सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे ।। कोकण ट्रिप मध्ये या ठिकाणांचा समावेश नक्की करा ।। महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !

प्रवास

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आपले  NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज नक्की लाईक करा.

सिंधुदुर्ग हा जिल्हा पूर्वेकडून अरबी समुद्राने, दक्षिणेकडून गोवा आणि कर्नाटक तर उत्तरेकडून रत्नागिरी या जिल्ह्यांनी वेढलेला आहे. हा जिल्हा समुद्र किनारी असल्यामुळे येथील वातावरण हे नेहमी उष्ण व दमट असते. सिंधुदुर्ग हा जिल्हा महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्येचा जिल्हा म्हणून ओळखला जातो.

10. निवती बीच : निवृत्ती या नावाने देखील ओळखला जाणारा निवती हा बीच निर्जन समुद्रकिनारा म्हणून ओळखला जातो. समुद्रकिनाऱ्यावर तुम्हाला पांढरे बाळू मध्ये फिरण्याचा आनंद घेता येईल. निवती समुद्रकिनारा हा खरोखरच भाग्यशाली बीच आहे. या बीचवर आपल्याला निसर्गाने दिलेले चमकदार आणि लक्षवेधी वातावरण पाहायला मिळेल. निवती बिचच्या शेजारीच आपल्याला ऐतिहासिक पर्यटन स्थळ बघायला मिळेल. या बिचच्या शेजारी आपल्याला निवृत्तीचा किल्ला बघण्याचा आनंद घेता येईल. हा किल्ला महान मराठा शासक छत्रपती शिवाजी महाराज यांनी 1787 मध्ये बांधला होता. जर तुम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ट्रिपवर असाल तर नक्की या पर्यटनस्थळाला भेट द्या.

9. देवगड किल्ला : देवगड किल्ला संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील प्रसिद्ध किल्ला म्हणून ओळखला जातो. देवगड किल्ल्यावर किल्ल्याची तटबंदी, गणपती मंदिर, किल्ल्यावरील तोफा आणि किल्ल्यावरील विहीर ही बघण्यासारखे आहे. देवगड हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तालुक्याचे ठिकाण आहे. देवगड हे गाव देवगड हापूस आंब्यासाठी देखील प्रसिद्ध आहे. देवगड ला जाण्यासाठी मुंबई आणि पुण्यावरून रेल्वे व बसची सोय आहे. मुंबईपासून देऊळ हे ठिकाण जवळ 400 किलोमीटर एवढ्या अंतरावर आहे. कणकवली रेल्वे स्टेशन देवगडच्या जवळचे रेल्वेस्टेशन आहे.

8. सावंतवाडी राजवाडा : सावंतवाडी राजवाडा हे पर्यटनस्थळ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील महत्त्वाचे स्थळ म्हणून ओळखले जाते. हा राजवाडा 1755 ते 1803 या काळात बांधण्यात आला. सावंतवाडी शहराची शोभा वाढवणारा हा राजवाडा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुंदर पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. सावंतवाडी राजवाडा हा सध्या तीन भागात विभागलेला आहे. सध्या राजघराण्यातील लोकांचे राहण्याचे ठिकाण म्हणून, राजदरबार म्हणून आणि म्युझियम म्हणून. हा राजवाडा बघण्यासाठी वीस रुपये एवढे तिकीट आकारले जाते. सावंतवाडीला जाण्यासाठी रस्ते मार्गाने मुंबई गोवा हायवेचा वापर करून जाऊ शकतो. तर रेल्वेमार्गाने सावंतवाडी येथे रेल्वे स्टेशन आहे.

7. धामापूर तलाव : मालवण तालुक्यातील धामापूर तलाव एक रमणीय ठिकाण आहे. या ठिकाणी हिरवीगार असणारे घनदाट झाडी माड पोफळीच्या बागा आणि सर्वात महत्वाचे म्हणजे दुतर्फा डोंगरांच्या मधोमध असलेला ऐतिहासिक धामापूर तलाव! यामुळे धामापूर हे उत्कृष्ट पर्यटन केंद्र बनले आहे. धामापूर तलाव मध्ये आपण बोटिंगचा देखील आनंद घेऊ शकतो. या ऐतिहासिक धामापूर तलावाच्या काठावर भगवती देवीचे मंदिर देखील आहे. जवळ जवळ पाच एकर परिसरामध्ये विस्तरलेला हा तलाव अतिशय नितळ आणि स्वच्छ आहे. तर एक वेळेस नक्की या तलावाला एक भेट द्या.

६. कुणकेश्वर मंदिर : कुणकेश्वर मंदिर देवगड च्या जवळ आहे. या मंदिराला अतिशय सुंदर असा समुद्रकिनारा लाभलेला आहे. अतिशय स्वच्छ आणि कमी गर्दी असणारा समुद्रकिनारा म्हणून याची ओळख आहे. कोकणचा आणि समुद्राचा आनंद आपण या ठिकाणी घेऊ शकतो. कुणकेश्वर येथे श्री देव कुणकेश्वर मंदिर आहे. स्वतः छत्रपती शिवाजी महाराज यांनी या मंदिराची मारमत केलेली आहे. कुणकेश्वरला दक्षिण कोकणची काशी असे म्हटले जाते. कुणकेश्वरला जाण्यासाठी नांदगाव रेल्वे स्टेशन वरून 45 किलोमीटर पर्यंत चे अंतर कापावे लागेल. या मंदिराच्या जवळच रामेश्वर मंदिर, पाडवानी समुद्रकिनारा, भगवती मंदिर, ब्रह्मदेव मंदिर आणि सहीटोढे धबधबा अशी पर्यटनस्थळे आहेत.

