वेळेची योग्य किंमत करा नाहीतर पुढील गोष्टीतील आळशी मुलासारखी होईल गत

मनोरंजन

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

एक व्यापारी होता,तो खूप प्रामाणिकपणे आणि सचोटीने आपला व्यापार करायचा. त्या व्यापाऱ्याला एक मुलगा होता. त्यांचा मुलगा सुद्धा प्रामाणिक होता,पण घरात सुख सोई असल्यामुळे त्याला कष्ट करायला कंटाळा यायचा.तो खूपच आळशी आणि कामचुकार होता.कोणतीही गोष्ट तो उद्या वर ढकलायचा, आज नाही उद्या, आज नाही उद्या असं म्हणायचा. आपल्या मुलाच्या अशा आळशी वागण्याचा व्यापाऱ्याला फार वाईट वाटायचं.

तो नेहमी मुलाला आळस सोडून काम करायला सांगायचा,पण मुलावर त्यांच्या सांगण्याचा काहीच उपयोग व्हायचा नाही.त्यामुळे व्यापाऱ्याला आपल्या मुलाची काळजी वाटायची म्हणून व्यापारी नेहमी म्हणायचा की आळस माणसाला निष्क्रिय बनवतो.असा निष्क्रिय माणूस कष्ट न करताच फळाची आशा करत असतो. अशा माणसाला लवकर निर्णय घेता येत नाही आणि निर्णय घेतला तरीही तो लवकर कृती करत नाही.

आपल्या मुलाचं कल्याण व्हावं म्हणून व्यापाराने एक निर्णय घेतला.एकदा व्यापारी व्यापार करून परत आला होता. त्याने रस्त्यातला एक गुळगुळीत दगड उचलला आणि तो घरी आला.त्याने आपल्या मुलाला बोलावलं आणि सांगितलं की, बेटा मी काशीला गेलो होतो त्या ठिकाणी मला एक महान सादू भेटले, त्यांनी मला हा एक चमत्कारी दगड दिला आहे. या दगडाचा लोखंडाला स्पर्श झाला की लोखंड सोन्याच होऊन जाईल पण ह्या दगडाचा चमत्कार उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच राहणार आहे.

मी याचा उपयोग केला असता पण मला आजाच रात्री दुसऱ्या गावी मालं पोहोचवायला निघायचं आहे.तेव्हा तू अस कर उद्या सकाळीच बाजारातून लोखंडाचे मोठे तुकडे घेऊन ये आणि त्या सगळ्या लोखंडाचे पूर्ण सोन करून ठेव,पण लक्षात ठेव वेळ खूप कमी आहे उद्या सूर्योदय ते सूर्यास्त पर्यंतच.मुलगा म्हणाला ठीक आहे मी करून ठेवेल. व्यापारी रात्रीच दुसऱ्या गावी निघून गेला.

दुसऱ्या दिवशी सूर्योदय झाला सकाळचे सात वाजून गेले म्हणून मुलाने विचार केला अजून सातच वाजले म्हणून थोड्या वेळ अजून झोपू.अस म्हणून तो झोपला. नऊ वाजले मुलाला पुन्हा जाग आली तो म्हणाला,अजून अख्खा दिवस पडला आहे उठू थोड्यावेळाने.मुलगा पुन्हा झोपला.दहा,साडे दहा वाजले मुलाला पुन्हा जाग आली तो विचार करत पडून राहिला की आज तर मी एवढं लोखंड विकत आणतो बस माझ्या पुढच्या दहा पिढ्यांना आरामात बसून खाता येईल.

इतकं सोन बनवून ठेवतो की सगळ्या पिढ्या माझ नाव काढतील. माझ्या बापाने जेवढं आयुष्यभर कमावलं नाही त्यांच्या शंभर शंभरपट आज एका दिवसात कमावून टाकतो.आजच्यापेक्षा लाख पटीने सुखी आणि आरामात राहिन मी. असे स्वप्नांची गड रचत मुलगा आरामात लोळत पडला. दुपार झाली साहेब कस तरी उठले वेळ निघून जात होता तरी पाहुणे विचार करत म्हंटले,अरे अजून खूप वेळ आहे मी जाईन आणि दहा मिनिटात लोखंड घेईन आणि पाच मिनिटात त्याच सोन करून टाकेन आहे काय त्यात.असा विचार करत मुलगा पुन्हा खयालीत खोलवर जाऊन विचार करत राहिला.

दुपारचं जेवण झालं, दुपारी जेवण झाल्यावर रोज आरामाची सवय मग काय,दिली परत आरामात ताणून. दिवस मावळतीला आला मुलाला जाग आली त्याला दगडाची आठवण झाली.तो एकदम खलबळून उठला. घाई गडबडीत दगड कुठे ठेवला हेच त्याला आठवेना. इकडे शोध,तिकडे शोध,कुठे ठेवला,कुठे ठेवला काही लक्षात येईना.सगळ घर शोधलं पण काही उपयोग झाला नाही.

शेवटी त्याच्या झोपण्याच्या खोलीत एका कोपर्‍यात तो दगड मिळाला होता व दिवस मावळला होता.सूर्यास्त झाला होता.वेळ निघून गेली होती.मुलगा हताश होऊन रडतं बसला.व्यापारी घरी परतला,त्याला बघून मुलगा ढसा ढसा रडू लागला.आणखी एक दिवस मिळण्यासाठी दया वया करू लागला. व्यापारी म्हणाला,बेटा वेळ निघून गेली आहे आता मी सुद्धा काहीच करू शकत नाही.त्याला त्याच्या चुकीचा पञ्चाताप झाला आणि तो त्या दिवसानंतर सुधारला.म्हणून वेळेतच सर्व काम करा आणि वेळीची किंमत करा. आळस सोडा.