आपल्या स्वप्नांपर्यंत मजल गाठायची असेल तर KFC चे संस्थापक कर्नल सॅंडर्स यांचं उदाहरण डोळ्यासमोर नक्की ठेवा ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

आपल्या स्वप्नांपर्यंत मजल गाठायची असेल तर KFC चे  संस्थापक कर्नल सॅंडर्स यांचं उदाहरण डोळ्यासमोर नक्की ठेवा ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

तुमच्या स्वप्नांच्या दिशेने काम करण्यात यापेक्षा चांगली वेळ नाही . नमस्कार मित्रांनो परवा मित्रांसोबत असताना असच कोरोना वर विषय निघाला. करोना मुळे जाणारा जॉब आणि छोटे छोटे बंद होणारे उद्योगधंदे या विषयावर चर्चा चालू होती. मध्येच एक मित्र म्हणाला माझा पण जॉब जाईल असं वाटतय. कधी कधी वाटतं काहीतरी धंदा असता तर बर झाल असत पण आता सुरू करायचं म्हटल्यावर अवघड आहे.

मी त्याला विचारलं आता काय प्रॉब्लेम आहे यावर तो म्हणाला अरे आता 35 चा आहे. मी कधी आणि काय सुरू करणार आणि त्यात पैशांचा प्रॉब्लेम आहे. हे ते असं बरेच प्रॉब्लेम्स त्याने सांगितले ऐकून वाटत होतं की त्याचा प्रॉब्लेम कमी आणि भीती जास्त आहे. मग समजावण्याचा माझा सगळ्यात सोपा मार्ग निवडला तो म्हणजे एक गोष्ट चला पाहूया कोणती होती ती गोष्ट .

DHL responds to failed KFC deliveries in UK | JOC.com

तुमचे प्रयत्न तुम्हाला दोन गोष्टींकडे घेऊन जातात. एक तरी यश नाहीतर अपयश .तुम्ही जर यश प्राप्त केलं तर तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि जर अपयशी झाला तर तुम्ही नवीन काहीतरी शिकता. जर आपण अपयश शब्दाबद्दल बोलत असू तर एखादा व्यक्तीला अपयश मिळाल्यानंतर पुन्हा किती वेळेस प्रयत्न करेल. दहा वेळा, पंधरा वेळा, पन्नास वेळा आणि एवढे वेळा प्रयत्न केल्यानंतर तो प्रयत्न करन सोडून देईल.

पण एका व्यक्तीने 1009 वेळा प्रयत्न करून सुद्धा अपयश मिळाल्यावर प्रयत्न करणे सोडून दिले नाही आणि शेवटी तो यशस्वी झाला. विन्स्टन चर्चिल एकदा म्हणाले होते पुन्हा पुन्हा अपयशी होऊन सुद्धा पुन्हा त्याच उत्साहाने कुणी प्रयत्न करत असेल खरं तर त्यालाच यश म्हणतात. त्या व्यक्तीने या गोष्टीला बरोबर करून दाखवलं हे आहेत.

जगातले सर्वात प्रसिद्ध KFC केएफसी म्हणजेच (Kentucky Fried Chicken) केंटकी फ्राईड चिकन चे फाउंडर कर्नल हारलैंड सैंडर्स. यांची ही गोष्ट एखाद्या मोटिवेशनल मूवी सारखीच आहे . 19 सप्टेंबर 1890 मध्ये Henryville हैनरीविले या शहरात त्यांचा जन्म झाला. जेव्हा ते सहा वर्षाचे होते. तेव्हा त्याच्या वडिलांचा मृत्यू झाला.

त्यामुळे त्याच्या आईला पोटासाठी काम करावे लागत. त्यांची आई टोमॅटोच्या फॅक्टरी मध्ये कामाला होती. यावेळेस हारलैंड आपल्या लहान भावंडांची काळजी घ्यायचे आणि त्यामुळे त्यांचे शिक्षण सातवीपर्यंतच झालं. कारण ते स्वतःही काम करत होते जेव्हा ते सोळा वर्षाचे झाले त्यांनी आपल्या वय लपवून अमेरिकेच्या सिने मध्ये भरती झाले.

एका वर्षानंतर त्यांचे काम संपल्यावर त्यांना तिथून काढण्यात आलं .त्यानंतर त्यांनी रेल्वेमध्ये कामगार म्हणून काम केले. पण तिथे झालेल्या भांडणामुळे तिथली नोकरी सुद्धा गेली. यानंतर ते आपल्या आईकडे राहायला गेले. तिथे त्यांनी इन्शुरन्स एजंट म्हणून काम करायला सुरुवात केली पण काही कारणास्तव त्यांना ही सुद्धा नोकरी सोडावी लागते . पुन्हा पुन्हा मिळणा-या अपयशामुळे ते नक्कीच दुःखी झाले पण त्यांनी कधी हार मानली नाही.

1920 साली वयाच्या तिसाव्या वर्षी नाव बनवणारी कंपनी त्यांनी सुरु केली. त्यानंतर त्यांनी लैम्‍प्‌ बनवण्यास सुरुवात केली .तर बाकीच्या कंपन्या त्यांच्या पेक्षा चांगले लैम्‍प्‌ पहिल्यापासूनच बनवत त्यामुळे तेसुद्धा काम बंद करावं लागलं.

