वारसनोंद, कर्जबोजा कमी करणे, कर्ज बोजा चढवणे, अज्ञान पालन कर्ता नोंद कमी करणे, एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे, गॅझेट मधील नावानुसार बदल करणे आता या कामांसाठी तलाठी कार्यालयात जायची गरज नाही l ही कामे घरी बसून करा l जाणून घ्या कसे !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

मित्रांनो, आता वारस नोंद करणे किंवा कर्ज बोजा दाखल करणे किंवा कर्ज बोजा कमी करणे,अज्ञान पालककर्ता तसेच एकत्र कुटुंब मॅनेजर, यांच्या नोंदी कमी करणे, गॅझेट मधील नावानुसार बदल करणे,अशा सहा प्रकारच्या नोंदी घेण्यासाठी नागरिकांना तलाठी कार्यालयात हेलपाटे मारण्याची गरज नाही.

कारण की आता ही सहा प्रकारची कामे नागरिक घरबसल्या करू शकतात. यासाठी मित्रांनो महसूल विभागाने इ-हक्क प्रणाली ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मित्रांनो, महसूल विभागातर्फे यापूर्वी डिजिटल सातबारा उतारा इ फेरफार नोंद या सुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत.

एवढेच नव्हे तर सातबारा उतारा घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागू नये म्हणून डिजिटल स्वाक्षरी असलेल्या सातबारा उतारा देखील उपलब्ध करून दिला आहे. त्याचाच पुढचा टप्पा म्हणजे कोणत्याही छोट्या कामासाठी नागरिकांना तलाठी कार्यालय गाठावे लागू नये यासाठी महसूल विभागाने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे.

त्यानुसार आता शासनाने वारस नोंद, कर्जाचा बोजा दाखल करणे यासारखे सहा महत्वाची नागरिकांशी संबंधित कामे आहेत ती आता घरबसल्या इ-हक्क प्रणालीद्वारे नागरिकांना करता येतील अशी सुविधा शासनाने करून दिली आहे नेमकी ही इ-हक्क प्रणाली काय आहे ते पाहू.

मित्रांनो यापूर्वी एखादी व्यक्ती मयत झाल्यानंतर त्याच्या वारसांची नोंद घेण्यासाठी तलाठी कार्यालयात जावे लागत होते,आता नागरिकांना महाभूमी या संकेतस्थळावर किंवा pbeigr.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर लॉग इन करून देखील अर्ज करता येऊ शकतो, तुम्ही या संकेतस्थळावरून केलेला अर्ज हा तुमच्या संबंधित तलाठ्याकडे जाईल,

तलाठी त्याची ऑनलाईन पडताळणी करतील कागदपत्रे जर अपूर्ण असतील तर त्याची माहिती अर्जदाराला मेल द्वारे कळविण्यात येईल आणि जर सर्व कागदपत्रे पूर्ण असतील तर त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर तलाठी ही घेणार आहेत. मित्रांनो या प्रणालीचा बँकांना देखील फायदा होणार आहे.

शेतकरी अनेकदा शेती पिक किंवा इतर कारणासाठी बँकांकडून कर्ज घेतात. त्यासाठी घर किंवा जमीन गहाण ठेवतात. कर्ज घेतल्यानंतर संबंधित कर्जदाराच्या जमिनीवर बोजा चढवणे किंवा कर्ज फेडल्यानंतर तो बोजा काढून घेणे,याचा बँका व कर्जदार यांना त्रास सहन करावा लागतो. तो आता या सुविधेमुळे कमी होणार आहे.

कारण की इ-हक्क प्रणाली महसूल विभागाने बँकांना देखील उपलब्ध करून दिली आहे. म्हणजेच आता सातबारा उताऱ्यावर बोजा टाकणे किंवा काढून घेण्यासाठी आता बँकांना ऑनलाईन अर्ज केल्यानंतर तलाठी कार्यालयामध्ये त्याची नोंद सातबारा उताऱ्यावर घेतली जाईल. वारस नोंद, बँकांचा बोजा चढवणे अथवा उतरवणे यासारख्या गोष्टी साठी नागरिकांचा वेळ वाया जाऊ नये,

तसेच ही कामे घरबसल्या मार्गी लागावी यासाठी महसूल विभागाने इ हक्क प्रणाली ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे आणि त्याचा नागरिकांनी जास्तीत जास्त उपयोग करून घ्यायचा आहे. तर अशाप्रकारे आता ही इ-हक्क प्रणालीद्वारे ही कामे आता घरबसल्या आपल्याला करता येणार आहेत.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

2 thoughts on “वारसनोंद, कर्जबोजा कमी करणे, कर्ज बोजा चढवणे, अज्ञान पालन कर्ता नोंद कमी करणे, एकत्र कुटुंब मॅनेजर नोंद कमी करणे, गॅझेट मधील नावानुसार बदल करणे आता या कामांसाठी तलाठी कार्यालयात जायची गरज नाही l ही कामे घरी बसून करा l जाणून घ्या कसे !

  1. जामिनदार व्यक्तीच्या सातबारा वर पतपेढी कर्ज बोजा चढवू शकते का?

Comments are closed.