शून्यातून करोडपती कसे व्हायचे? ।। ५ मार्ग ज्याने तुम्ही तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न सत्यात उतरवू शकतात ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

आपण बऱ्याच ठिकाणी पाहिलं असेल किंवा ऐकलं असेल की श्रीमंत लोक अजून जास्त श्रीमंत होत चाललीत. आणि गरीब अजून गरीब होत चाललीत. पण जेव्हा आपण बघतो कि ह्या जगामध्ये 70% अब्जाधीश, शून्यातून अब्जाधीश झालेले आहेत.

म्हणजे त्यांच्याकडे काहीही नसताना फक्त स्वतः च्या मेहनतीवर त्यांनी अमाप संपत्ती मिळवलेली आहे. ह्या जगात कोणतीही व्यक्ती भलेही आत्ता त्या व्यक्तीकडे काही नाहीये पण त्याने दृढ निश्चय केला तर तो नक्कीच एक दिवस करोडपती, अब्जाधीश होवू शकतो. ह्या 70% लोकांमधील 5 कॉमन नियम आपण पाहुयात.

1. मनात 100% विश्वास असू द्या, मी नक्की करोडपती होणार:- श्रीमंत होण्याची सुरुवात तुमच्या श्रीमंत मानसिकता मधून होते. तुमच्या मनामध्ये 100% विश्वास पाहिजे की एक दिवस मी नक्की करोडपती होणार. आणि यामध्ये तुम्हाला जरा सुद्धा संशय नसावा.

आपला मराठी माणूस सर्वात मोठी चूक करतो त्याला अस वाटतच नाही की आपण सुद्धा आयुष्यात करोडपती किंवा अब्जाधीश होवू शकतो. त्याला असे वाटते करोडपती फक्त गुजराती, मारवाडी होवू शकतात. आता आपण सध्या करोडपती होण्याचा विचारच करत नसाल तर तुम्ही वास्तविक आयुष्यामध्ये कसे करोडपती होणार.

वॉरन बफेट ज्यांची ८१००+ करोड पेक्षा जास्त संपत्ती आहे, त्यांनी लहानपणी शपथ घेतली होती. की, मी जर 30 वर्षाच्या आत मिलेनिअर झालो नाही, तर मी बिल्डींग वरून उडी मारील. त्यामुळे मनात एक विचार पक्का करून ठेवा. एक दिवस मी नक्की करोडपती होणार.

2. तुमचे करोडपती होण्याचे ध्येय गाठण्यासाठी कॅल्क्युलेशन करा :- कोणतेही ध्येय गाठण्यासाठी स्वतः वर विश्वास पाहिजे. की मी ते ध्येय पुर्ण करू शकतो. एकदा का करोडपती होण्याचे ध्येय ठरवले की आता तुम्हाला थोडे कॅल्क्युलेशन करायचे आहे. कोणकोणत्या मार्गाने मी पैसे कमवू शकतो. जस की तुम्हाला 10000 लोक शोधावी लागतील.

तेव्हा तुम्ही 1000 चे प्रॉडक्ट विकू शकता. तेव्हा तुम्हाला 1करोड मिळतील. किंवा तुम्हाला 10000 असे लोक शोधावे लागतील जे तुम्हाला 100 रुपये 12 महिने देतील. तेव्हा तुम्ही माहिण्याला 10 लाख रुपये तर एका वर्षात 1.20 करोड रुपये मिळू शकता. थोडक्यात काय तर फक्त ध्येय ठरवून गप्प बसू नका, योग्य कॅल्क्युलेशन करून त्यावर काम करायला सुरुवात करा.

3. तुमचे उत्पन्नाचे मार्ग वाढवा:– एकदा तुम्ही कॅल्क्युलेशन केले की तुम्हाला जाणीव होईल करोडपती होणे जास्त अवघड नाहीये. आता तुम्हाला उत्पन्नाचे मार्गावर भर द्यायचा आहे. आज इंटरनेटच्या युगात तुम्ही अनेक मार्गाने पैसे कमवू शकता. जस की युटुब चॅनल, ॲप बनवून, ब्लॉग्ज, ऑफिलियेट मार्केटिंग, वेब डिझाईन, ई-कॉमर्स, रिअल इस्टेट, शेअर मार्केट, एखादा साईड बिझनेस, टिचींग, इत्यादी.

4. कोणत्या प्रकारच्या लोकांकडून तुम्ही पैसे मिळवू शकता, त्यांचा शोध घ्या:– स्वतः ला एक प्रश्न विचारा माझा पैसा नक्की कोणाकडे आहे? म्हणजे तुमच्या आजूबाजूला अशी कोणती लोक आहे. ज्यांना तुम्ही तुमचे प्रॉडक्ट विकू शकता, किंवा सर्व्हिस देऊ शकता. वकील, विद्यार्थी, डॉक्टर, शिक्षक, व्यावसायिक, नोकरदार, ह्यांची एक यादी बनवा.

आता तुम्ही ह्या लोकांना कोणते प्रॉडक्ट विकू शकता, किंवा त्यांना कोणती सर्व्हिस देवू शकता, किंवा असे मार्गदर्शन करू शकता, ज्याचे ते तुम्हाला पैसे देतील, ह्याचा विचार करा. असे केल्याने तुम्हाला वेगवेगळ्या कल्पना सुचतील. या जगात पैशाची कमी नाहीये. तुम्हाला फक्त योग्य नियोजन करून अशा लोकांचा शोध घ्यायचा आहे. ज्यांना तुमची गरज आहे.

5. तुमचा खिसा नेहमी रिकामा ठेवा:– तुम्ही कितीही पैसे कमवा तुमचा खिसा नेहमी रिकामा ठेवा. याचा अर्थ काय तर तुमच्याकडे पैसे यायला सुरुवात झाली की लगेच त्याची चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा. ते पैसे बँकेत साठवून ठेवू नका. कारण जेव्हा आपल्याकडे पैसे असतात तेव्हा आपण अनावश्यक खर्च करतो.

तेव्हा मग आपण गरज नसलेल्या गोष्टी सुद्धा विकत घेतो. अशाने वायफळ खर्च होतो. आणि दुसरे कारण म्हणजे जेव्हा तुम्ही पैशाला कामाला लावता तेव्हा तो पैसा अजून जास्त पैसे तुम्हाला कमवून देतो. आणि तुमची श्रीमंती कडे वाटचाल होते. बँकेत कमी पैसे असण्याचा अजून एक फायदा म्हणजे तुम्हाला अजून पैसे मिळवण्यासाठी मोटिवेशन मिळते. आणि ह्याचा फायदा तुमच्या करोडपती होण्याच्या वाटचालकडे सुखकर घेवून जाईल तुम्हाला व यशस्वी व्हाल.

वरील माहिती www.youtube.com/c/ShahanPan या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “शून्यातून करोडपती कसे व्हायचे? ।। ५ मार्ग ज्याने तुम्ही तुमचे श्रीमंत होण्याचे स्वप्न सत्यात उतरवू शकतात ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

  1. Atise sunder motivation prapt zhal kharokhar mansala sunyatun sreemanticha visvakade gheun jau sekte fkt garaj she ti drud ani khambir nischey

Comments are closed.