नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
काही दिवसांपुर्वी ‘पुष्पा’ हा तमिळ सिनेमा रिलीज झाला आहे. अल्लू अर्जुनची मुख्य भूमिका असलेला हा सिनेमा रक्त चंदनाच्या तस्करीभोवती फिरतो. या सिनेमाला जवळपास सर्वभाषिक प्रेक्षकांनी डोक्यावर घेतलं आहे. यातील अल्लू अर्जुनच्या अदाकारीलाही प्रेक्षकांनी भरभरुन प्रतिसाद दिला आहे. त्याची एक खांदा खाली करुन चालण्याची लकब.
राऊडी अंदाज आणि कमाल डान्स स्टेप्स. यामुळे हा सिनेमा रातोरात प्रेक्षकांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. तमिळ, तेलुगु, हिंदीसह अनेक भाषांमध्ये हा सिनेमा डब झाला आहे. या सिनेमातील हटके गाण्यांनाही प्रेक्षकांनी उत्तम प्रतिसाद दिलं आहे. या गाण्यांपैकी एक गाजलेलं गाणं म्हणजे श्रीवल्ली.
हिंदीत हे गाणं प्रसिद्ध गायक जावेद अलीने गायलं आहे. तुम्हाला माहिती आहे का तेलुगु आणि हिंदीसोबतच श्रीवल्लीचं मराठी व्हर्जन सोशल मिडियावर धुमाकुळ घालत आहे. विजय खंदारे या अमरावतीच्या तरुणाने श्रीवल्लीचं मराठी व्हर्जन प्रेक्षकांच्या भेटीला आणलं आहे. युट्युबर असलेल्या विजयने मराठी श्रीवल्ली तयार करताना खास असा ग्रामीण टचही दिला आहे.
तेलुगु भाषेतील गाण्यावरुन विजयला हे गाणं मराठीत असावं ही कल्पना सुचली. हे कसे करता येईल याबाबत त्याचं विचारचक्रही सुरु झालं. यावेळी गाण्याही चाल आणि साऊंडट्रॅकला धक्का न लावता आहे त्या चालीत मराठी शब्द गुंफण्याचं त्यान ठरवलं. गाणं तर तयार झालं पण रेकॉर्डिंगचा प्रश्न उभा राहिला. जेमतेम परिस्थिती असलेल्या विजय खंदारेने त्यापुढेही हार मानली नाही.
प्रोफेशनल कॅमेरामन नाही, प्रोफेशनल रेकॉर्डिंग स्टुडियो नाही. तरीही विजयने हे गाणं रेकॉर्ड केलं. या गाण्याचं शुटिंग कॅमे-यावर केलं आहे. विशेष म्हणजे गाण्यात विजयची पत्नी रुपाली ही देखील दिसते आहे. ग्रामीण प्रेमकथेवर बेतलेलं हे गाणं नेटिझन्सला चांगलंच आवडलं आहे. या गाण्याची लोकप्रियता पाहता अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी विजयचा सत्कार केला आहे. याशिवाय त्याला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्याइंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.