तुम्हाला जर होलसेलचा जर व्यवसाय सुरू करायचा असेल तर बहुतेक वेळा आपण अस करतो की यूट्यूब वरती कोणतीही व्हिडिओ पाहतो किंवा कोणा एऱ्यागैऱ्या कडून आपल्याला होलसेल मटेरियलची माहिती मिळेल अस आपल्याला वाटत. पण यामध्ये नेहमीच एक असत की प्रत्येक व्यक्तीला रेफर्न्स देण्यामागे कुठेना कुठे काही ना काही कमिशन मिळत असत. त्यामुळे तुम्ही अस काही करण्यापेक्षा स्वतः माहिती घेण्याचा प्रयत्न करा. स्वतः मार्केट मध्ये फिरून माहिती घ्या, लोकेशनला स्वतः जा, स्वतः माहिती काढा आणि तुमचे पैसे वाचवा आणि तुमचा व्यवसायाला सुरुवात करा. मार्केट बद्दल माहिती घेवुयात.
1. इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट :- इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट अगदी 5 ते 100 रुपयात चांगले गॅझेट तुम्हाला मिळतात होलसेल रेट मध्ये विथ वॉरटी मिळतात. महाराष्ट्रात पाहिलं तर मुंबई मधील गोरेगाव, ग्रँट रोड, मनीष मार्केट – CST जवळ अशी खूप दुकाने होलसेल मटेरियल देतात. आणि पुण्यामध्ये चायना मार्केट, शुक्रवार पेठ, इथे ही तुम्ही घेवू शकता. महाराष्ट्राच्या बाहेरून जर आपल्याला हवं असेल तर दिल्ली – लजपतराय नगर मार्केट, सदर बाजार मार्केट इथून तुम्ही घेवू शकता.
2. प्लास्टिक मटेरियल :– रोजच्या दैनंदिन जीवनात याची खूप गरज असते. अगदी 20 ते 100 रुपया पर्यंत होलसेल रेट ने विकले जातात. यामध्ये छोटछोट्या डब्ब्यांपासून तर मोठमोठ्या बकेट पर्यंत मटेरियल उपलब्ध असत. आपल्याला विश्वास बसणार नाही की अगदी 5 रुपयांपासून ते 10 रुयांपर्यंत हे मटेरियल आपल्याला मिळत. आणि ते आपण 30 ते 50 रुपयांपर्यंत विकू शकतो. महाराष्ट्रामध्ये, मुंबईमध्ये गोरेगाव, दादर CTS मार्केट, नागपूर मध्ये हंसापुरी, दिल्ली येथे सदर बाजार, येथे आपल्याला मिळू शकते.
3. दिवाळीचे मटेरियल :- दिवाळीचे मटेरियल आपल्याला पाहिजे असेल, तर अगदी 5 ते 10 रुपयाला लाईटिंगच्या माळा मिळतात. मुंबईला ग्रँट रोड, दादर आणि लमिंग्टन रोड असेल. पुण्यामध्ये शुक्रवार पेठ, बुधवार पेठ, किंवा हडपसर रोडला सुद्धा काही होलसेल दुकान सुरू झालेली आहेत. आणि दिल्लीच सदर बाजार मार्केट ही तर एक इलेक्ट्रॉनिक गल्ली आहे. तिथे अगदी तुम्हाला 10 रुपयाला 2 ते 3 माळा मिळू शकतात.
4. क्लॉथ मटेरियल :– खूप जास्त लोकांची इच्छा असलेला, खूप जास्त प्रॉफिट असलेला बिझनेस. यामध्ये धोकाधडी पण खूप जास्त होते. त्यामुळे खूप जास्त विचार करुन या व्यवसायामध्ये पडा. यामध्ये तुम्हाला होलसेल साड्या किंवा कुर्तिज घ्यायचे असतील तर अगदी 40 ते 50 रुपयांमध्ये मिळतात आणि 300 ते 400 रुपये मध्ये विकले जातात.
तसेच एका जीन्सच्या किमतीत आपल्याला होलसेल मध्ये 4 जीन्स मिळतात. तर असे होलसेलचा माल मुंबईचा विचार केला तर कल्याण मार्केट आहे, जनता कापड मार्केट दादर, ग्रँड रोड उल्हासनगर येथे जीन्सच्या कंपनीचे प्रोडक्शन मिळतील. पुण्यामध्ये रविवार पेठ,
कोल्हापुर गांधीनगर मार्केट आहे, नागपूर गांधीबाग असेल, आणि सुरत व अहमादाबाद इथे तुम्ही किलो-किलोने कपडे घेऊ शकतात. पण याची माहिती तुम्ही स्वतः त्या लोकेशन वर जावून घ्या, मालाची चौकशी करा क्वालिटी पहा, कपड्याची खरेदी सँपल फोटो पाहून करू नका.
5. बॅग आणि सॅक्स: हा सगळ्यात जास्त प्रॉफिट करून देणारा बिझनेस आहे. तुम्ही पाहत असाल की लेडीज बॅग, छोट्या ट्रॅव्हल बॅग, हे सर्व तुम्हाला अगदी 10 ते 20 रुपयांमध्ये होलसेल मिळून जात. मोठ्या बॅग अगदी 40 ते 100 रुपयांपर्यंत होलसेल मध्ये मिळून जातात आणि त्या 1000 ते 2000 रुपयांपर्यंत विकले जातात.
