आजोबा आणि आजोबांचे भाऊ यांच्या मिळकतीची वाटणी झाल्यानंतर आजोबांच्या वाट्याला आलेल्या सातबाऱ्यात भावाचं नाव कायम आहे आणि भावाच्या हिस्स्यात आलेले सातबाऱ्यात मात्र आजोबांचं नाव निघून गेले आहे तर अशा परिस्थितीत काय करता येईल?।। नोटरी साठे करार आणि ताबा पावती असलेला माणूस आता फरार आहे तर त्याच्या आधारे सातबारावरील इतर अधिकारांमध्ये आपल्याला नाव लावून घेता येईल का? ।। स्त्रीने घेतलेल्या जमिनीचा बक्षीस पत्र रद्द होऊ शकते का?।। नोंदणीकृत साठे करार आणि पावर ऑफ ऍटर्नी याची मुदत किती असते?।। या प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

पहिला प्रश्न- आजोबा आणि आजोबांचे भाऊ, यांच्या मिळकतीची वाटणी झाली. मात्र त्यानंतर आजोबांच्या मिळकत वाटण्याला किंवा वाटेला आलेल्या जे सातबारे आहेत, त्या भावाचं नाव कायम आहे. आणि भावाच्या हिस्सा यात आलेले सातबारे केले त्यावर मात्र आजोबांचं नाव निघून गेले आहे. तर अशा परिस्थितीत काय करता येईल?

उत्तर: असे अंदाज करु की आपल्याला आजोबांच्या सातबारावर त्याच्या भावाचं नाव कमी कसे करता येईल? ही माहिती अपेक्षित आहे. आता आजोबा आणि त्यांचे बंधू यांच्यामध्ये जी काय वाटणी झाली. त्या करता जर फेरफार पडला असेल किंवा त्या करता जर स्वतंत्र वाटणीपत्र झाला असेल.

तर असा वाटणीपत्र नोंदणीकृत असणे अत्यंत आवश्यक आहे. असा जर वाटणी पत्र नोंदणीकृत नसेल तर त्याचा विशेष फायदा आपल्याला घेता येणार नाही. पण जर वाटणीपत्र नोंदणीकृत असेल आणि तरी सुद्धा आजोबांच्या सातबारावर जर भावाचं नाव कायम असेल,

तर त्या नोंदणीकृत सातबाराच्या आधारे, आपण जो फेरफार पार पडला त्याला आव्हान देऊ शकता. किंवा त्या वाटणी पत्राच्या आधारे विवक्षित सातबारा मधून त्या माणसाचं नाव कमी करण्याकरता आपण अर्ज देखील देऊ शकतो. आता अर्ज दिल्यावर तो मंजूर होतो कि नाही, ही पुढची गोष्ट आहे.

अर्ज दिल्यावर जर मंजूर झाला, प्रश्न मिटला. जर तो नामंजूर झाला तर त्याविरोधात परत अपील करण्याची संधी देखील आपल्याला आहे. पण सर्वप्रथम आपण याची कार्यवाही सुरू करणं आवश्यक आहे. कारण काहीतरी केलं तर काहीतरी होण्याची शक्यता आहे.

काहीच नाही केलं तर निश्चितपणे काही होणार नाही. त्यामुळे आपल्याला आपल्या मिळकतीत हक्क जर हवा असेल आणि तो हक्क निरवैद्ध होण्याकरता जर त्रयस्थ व्यक्तीच नाव कमी करायचा असेल, तर त्याकरता लवकरात लवकर अर्ज किंवा अपील आपण दाखल करणे अत्यंत आवश्यक आहे.

दुसरा प्रश्न- नोटरी साठे करार आणि ताबा पावती आहे आणि ज्या माणसाकडे ते आहे तो माणूस आता फरार झालेला आहे तर त्याच्या आधारे सातबारावरील इतर अधिकारांमध्ये आपल्याला नाव लावून घेता येईल का? उत्तर: सगळ्यात पहिल्यांदा एक लक्षात घेतलं पाहिजे की,

साठे करार किंवा कोणताही करार हा नोंदणीकृत जर असेल तर त्याला कायदेशीर आणि वैध स्वरूप प्राप्त होतं. कोणताही करार जर नोटराईज असेल तर तो नोंदणी कायद्यानुसार हा वैध करणार मानला जात नाही. त्यामुळे अशा अवैध किंवा बेकायदेशीर करांचा बोजा किंवा नोंद इतर अधिकारांमध्ये येण्याची शक्यता अत्यंत कमी आहे.

मात्र त्या जमिनीची ताबा पावती आपल्याकडे आहे. आणि त्या जमीनीचा ताबा खरोखर आपल्याकडे असेल. तर त्या जमीनीचा ताबा तुमच्याकडे आहे, म्हणून उतारा बारा म्हणजे पीक पाहणी उतारा. किंवा उतारा सात अ, म्हणजे भोगवटदारा व्यतिरिक्त जमीन ज्याच्या ताब्यात आहे,

त्याची नावं जिथं नोंदली जातात तो उतारा म्हणजे साथ अ. सात अ आणि बारा या उतारा मध्ये ताबेदार किंवा कब्जेदार म्हणून नाव लागण्याकरता आपण अर्ज करू शकता. आपल्याकडे जर पुरेसे पुरावे आणि कागदपत्र असतील तर त्या जमिनीच्या उतारा सात अ आणि उतारा बारा म्हणजे पीक पाणी उतारा यावर आपलं नाव येण्याची दाट शक्यता आहे.

तिसरा प्रश्न- स्त्रीने घेतलेल्या जमिनीचा बक्षीस पत्र रद्द होऊ शकते का? उत्तर: आता यात स्त्री किंवा पुरुषाने हा कायदेशीर दृष्ट्या मुद्दाच येत नाही. कायद्यानं स्त्री किंवा पुरूष या मधे तसा काही फार फरक पडत नाही. त्यामुळे बक्षीस पत्र रद्द होऊ शकता किंवा नाही एवढ्यापुरताच हा प्रश्न मर्यादित होतो. बक्षीस पत्र रद्द होऊ शकतो किंवा नाही?

हे कशावर अवलंबून आहे. तर ते बक्षीस पत्र वैध आहे का नाही, याच्यावर अवलंबून आहे. जर ते बक्षीस पत्र कोणत्याही कारणाने अवैध असेल किंवा कोणत्याही कायदेशीर तरतुदींचा भंग त्याद्वारे झालेला असेल. तर अशा बक्षीस पत्र रद्द करून घेता येऊ शकते.

मात्र बक्षीस पत्र जर ते नोंदणीकृत असेल किंवा नोंदणी कृत नसेलही. तरी त्याच्या विरुद्ध जर आपल्याला कार्यवाही करायची झाली तर आपल्याला सक्षम दिवाणी न्यायालय मध्ये दावा दाखल करणं अत्यंत आवश्यक आहे. तो एकदा दावा दाखल केला कि मग ती कार्यवाही पुढे सुरू होईल.

मग ते बक्षीस पत्र रद्द होतं, नाही होत. मग त्या विरोधात अपील, हा सगळा पुढचा भाग आहे. पण ‌पहिल्यांदा जर एखाद बक्षीस पत्र तुमच्या विरोधात आहे. तुमच्या आयुक्तांच्या विरोधात आहे. असं जर आपलं मत असेल तर सर्वप्रथम अशा बक्षीस पत्राला सक्षम दिवाणी न्यायालयामध्ये आव्हान देणं हे आपलं प्रथम कार्य ठरतं.

चौथा प्रश्न- नोंदणीकृत साठे करार आणि पावर ऑफ ऍटर्नी याची मुदत किती असते? उत्तर: आता कस असत साठे करार किंवा पावरऑफ ऍटर्नी किंवा कोणताही एखादा नोंदणीकृत दस्त, हा एकदा नोंदवला गेला की त्याची नोंदणी कायम राहते. उदाहरणार्थ एखाद्या पावर ऑफ ऍटर्नी नोंदवताना असं लिहिलं असेल,

की ही पवार ऑफ ऍटर्नी पाच वर्षांनंतर दिलेली आहे. पाच वर्षा नंतर कायदेशीरदृष्ट्या ती पावर आपोआप लॅप्स् होत असली. म्हणजे संपत असली, तरी नोंदणी कार्यालयामध्ये त्याची नोंदणी झालेली आहे आणि जे त्याची माहिती अद्यावत झालेली आहे. ते रेकॉर्ड आणि ती माहिती तशीच राहते.

आता एखाद्या नोंदणीकृत दस्तांची माहिती आपल्याला काढून टाकायचे असेल. तर त्याला काय उपाय आहे? त्याला दोन उपाय आहेत एक म्हणजे तो दस्त रीतसर रद्द लेखांनी म्हणजे डीड ओफ कॅन्सलेशन नी रद्द करुन घ्यायचा. किंवा तो दस्त अवैध असल्याचं किंवा आता वैध नसल्याचं किंवा संपुष्टात आल्याचं सक्षम दिवाणी न्यायालयाच हुकूम घेऊन यायचं.

या दोन पैकी एखादी गोष्ट जोवर होत नाही. तोवर प्रत्येक नोंदणीकृत दस्त आणि प्रत्येक नोंदणीकृत दस्तांची नोंदणी, ही कायम राहते. आणि कोणत्या ही माणसाणे त्या मिळकतीचा शोध घेतला. तर त्याला त्या शोधामध्ये त्या दस्तांची माहिती आपसूकच मिळते. त्यामुळे एखाद्या दस्तांची मुद्दत किती? हे त्या दस्तात जरी नोंदलेले असेल तरी त्याचा रद्द लेख किंवा सक्षम दिवानी न्यायालयाचा हुकूम जोवर होत नाही, तोवर तो दस्त आणि त्याची नोंदणी कायम राहते.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.