एखाद्या जमिनीवर नोटरी कराराच्या आधाराने बोजा टाकता येतो का?।। जमीन जर आपण कसत असू तर कुळ लावण्याकरता काय करावे लागेल? ।। एखाद्या सातबाराच्या खातेफोड करण्यास सहहिस्सेदाराची मान्यता नसेल तर काय करावे?।। इतर अधिकारात स्मशानभूमीची जर वहिवाट असेल तर काय करता येईल?।। गुंठेवारी सातबाराचा फेरफार जर झाला असेल तर मंडळ अधिकारी असा फेरफार रद्द करू शकतो का? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या !

पहिला प्रश्न आहे. एखाद्या जमिनीवर नोटरी कराराच्या अनुषंगाने किंवा नोटरी कराराच्या आधाराने बोजा टाकता येतो का? आता सगळ्यात पहिले एक लक्षात घेतले पाहिजे की बोजा म्हणजे नक्की काय? तर एखाद्या जमिनीवर जेव्हा त्या जमिनीचा भोगवटा भाग आणि कुळ यांच्या व्यतिरिक्त इतर त्रयस्थ व्यक्ती किंवा संस्था यांचे काही हक्क किंवा अधिकार असतील तर त्या हक्क किंवा […]

Continue Reading