आपल्याला निवड करायची आहे,

त्यानंतर गाव निवडायचे आहे, संपूर्ण माहिती भरल्यानंतर आपल्याला अर्जदाराचे नाव वरती क्लिक करायचं आहे, निवडा वरती क्लिक केल्यानंतर आपल्याला ज्या गावांची आपण निवड केलेली आहे त्या गावांमध्ये अशा प्रकारच्या शासकीय मोजणी साठी ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे त्या शेतकऱ्यांच्या अधिक ची माहिती किंवा अर्जाची स्थिती जाणून घेण्यासाठी आपणाला एका शेतकऱ्याच्या नावावरती क्लिक करायचा आहे.

या शेतकऱ्याच्या नावा वरती क्लिक केल्यानंतर आपण शोधा वरती क्लिक करणार आहोत, शोधा वरती क्लिक केल्यानंतर, कालावधी म्हणजे अति तातडीच्या मोजणीसाठी, ज्या शेतकऱ्यांनी अर्ज केलेला आहे, उद्देश काय आहे तालुका, गावाचं नाव आणि त्या शेतकऱ्याच्या जमिनीचा सर्वे नंबर ही सर्व माहीती दिसते.

अशाच प्रकारे शासकीय मोजणी करण्यासाठी आपणास किती शुल्क फी द्यावे लागेल याची सुद्धा माहिती आपणास या वेबसाईट वरती मोजणी फी या टॅबवर क्लिक करून पाहू शकतो परंतु ही फी सर्व शेतकऱ्यांसाठी सारखीच आहे. साध्या मोजणीसाठी ही एक हजार रुपये प्रति हेक्‍टरी आहे, तातडीच्या मोजणीसाठी दोन हजार रुपये प्रति हेक्टरी आणि अती तातडीच्या मोजणीसाठी तीन हजार रुपये प्रति हेक्‍टरी आपणास शुल्क फी द्यावी लागणार आहे.

अशाप्रकारे आपण शासकीय जमिनीसाठी आपल्या गावांमध्ये चालू महिन्यामध्ये कोणत्या शेतकऱ्याने ऑनलाईन अर्ज केलेला आहे ते पाहू शकतो, व आपणास शासकीय जमिनीची नोंदणी करावयाची असल्यास कोणत्या प्रकारे नोंदणी करायची ही सविस्तर माहिती आपण या लेखांमध्ये पाहिली आहे. मित्रांनो वरील माहिती आवडल्यास नक्की लाईक आणि शेअर करा.

3 thoughts on “जमिनीची शासकीय मोजणी कशी करावी ।। शासकीय मोजणी अर्ज नमुना, मोजणी फी।। आपल्या गावांमध्ये सध्या चालू महिन्यामध्ये कोणी अश्या प्रकारच्या शासकीय मोजणी साठी अर्ज केला आहे, ती माहिती ऑनलाईन कशी पहावी त्याविषयीची माहिती !

  1. सर तुम्ही जमिनी विषयी फारच उपयुक्त अशी माहिती देत असता.अशीच माहिती शेतकरी वर्गाला देत जा, कारण ह्या कमी शिकलेल्या वर्गाची तलाठी आणि जमीनदार वर्गाकडून नेहमीच फसवणूक होत असते.

  2. महत्वपूर्ण माहिती धन्यवाद ।।

Comments are closed.