सिमा हैदरला भारतीय नागरिकत्व कधी मिळू शकते?

कायदा

हेरगिरीच्या आरोपांनी वेढलेली पाकिस्तानी महिला सीमा हैदरने भारतीय नागरिकत्व घेण्याचे बोलले आहे. पाकिस्तानी वंशाचा गायक अदनान सामीला भारताचे नागरिकत्व मिळू शकते तर सीमा हैदरला का नाही, असा दावा करणारी याचिका त्याचे वकील एपी सिंग यांनी दाखल केली आहे. सीमा हैदर नोएडाच्या सचिन मीनाच्या प्रेमात पडली असून भारतीय नागरिकत्व मिळाल्यानंतर तिला त्याच्यासोबत राहायचे आहे.

आज आपण सिमा हैदर भारतात राहु शकतात का? मुस्लीम धर्म सोडून हिंदु धर्मात धर्मांतर केल्या नंतर भारतीय नागरिकत्व मिळते? या शंकाबद्दल सविस्तर कायदेशीर माहिती घेणार आहोत.
काही दिवसांपूर्वी सीमा हैदरने भारतामध्ये बेकायदेशीररित्या भारतात प्रवेश केला आहे.

भारतात प्रवेश करण्यासाठी अनेक नियम आहेत जसे पासपोर्ट कायदा 1920 नुसार भारताम प्रवेश करण्यासाठी पासपोर्ट असणे आवश्यक आहे. मात्र, व्हीजा असणे आवश्यक आहे. तसेच भारतात राहण्यासाठी कायदेशीर परवानगी आवश्यक आहे. फॉरेनर्स ऍक्ट 1946 नुसार परदेशी लोक भारतात आले तर ते व्हिजाच्या कालावधीसाठीच भारतात राहू शकतात.

परंतु जर अवैधरित्या कोणी भारतात प्रवेश केला असेल तर अशा व्यक्तींना निर्वासित केले जाईल आणि त्या देशातून ती व्यक्ती आली आहे. त्या देशात परत पाठवले जाईल असा कायदा सांगतो. मात्र, परदेशी कायद्यानुसार जे लोक अवैधरित्या भारतात येतात किंवा व्हिसाच्या विहित कालावधीच्या पलीकडे भारतात राहतात तर अशा व्यक्ती विरोधात कारवाई केली जाऊ शकते. त्यांना 5 वर्षाचा कारावासही होऊ शकतो

◆सिमा हैदरला भारतीय नागरिकत्व मिळेल का?

1) एखादी व्यक्ती भारतात जन्मले असेल

2) एखाद्या भारतीय मुलाने दुसऱ्या देशातील मुलीशी लग्न केलं असेल किंवा परदेशी मुलींनी भारतीय मुलाशी लग्न केले असेल, तर अशावेळी ती व्यक्ती भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अर्ज करू शकते.

3) जर तुम्ही भारतामध्ये 11 ते 15 वर्षापर्यंत भारतात वास्तव्याला आहात, तर अशी व्यक्ती भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करु शकते.

4) नागरिकत्व दुरुस्ती कायदा त्याला पण सी. ए. ए. असे म्हणतो, त्यानुसार जर तुम्ही पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश देशांमध्ये अल्पसंख्यांक म्हणून राहत असाल आणि धर्मासाठी छळ सहन करत असाल तर भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करू शकता. परंतु या प्रकरणांमध्ये सीमा हैदर प्रकरणांमध्ये ती मुस्लिम असल्यामुळे तिला अर्ज करू शकणार नाही.

◆सिमा हैदरने धर्म बदल्यामुळे नागरिकत्व मिळेल का?
नागरिक सुधारणा कायदा म्हणतो की, जर तुम्ही पाकिस्तान, बांगलादेश, अफगाणिस्तान आणि शेजारील देशात अल्पसंख्याक म्हणून राहत असाल, म्हणजे धार्मिक अल्पसंख्याक, धर्मासाठी छळ होत असेल आणि 31 डिसेंबर 2014 पर्यंत भारतात आला असेल, तर तुम्हाला भारतीय नागरिकत्व मिळू शकते. सीमा हैदर यांना अशा प्रकारे नागरिकत्व मिळणे सोपे जाणार नाही, कारण ती पाकिस्तानमध्ये अल्पसंख्याक नव्हती.

◆राज्यघटनेद्वारे: भारतीय दंड व्यवस्था कायद्यानुसार, ज्या वेळी संविधान लागू झाले, त्या वेळी भारतात उपस्थित असलेल्या सर्व लोकांना भारतीय नागरिकत्व मिळाले, मग त्यांच्याकडे कोणतीही कागदपत्रे असतील किंवा नसतील. याशिवाय भारतात जन्मलेल्याला जन्मतःच नागरिकत्व मिळते.

◆सिमा हैदरने भारतीय नागरिकत्व कधी मिळेल?

सीमा हैदरला भारतीय नागरिकत्व कधी मिळेल यासाठी सीमा हैदरला कायदेशीर कारवाई करावी लागेल जर तिने न्यायालयात माफी मागितली असेल तर याबद्दल म्हणजे तिला नागरिकत्व देण्याचा विचार केला जाऊ शकतो..

◆सिमा हैदरने भारतीय नागरिकत्व कधी मिळेल?

तिने मान्य केले असेल तर भारत सरकार तिला निर्वासित करेल त्यानंतर तिला भारतात येण्यासाठी कायदेशीर मार्गाचा अवलंब करावा लागेल. जर तिला भारतीय पुरुषाशी लग्न करायचा असेल तर अगोदर तिला तिच्या पहिल्या पतीसोबत घटस्फोट घ्यावा लागेल. मग त्यानंतर तिला भारतीय मुलाशी लग्न करावा लागेल आणि त्यानंतर तिला भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करावा लागेल.