नमस्कार मित्रांनो, जर तुमचे सुकन्या समृद्धी योजनेमध्ये खाते असेल तर आणि तुम्ही जर त्यामध्ये नियमित गुंतवणूक करत असाल किंवा जर तुम्हाला नवीन सुकन्या समृद्धी योजनेचे खाते उघडायचे असेल, नव्याने तुम्हाला सुकन्या समृद्धी योजनेमध्ये गुंतवणूक करायची असेल, तर मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या,
सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पाच मोठे बदल हे झालेले आहे आणि या पाच मोठ्या बदलांची माहिती आज आपण पाहणार आहोत. तर मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेमध्ये जे काही बदल झालेले आहेत त्या बदलानुसार, आता जर खाते डिफॉल्ट झाले असेल तर अशा डीफॉल्ट खात्यावर जो काही व्याज दर मिळतो,
त्याच्यावर काहीही फरक पडणार नाही. म्हणजेच मित्रांनो, या योजनेच्या नियमानुसार या योजनेत दरवर्षी किमान 250 रुपये जमा करणे आवश्यक आहे, जर ही रक्कम जमा केली नाही तर हे डिफॉल्ट अकाउंट मानते जाईल. जुन्या नियमांनुसार खात्यावरील व्याज पोस्ट ऑफिस बचत खात्यास लागू असलेल्या दराने दिले जाते.
सुकन्या समृद्धि खात्यांच्या तुलनेत पोस्ट ऑफिस मधील बचत खात्यांच्या व्याजदर खूपच कमी आहे. जेथे पोस्ट ऑफिसच्या बचत खात्यांच्या व्याजदर आता चार टक्के आहे,त्याच वेळी सुकन्या समृद्धीला 7.6 टक्के व्याज मिळते. नवीन नियमांनुसार, खाते पुन्हा कार्यान्वित न झाल्यास त्याच्यावर मॅच्युर होईपर्यंत, डिफॉल्ट खात्यावर योजनेच्या लागू दरावर व्याज दिले जाईल.
खातेदारांसाठी ही चांगली बातमी आहे. त्यानंतर जो दुसऱ्या बदल झालेला आहे तो अकाली खाते बंद करण्या संदर्भातला आहे. या योजनेच्या जुन्या नियमांनुसार, हे अकाउंट दोन प्रकरणांमध्ये बंद केले जाऊ शकते. पहिले मुलीच्या मृत्यूच्या घटनेत आणि दुसरे तिचा राहण्याचा पत्ता बदलणे.
या योजनेच्या नवीन नियमानुसार मुलीच्या मृत्यू झाल्यास किंवा अनुकंप कारणास्तव सुकन्या समृद्धी खाते अकाली बंद करण्याची परवानगी देण्यात आली आहे. अनुकंपा मध्ये खातेदारांच्या जीवघेण्या आजारावर उपचार करणे किंवा पालकांचा मृत्यू यासारख्या परिस्थितींचा समावेश आहे.
यानंतर जो तिसरा बदल आहे तो दोन पेक्षा अधिक मुलींच्या बाबतीत खाते उघडण्या संबंधित आहे. मित्रांनो, सुकन्या समृद्धी योजनेअंतर्गत पालक दोन मुलींसाठी खाते उघडू शकतात.तथापि, मुलीच्या जन्मानंतर जर दोन जुळ्या मुली असतील तर त्या सर्वांसाठी खाते उघडले जाऊ शकते.
नवीन नियमांनुसार दोन पेक्षा अधिक मुलींनी खाते उघडले असल्यास जन्म प्रमाणपत्र सह प्रतिज्ञापत्र सादर करावे लागेल. जुन्या नियमानुसार पालकांना केवळ मेडिकल सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक होते. नंतर जो नियम आहे तो खाते हाताळण्या संदर्भातला आहे. नवीन नियमांनुसार, मुलगी 18 वर्षांची होईपर्यंत तिला खाते हाताळण्यास परवानगी दिली जाणार नाही,
जुन्या नियमानुसार दहा वर्षात तिला तसे करण्याची परवानगी होती. नवीन नियम असे सांगतात की खातेदार 18 वर्षाची होईपर्यंत पालकच त्यांचे खाते हाताळतील. मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर जिथे खाते उघडले आहे तेथे आवश्यक ती कागदपत्रे बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये जमा करावी लागतात.
याचप्रमाणे मित्रांनो, जे काही इतर बदल झालेले आहेत ते म्हणजे नवीन नियमांमध्ये खात्यात चुकीचे व्याज परत मिळण्याची तरतूद काढून टाकण्यात आली आहे. याशिवाय नवीन नियमांतर्गत आर्थिक वर्षाच्या शेवटी खात्यावर व्याज जमा केले जाईल. तर अशा प्रकारे मित्रांनो,सुकन्या समृद्धी योजनेमध्ये पाच महत्त्वाचे बदल करण्यात आलेले आहेत.
सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
My Daughter birth date 18.10.2011 can I open sukanya policy
Please update the requirements to open policy
Very nice sukan samridhi uajn