हे होलसेल मटेरियल आपल्याला लेडीज बॅग्स तर बहुतांश उल्हासनगर भायखळा, बांद्रा, दादर. ट्रावेलिंग बॅग असेल तर गोरेगाव, बांद्रा, ग्रँट रोड उल्हासनगर. आणि कॉलेज बॅग आपल्याला ग्रँट रोड, नागपूर येथील गांधीबाग असेल, किंवा दिल्ली येथील सदर बाजार मध्ये उपलब्ध असतात.
6. इलेक्ट्रिक मटेरियल :– वायर असतील, एक्स्टेन्शन बोर्ड, किंवा अन्य काही वस्तू हे जर आपल्याला घ्यायचं असेल तर सगळ्यात बेस्ट मार्केट आहे दिल्लीचे लजपतराय नगर, येथून जर तुम्ही घेत असाल तर 100 ते 200% प्रॉफिट तुम्हाला काढता येतो. आणि त्याच बरोबर मुंबई – दादर, बांद्रा, येथून देखील तुम्ही होलसेल मटेरियल घेवू शकता.
7. स्टील आणि अल्युमिनियम भांडे :– अगदी छोट्यातल्या छोट्या प्रकारापासून ते मोठमोठ्या प्रकारची भांडे आपण घेवू शकतो. छोट्या वस्तू 5 ते 10 रुपयांपासून 70 ते 80 रुपये किलोने मटेरियल मिळते. आणि तेच आपण 100 ते 300 रुपये पर्यंत विकू शकतो.
नागपूर मधील इतवारी भाग, पुण्यातील बोहरा आळी, दिल्ली येथील सदर बाजार असेल येथून आपण होलसेल माल घेवू शकतो. आपल्याला असे वाटेल की दिल्लीच्या ‘सदर बाजार’ मध्ये अस काय आहे की सर्वच वस्तू तिथे मिळतात, तर तिथे वेगवेगळ्या गल्ल्या आहेत वेगवेगळ्या होलसेल प्रॉडक्टच्या.
8. फर्निचर मार्केट :- आपण पाहतो की जे जुन सेकंड हॅन्ड मटेरियल आपण घेऊ शकतो. किंवा त्याच्यामध्ये आपण जे बेड असतील, सोपा असतील, डायनिंग टेबल असतील. हे आपल्याला 10 ते 20% च्या किमती मध्ये मिळतं. आणि जर आपल्याला एखादा सोफा 5000 पर्यंत मिळत असेल
तर तो आपण 15 ते 20 हजार पर्यंत विकू शकतो. पुण्यामध्ये काळेवाडी, वाकड, बाजीराव रोड, येथे जे शोरुम आहे तिथून आपण मटेरियल घेवू शकतो. मुंबईमध्ये उल्हासनगर फर्निचर, जामा मशीद एरिया इथे देखील आपण होलसेल मटेरियल घेवू शकतो.
9. गिफ्ट गॅलरी, टोइज :- यासाठी जर आपण पाहिलं तर यात आपल्याला खूप साऱ्या वरायटी असतात. छोट्या आयटेमची किंमत 3 रुपयांपासून तर मोठ्या आयटेमची किंमत 10 रुपयांपर्यंत आपल्याला मिळू शकतात. आणि यासाठी सर्वात बेस्ट मार्केट आहे दिल्लीचे सदर बाजार. आणि मुंबईमध्ये सुतार गली, झवेरी बजार. इथे देखील आपल्याला होलसेल माल मिळू शकतो. इथे फक्त आपल्याला एकत्र माल घ्यावा लागतो कारण त्यांना व्यवहार करायला सोप जात.
10. परफ्युम्स :– परफ्यूम असेल किंवा लेडीज फेसवॉश असेल. हे 200 ते 300 रुपये पर्यंत विकले जातात. आणि हेच तुम्हाला 35 ते 40 रुपयांच्या आसपास मिळतात. नैलपैंट असेल किंवा लिपस्टिक असेल अगदी 1 ते 10 रुपयांपासून आपल्याला ह्या गोष्टी मिळतात. मुंबईमध्ये क्रॉफर्ड मार्केट, झवेरी बझार. पुणेमध्ये शुक्रवार पेठ, बाजीराव रोड. नागपूर मध्ये सदर बाझार. प्रोपर एन्क्वयरी केली तर आपल्याला सर्व मटेरियल हे होलसेल मध्ये मिळून जाईल.
11. वेहिकल स्पेअर्स:- यामध्ये तुम्ही पाहायला गेले तर कोणत्याही बाईकचे स्पेअरस पार्ट आपल्याला स्वस्त मिळून आपण आपल्या आसपासच्या लोकल भागामध्ये गाड्या रिपेअर करतात, किंवा दुकानदारांना तुम्ही ते विकू शकतात, व्यवहार करू शकतात. बांद्रा, दादर, ग्रँट रोड उल्हासनगर, नागपूर गांधीबाग, दिल्ली सदर बाझार, या ठिकाणी आपल्याला होलसेल मटेरियल मिळू शकते. स्वतः जावून माल पाहा, आणि नंतरच मालाची ऑर्डर द्या. फोटो पाहून मालाची ऑर्डर देवू नका.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
Best
Please give me a information