KFC Australia (@KFCAustralia) / Twitter

वेळ निघून जात होती. वयाच्या चाळिसाव्या वर्षी त्यांनी ठरवलं की आता आपण चिकनचे पदार्थ बनवायला सुरुवात करू. सुरू केल्यानंतर सगळ्यांना कळावं यासाठी त्यांनी इथे येणाऱ्या जाणाऱ्यांना फ्री मध्ये वाटायला सुरुवात केली .काही दिवसानंतर रस्त्याच्या बाजूला एक हॉटेल सुरू केले .

1935 सालीच येथूनच गवर्नर “रुबी लैफ्फून” या रस्त्यावरून जात असताना ते या हॉटेलमध्ये थांबले .त्यांना तिथले चिकन खूप जास्त आवडेल त्यांनी हॉटेल मधून जाता जाता त्याला हॉटेल ला ‘केंटकी कर्नल’ म्हणून नाव दिलं. आता ते हॉटेल खूपच चालू लागले होते.

तेही जास्त दिवस चाललं नाही एका भांडणामुळे ते चार वर्षात त्यांना ते हॉटेल बंद करावे लागते. त्यानंतर त्यांनी अजून एक हॉटेल सुरू केले पण दुसऱ्या महायुद्धामुळे तेसुद्धा बंद झालं.आत्तापर्यंत त्यांनी बनवलेले चिकन सगळ्यांना आवडू लागलं होतं. पण हॉटेल बंद असल्यामुळे ते खाऊ शकत नव्हते.

एक दिवस सैंडर्स ला विचार आला की आपल्या हॉटेल च्या शाखा वाढवाव्यात. त्यामुळे त्यांनी निर्णय घेतला की आपण एका हॉटेलमध्ये जाऊन आपली चिकनची रेसिपी त्यांना देऊ आणि झालेल्या प्रॉफिट मध्ये एक बाटली घेऊन.

तेव्हा ही गोष्टसुद्धा सोपी नव्हती पण त्यांनी प्रयत्न करायला सुरुवात केली. ते हॉटेलमध्ये जायचे तर त्यांची आयडिया रिजेक्ट केली जायची. असं म्हटलं जातं की कशाप्रकारे तब्बल एक हजार नऊ वेळा त्यांची ही रेसिपी रिजेक्ट करण्यात आली.त्यांनी हार नाही मानले ते प्रयत्न करत राहिले आणि शेवटी ते यशस्वी झाले. काही दिवसांतच त्यांची ही रेसिपी फक्त तिथच नाही ती अनेक देशात खूप जास्त लोकप्रिय झाली होती.

1964 पर्यंत केएफसी च्या 600 पर्यंत शाखा गेल्या होत्या.त्यानंतर सैंडर्स त्यांनी आपली कंपनी दोन मिलियन डॉलर म्हणजे आत्ताचे तब्बल 18 मिलियन डॉलरला विकली. हळूहळू केएफसीच्या शाखा वाढत गेल्या. त्यांच्या शाखा सहाशे वरून साडेतीन हजार पर्यंत पोहोचल्या. 1971 मध्ये केएफसी ला एका कंपनीने 285 मिलियन डॉलर खरेदी केले.

यापुढे 1976 मध्ये याच केएफसी ला कोल्ड्रिंक बनवणारी कंपनी पेप्सिको ने 840 मिलियन डॉलर ला विकत घेतली. तरीसुद्धा आज ही केएफसी सैंडर्स यांच्याच नावाने आणि चेहऱ्याने ओळखली जाती. व्हॅनिला फ्राईड चिकन ची अनोखी रेसिपी देऊन वयाच्या नव्वदाव्या वर्षी म्हणजे 1986साली त्यांचा मृत्यू झाला.

आता जगभरात डिसेंबर 2019 सालापर्यंत के एफ सी चे तब्बल 22621 शाखा आहे . हो तुम्ही बरोबर ऐकत आहात 22621. तुम्हाला जर आयुष्यात झालेल्या पराभवानं वाईट वाटत असेल तर ही गोष्ट वारंवार ऐकत राहा कारण सैंडर्स पराभवाचा सामना करूनच हे जग जिंकले आहे . फक्त त्यांच्या रेसिपीच्या जोरावर साम्राज्य उभे करणारे केएफसीचे निर्माता सैंडर्स यांची गोष्ट सांगण्याचा उद्देश फक्त हा आहे की ही गोष्ट तुम्हाला नक्की प्रोत्साहन देऊन जाते.

कारण यामध्ये जिद्द आहे , समर्पण आहे, महत्वकांक्षा आहे आणि सोबतच कमालीची. बस तुमचं वय किती असते, तुमचं शिक्षण किती असो, तुमच्याकडे पैसे किती घेतात अशा कोणत्या गोष्टीचा यावर फरक पडत नाही. तुम्ही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही काहीही करू शकता. तुमच्या मध्ये ती जिद्द, तो संकल्प आणि कामावरची निष्ठा असेल. तर या जगातली अशी कोणती गोष्ट तुम्हाला तुमच्या स्वप्नपूर्ती पासून थांबू शकत नाही. मग तर वाट कशाची बघता आपल्या स्वप्नांना बघायला सुरुवात करा आणि त्यांना पूर्ण करण्यासाठी काम करायला सुरुवात करा .

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा

Team News Feed

अशाच माहितीसाठी आपल्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा !

error: Content is protected !!