एखाद्या जमीनीतून कालवा न जाता सुद्धा त्या जमिनीचे क्षेत्र त्या कालव्या करता म्हणून कमी झाल्यास काय करावे? ।। वडील हयात असताना त्यांच्या जमिनीवर मुलाचे नाव लागेल का?।। चुकीच्या वाटपावर दावा करता येतो का?।।आजोबांचे कुळ कमी झाल्यावर कसणे सुरू असल्यास काय करावे?।।वडिलोपार्जित जमिनीतील ह’क्क सोडता येतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

प्रश्न 1: एखाद्या जमीनीतून कालवा न जाता सुद्धा त्या जमिनीचे क्षेत्र त्या कालव्या करता म्हणून कमी झाल्यास काय करावे? उत्तर:- एखादी गोष्ट कागदोपत्री आणि प्रत्यक्षात या दोन्ही स्वरूपामध्ये काही वेळेला फरक येतो म्हणजेच कागदोपत्री एखाद्या वेळेला एखाद्या जागी मध्ये एक क्षेत्रफळ दाखवण्यात येतं मात्र प्रत्यक्षात त्या जागे करता वेगळ क्षेत्रफळ आकारण्यात आलेलं असतं.

उदाहरणार्थ ज्या जमिनीतून कालवा गेला आहे आणि त्याच्या क्षेत्रफळांमध्ये म्हणजेच कागदोपत्री दाखविण्यात आलेल्या क्षेत्रफळ आणि प्रत्यक्षातील क्षेत्रफळ यामध्ये फरक वाटत असेल तर ती दुरुस्त करता येते याकरता आपल्याला जी जमीन कालवा झालेली आहे ती जमिनीच्या कोणत्या स्वरूपामध्ये मध्ये क्षेत्रफळ झालेले आहे जर आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्याच्या करता आपल्याला त्या जागेची रीतसर मोजणी करून त्याचे क्षेत्रफळ आणि चतु:सीमा निश्चित करणे आवश्यक आहे.

अशा कोणत्याही समस्या उद्भवल्यास जर आपण त्या जागेच्या मोजणी केली, त्याचे क्षेत्रफळ निश्चित केलं, तिच्या अनुषंगाने मग आपण त्या महसुली अभिलेखामध्ये जी काही तफावत झालेली आहे त्यात सुद्धा आपण दुरुस्ती करून घेऊ शकता.म्हणजेच कोणत्याही कारणांनी कागदोपत्री किंवा प्रत्यक्षातल्या क्षेत्रफळ यामध्ये फरक असल्यास दुरूस्त करण्याकरता त्या जागेची प्रत्यक्षात मोजणी करणे अत्यंत आवश्यक आहे.

प्रश्न 2:- वडील हयात असताना त्यांच्या जमिनीवर मुलाचे नाव लागेल का? उत्तर:- यामध्ये आता जमिनी या दोन प्रकारचे असू शकतात. एक म्हणजे वडिलोपार्जित आणि दुसरी म्हणजे स्वकष्टार्जित. स्वकष्टार्जित जर जमीन असेल तर त्या संदर्भात काहीही करण्याचा अधिकार हा त्या मालकाला असतो.

स्वकष्टार्जित जमीन असल्यास आणि वडील हयात असल्यास त्यावर मुलाचे किंवा इतर कुणाचा ही नाव लागणे तसे शक्य नाही. वडिलोपार्जित जमिनी मध्ये कुटुंबातील प्रत्येक सदस्याला सामायिक आणि विभाजित हक्क असतो,जर एखाद्या संपत्तीवर आपला हक्क आणि अधिकार निर्धारित करण्याकरता आपण दावा दिला

आणि त्या दाव्याला जर यश आलं तर त्याचा स्वतंत्र हक्क आणि हिस्सा सातबारा मध्ये येऊ शकतो किंवा जर एखादी व्यक्ती हयात असताना वडिलोपार्जित मालमत्ता बद्दल काही हक्क किंवा हिस्सा कराराने तो हस्तांतरित केला तर अशा वेळेस सुद्धा त्या तिसर्‍या व्यक्तीचे नाव सातबारामध्ये किंवा महसुली अभिलेखा मध्ये येऊ शकत.

वडिलोपार्जित जमिनी मध्ये नाव येण्याकरता एकतर वाटपाचा दावा किंवा हक्क निश्चिती किंवा नोंदणीकृत कराराद्वारे हस्तांतरण या दोन गोष्टी आवश्यक आहे आणि जर स्वकष्टार्जित मालमत्ता असेल तर मात्र जोवर जवळच्या मालमत्तेचे हस्तांतरण होत नाही तर असं नाव येण हे जवळपास अशक्य आहे.

प्रश्न 3:- चुकीच्या वाटपावर दावा करता येतो का? उत्तर:- वाटप दोन प्रकारचा असू शकतो. एक आहे वाटपपत्र आणि दुसरा आहे वाटपाचा दावा. आता जर वाटप पत्र चुकीचं झालं असेल तर करारामध्ये काही त्रुटी असतील किंवा काही अन्य अन्याय झाला असेल तर त्याच्या विरोधात आपल्याला सक्षम दिवाणी न्या’यालयामध्ये मध्ये दावा दाखल करून निश्चितपणे दाद मागता येईल.

मात्र जे वाटप झालेले आहे ते आपल्याला चुकीचं वाटत आहे , जर को’र्टाच्या आदेशानुसार करण्यात आलेले असेल तर त्याच्या विरोधात आपल्याला उ’च्च न्या’यालयामध्ये दाद मागावी लागेल.म्हणजेच अ’पील दाखल करावे लागेल म्हणजे तो एकच रस्ता त्या आदे’शाविरुद्ध किंवा त्या आदेशात दुरुस्ती करण्याकरता उपलब्ध आहे

म्हणजे जर वाटपपत्राने वाटणी झाली असेल तर ते आपण वाटपपत्र दुरुस्ती सिद्ध करू शकतो किंवा त्याच्या विरोधात न्या’यालयात दाद मागू शकतो. मात्र न्या’यालयाच्या आदेशानेच वाटप झालेले असेल आणि ते आपल्याला मंजूर नसेल तर मात्र असे करण्यापासून दुसरा आपल्याकडे कोणताही पर्याय नाही.

प्रश्न 4:- आजोबांचे कुळ कमी झाल्यावर कसणे सुरू असल्यास काय करावे? उत्तर:- कुळ कमी का झाल?आणि आता कसत आहे याची आपल्याला सांगड घालावी लागेल.कुळ कमी का झाला याचा आपण महसुली अभिलेखात आणि इतरत्र शोध घेतला पाहिजे, एखाद्या आदेशाने किंवा फेरफार नोंदीने कमी झाला असेल तर त्या विरोधात आपण योग्य ठिकाणी अपील करून दाद मागावी लागेल.

हे झालं कमी झाल्यास त्या संदर्भात पण जर एखादी व्यक्ती जर आज रोजी सुद्धा जमीन कसत असेल तर ती व्यक्ती तलाठ्याकडे आपण प्रत्यक्षात कसत असल्यामुळे आपलं नाव पिक पाहणी सदरी म्हणजेच उताऱ्यात असणाऱ्याच्या नावामध्ये सामील करण्याच्या करता अर्ज करू शकते.

म्हणजे या परिस्थितीत आपल्याला दोन भागांवर काम करावे लागेल एक म्हणजे कुळाचे नाव कमी झाला आहे त्याला घेऊन ते ज्यामुळे कमी झालेले आहे किंवा ज्या प्रकारामुळे कमी झालेला आहे त्याच्यावर योग्य ठिकाणी दाद मागायची आणि दुसरे म्हणजे आपल्या ताब्यात आहे आणि आपण कसत आहे,

तर त्या जागेच्या कसणाऱ्याच नाव लागावा म्हणून तलाठयाकडे अर्ज द्यावा आणि यापुढे जाऊन जर आपल्या ताब्याला धोका होणार असेल तर आपण आपली जमीन आपल्या ताब्यात आहे त्याबाबत आपल्याला बेकादेशीर धोका होऊ नये म्हणून आपण त्या विरोधात दाद मागून मनाईहुकूम सुद्धा घेऊ शकता.

प्रश्न 5:- वडिलोपार्जित जमिनीतील हक्क सोडता येतो का? उत्तर:- निश्चितपणे सोडता येतो.कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही मालमत्तेचा मग ती वडिलोपार्जित असो स्वकष्टार्जित असो किंवा संयुक्त असो आपला हक्क सोडायचा असल्यास तो निश्चितपणे सोडता येतो.

आता हक्क सोडण्याकरता सुद्धा एकापेक्षा जास्त पर्याय आहेत. हक्कासोड पत्र करू शकतो, ती आपण बक्षीस देऊ शकतो त्याच्या करता हक्क सोडपत्र करू शकतो, हक्कसोड करताना सुद्धा ते मोबदला न घेता किंवा मोबदला घेऊन अशा दोन्ही प्रकारे करता येतं किंवा आपल्याला ती मालमत्ता कोणाला विकायचे असेल तर विकता सुद्धा येते

किंवा त्याचं बक्षीस पत्र करायचं असेल तर बक्षीस पत्र सुद्धा करता येत, मात्र सर्वसाधारणपणे वडिलोपार्जित जमीन असेल तर त्याचे बक्षीस पत्र न होता हक्कसोडपत्र करण्याची आपल्याकडे पद्धत आहे. त्यामुळे हक्कसोडपत्र करणं हे जास्त सोयीस्कर आहे.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “एखाद्या जमीनीतून कालवा न जाता सुद्धा त्या जमिनीचे क्षेत्र त्या कालव्या करता म्हणून कमी झाल्यास काय करावे? ।। वडील हयात असताना त्यांच्या जमिनीवर मुलाचे नाव लागेल का?।। चुकीच्या वाटपावर दावा करता येतो का?।।आजोबांचे कुळ कमी झाल्यावर कसणे सुरू असल्यास काय करावे?।।वडिलोपार्जित जमिनीतील ह’क्क सोडता येतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

  1. माझा आजोबांनी 1एक एकर जमीन विकली त्यावर उपाय सुचवावा ही विनती

Comments are closed.