5. सागरेश्वर मंदिर: सिंधुदुर्ग मधील वेंगुर्ला पासून अवघ्या तीन किलोमीटर एवढ्या अंतरावर हे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ सागरेश्वर समुद्रकिनारा देखील आहे. मंदिर आणि समुद्र किनारा पाहण्यासाठी दरवर्षी लाखो पर्यटक या ठिकाणी येत असतात. डॉल्फिन दर्शनासाठी हा किनारा खूपच प्रसिद्ध आहे. सागरेश्वर मंदिराला भेट देण्यासाठी कोकण मधील कुडाळ रेल्वे स्टेशन जवळचे स्टेशन आहे. या मंदिराच्या जवळ माचेवाड समुद्रकिनारा आणि विठोबा मंदिर हे दोन पर्यटनस्थळे पाहण्यासारखे आहेत.

4. देवबाग बीच : देवबाग बीच हा तारकर्ली समुद्रकिनाऱ्याला लागूनच आहे. देवबाग बीच वर निसर्गाची अभिव्यक्ती पाण्यासाठी सूर्यास्ताच्या वेळेस पर्यटक या ठिकाणी गर्दी करत असतात. स्थानिक मच्छीमारांनी या ठिकाणी पाण्यावरचे खेळ चालू केलेले आहेत. यामध्ये वॉटर स्कूटर, जेट स्की, बम्पर राईड, डॉल्फिन बोट राईड, स्काय बोटिंग स्पोर्ट्स आणि पॅरासेलिंग या सर्व खेळांचा आनंद आपण येथे घेऊ शकतो. या बीचवर आपल्याला सी गरुड म्हणून ओळखले जाणारे समुद्री पक्षांचा कळप देखील बघण्याचा आनंद घेता येईल. देवबाग येथील प्रसिद्ध सांगमा नंतर व समुद्र आणि नदीचे पाणी मिळाल्यानंतर या ठिकाणाला मोबर पॉइंट असे म्हटले जाते. पांढऱ्या वाळूचा आणि स्वच्छ निळ्या पाण्याचा समुद्रकिनारा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करतो.

3. तारकर्ली बीच : तारकर्ली हे सिंधुदुर्गमधील मालवण तालुक्यातील गाव आहे. हे ठिकाण दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात दुर्गम ठिकाणी आहे. बऱ्याच वर्षांपूर्वी तारकर्ली बीचला कोकणातील क्वीन बीच म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. तारकर्ली बीच वरील बांबूची सुपारीची झाडे पाहून मन अगदी प्रसन्न होते. मराठी माणसाने केरळला न जाता तारकर्ली या समुद्रकिनाराला भेट द्यायला पाहिजे. कारण तारकर्लीला केरळ पेक्षाही सुंदर व नयनरम्य वातावरण आहे. तारकर्ली या बीच वरील ताठ एवढे सुंदर आहे की तेथील पाण्याचे सुंदरता ही आपण आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो.

2. रॉक गार्डन: सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रमुख पर्यटनामध्ये रॉक गार्डनचा देखील समावेश करण्यात आलेला आहे. मालवणमधील हे आकर्षक ठिकाण आहे. समुद्रकिनारी खडकाळ भागात हिरवळ आणि विविध फुलझाडांनी बहरलेल्या गार्डन मध्ये सुट्टीच्या दिवशी पर्यटक या ठिकाणी गर्दी करत असतात. या गार्डनमध्ये जाण्यासाठी पाच रुपये एवढी फी आकारली जाते. रॉक गार्डनमध्ये आपल्याला एलईडी लाईट आणि हाईमस टावर, छोटे तलाव, लहान मुलांसाठी खेळणी या सर्वांचा आनंद घेता येईल. जर तुमचा कधी मालवण ला जाण्याचा योग आला तर नक्की रॉक गार्डन या पर्यटनस्थळाला भेट द्या.

1. सिंधुदुर्ग किल्ला : सिंधुदुर्ग किल्ला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग किल्ला आहे. खाऱ्या समुद्रात हा किल्ला असून ही किल्ल्यातील विहिरीचे पाणी हे मात्र गोड आहे. या किल्ल्यात नारळ व पोफळीची झाडे आहेत. सिंधुदुर्ग किल्ल्यावर शिवजयंती, रामनवमी, नवरात्र उत्सव व्यक्तीनुसार साजरे केले जातात. या जिल्ह्याला भेट देणारे पर्यटक हे या किल्ल्याला भेट देतात. भारत सरकारने या किल्ल्याला 21 जून 2010 मध्ये महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केले आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.