भर शहरातील या नैसर्गिक घराबद्द्ल तुम्हाला माहिती आहे का?

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

७७० स्क्वेअर फूटामध्ये पसरलेले हे घर माती आणि काँक्रीटच्या पायावर वसलेले एक अद्वितीय घर आहे. हे घर म्हणजे एकच मोठी जागा आहे, जी स्वयंपाकघर, बैठकीची खोली आणि पोटमाळ्यामध्ये विभागलेली आहे.

घराचे इतर भाग, जसे की छप्पर, फरशी, जिना, पारंपरिक साहित्य वापरून बनवले गेले आहेत जे निसर्गतः मजबूत आणि टिकाऊ आहेत. टेराकोटा टाइल्स वापरून फ्लोअरिंग करण्यात आले आहे, जी घराला उन्हाळ्यात थंड आणि हिवाळ्यात उबदार ठेवतात. जिना आणि रेलिंग बांधण्यासाठी पाइनवुड आणि बांबूचा वापर करण्यात आला आहे.

संमिश्र बीम-पॅनल्स वापरून सपाट छप्पर देखील बनवले आहे आणि ३० अंशांच्या उतारावर मँगलोरियन कौलं बसवण्यात आली आहेत ज्यामुळे उष्णता कमी होण्यास मदत होते.

संपूर्ण घरामध्ये नैसर्गिक प्रकाश आणि हवा खेळती राहण्यासाठी भरपूर मोकळ्या जागा आणि मोठ्या खिडक्या आहेत. या घरात एक देखील दिवा किंवा पंखा बसवलेला नाही हे लक्षात घेता हा एक अनुकरणीय उपक्रम आहे असं म्हटलं तर अतिशयोक्ती ठरणार नाही.

घरात दिवे नसल्यामुळे या घरात रहाणाऱ्या लोकांना सर्कॅडियन लय पाळण्यास मदत झाली आहे. सर्कॅडियन लय म्हणजे सूर्योदयाच्या वेळी उठणे आणि सूर्यास्ताच्या वेळी दिवस संपवणे. याचा अर्थ असा नव्हे की तुम्ही सूर्यास्ताच्या वेळी जेऊन झोपायला हवं, पण इतकं नक्की आहे की तुमचा दिवस नैसर्गिकरित्या सुरू व्हायला आणि संपायला हवा.

या घरात अंडरग्राउंड रेनवॉटर हार्वेस्टिंग सिस्टीम आहे ज्यायोगे १०,००० लिटर पाणी टाकीत साठवले जाऊ शकते. टाकीला एकच हातपंप आहे, ज्यामुळे पाण्याचा योग्य वापर करण्यास मदत होते. या घरात ग्रे वॉटर देखील रिसायकल करून वापरले जाते. ग्रे वॉटर म्हणजे आंघोळीचे वाहून गेलेले पाणी, बेसीन, वॉशिंग मशीन आणि स्वयंपाकघरातील इतर उपकरणांमधील पाणी, जे स्वच्छ करून पुन्हां वापरले जाते. या घराच्या अंगणात ४० प्रकारच्या सेंद्रिय भाज्या आणि फळांची झाडे आहेत ज्यांना हे ग्रे वॉटर घातले जाते.

तुम्ही विचार करत असाल की अशा नैसर्गिक घरामध्ये रहाण्याची कल्पना कुणाची असेल? बेंगालुरू मधील रंजन आणि रेवा मलिक हे त्या जोडप्याचं नांव.

ह्या नवरा बायकोची सकाळ सुरू होते संपूर्णपणे इकोफ्रेंडली आणि नैसर्गिक वातावरणात. ह्या घरात सौर उर्जेद्वारे वीज निर्माण केली जाते आणि मोबाईल फोन्स तसंच लॅपटॉप देखील त्याच उर्जेवर चार्ज केले जातात.

या घरात राहिल्यामुळे रेवा आणि रंजन मलिक निसर्गाच्या जवळ आले आहेत. त्यांनी घरातच कंपोस्टिंग तयार करण्यास आणि स्वतःचे अन्न पिकवण्यास सुरुवात केली आहे. त्यांनी टोमॅटो आणि पालकपासून पपई, भोपळा अशा अनेक प्रकारच्या भाज्या पिकवण्यास सुरूवात केली आहे.

या सर्व प्रक्रियेत, आधुनिक काळातील सोयी किती हानीकारक असू शकतात हे देखील या जोडप्याच्या लक्षात आले आहे.

“घरात नळ नसल्यामुळे आम्हांला पाण्याची किंमत कळली. हे खरंच आहे की माणसाने सूर्य आणि पावसाच्या पाण्याचा पूर्णपणे वापर केला नाही. आम्ही बर्‍याच गोष्टी गृहीत धरत होतो, परंतु आमच्या घराने मात्र आमचे डोळे उघडले आहेत. अत्यल्प साधनसामग्रीसह जगण्याच्या आनंदाची तुलना आम्ही कशाशीही करू शकत नाही. आमच्या घरातील एक देखील गोष्ट वाया जात नाही, आणि आमच्या गरजेपुरतं आम्हांला सगळं या घरात मिळतं” रेवा मलिक म्हणतात.

हे घर म्हणजे जीवन जगण्याचा एक आदर्श वस्तुपाठ आहे हे नक्की.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा