शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजने अंतर्गत 75% ते 80% पर्यंत अनुदान मिळणार ।। ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा जाणून घ्या आजच्या लेखातून !

लोकप्रिय शेती

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी म्हणजे आता शेतकऱ्यांना ठिबक सिंचन योजने अंतर्गत 75% ते 80% पर्यंत अनुदान मिळणार आहे. आणि त्यासाठी ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा याची आपण आज माहिती घेणार आहोत. ठिबक सिंचन योजने साठी अर्ज करायचा असेल तर सर्वात पहिल्यांदा (mahadbt.gov.in/farmer) या वेबसाईट वर जायचं. वेबसाईट ओपन झाल्यानंतर उजव्या साइडला नवीन अर्जदार नोंदणी यावर क्लिक करायच आहे.

तर ज्यांनी आता पर्यंत नवीन नोंदणीच केलेली नाहीये त्यांनी नवीन अर्जदार नोंदणी जी आहे ती करून घ्यायची आहे. ज्यांनी नवीन नोंदणी केलेली असेल त्यांनी अर्जदार लॉगिन ऑप्शन वरती क्लिक करायच आहे. तिथे तुम्हाला 2 ऑप्शन दिसतील अर्जदार येथे लॉगिन करा. यामध्ये पाहिलं ऑप्शन आहे वापरता करता आयडी आणि पासवर्ड टाकून तुम्ही लॉगिन करू शकता.

आणि जर तुम्हाला आयडी आणि पासवर्ड माहीत नसेल तर तुम्ही आधारकार्ड नंबर टाकून त्याचा ओटीपी घेवून तुम्ही लॉगिन करू शकता. तर नोंदणी करून घ्या नोंदणी केल्या नंतर तुम्हाला जो आयडी पासवर्ड भेटलेला आहे त्याने इथे लॉगिन करायच आहे किंवा आधारकार्ड नंबर ने लॉगिन करा. लॉगिन केल्या नंतर सर्वात पहिलं जे काम करायच आहे तुम्ही जर ठिबक सिंचन साठी अर्ज करताय, तर अर्ज करण्यापूर्वी तुम्हाला डाव्या बाजूला एक ऑप्शन आहे ‘पिकांचा तपशील सादर करा’ इथे जायचं आहे.

पिकांचा तपशील सादर करा या ऑप्शन वर आल्यानंतर तुम्हाला चेक करायच आहे की तुम्ही पिके व्यवस्थित ॲड केली आहेत का. गट नंबर कोणते ॲड केले आहेत, हंगाम बरोबर ॲड केले आहे का, पीक प्रकार ॲड केला आहे का. जर तुम्ही ॲड केले नसतील पिके तर तुम्ही हे सर्व ऑप्शन सिलेक्ट करून ह्या पिकांची माहिती तुम्ही ॲड करून घ्या. त्यांनतर तुम्हाला ‘इतर माहिती सादर करा’ या ऑप्शन वरती जायचं आहे. इथे आल्यानंतर तुम्हाला एकदा चेक करायच आहे की जे सिंचन स्त्रोत टाकलेलं आहे का.

कुपणनलिका, विहीर, बोअरवेल, मोटार, पंप असेल, जे काही असेल ते तुम्ही बरोबर टाकलेलं आहे का चेक करा. नसेल टाकलं तर तुम्ही त्या ऑप्शन वर जाऊन तुमच सिंचन स्त्रोत्र ते तुम्ही टाकून घ्या. ही दोन कामे करायची आहेत. ही दोन कामे झाल्यानंतर मुख्य पृष्ठावर जायचं आहे. इथे आल्यानंतर आता तुम्हाला अर्ज करायचं आहे. मुख्य पृष्ठावर ‘अर्ज करा’ या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे.

यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला 3 ते 4 प्रकारचे ऑप्शन येतील. त्यांनतर तुम्हाला ‘सिंचन साधने आणि सुविधा’ ह्या 2ऱ्या क्रमांकाच्या ऑप्शन वर क्लिक करायचे आहे. आणि ‘बाबी निवडा’ हा ऑप्शन असेल त्यावर जायचं आहे. या ऑप्शन वर गेलेवर तुम्हाला तुमचे गाव, तालुका, आणि सर्वात पहिल्यांदा गट नंबर सिलेक्ट करायच आहे. जो तुम्ही तुमच्या ठिबक सिंचनासाठी वापरणार आहे तो गट नंबर तुम्हाला इथे घ्यायचा आहे. त्यांनतर मुख्य घटक तुम्हाला निवडायचा आहे.

मुख्य घटक ‘सिंचन साधने आणि सुविधा’ आहे. आणि घटक ‘ठिबक सिंचन, तुषार सिंचन’ असे बरेच ऑप्शन आहे. तर आपण घटक हा ठिबक सिंचन हा सिलेक्ट करणार आहे. त्यानंतर उपघटक निवडायचं आहे. इनलाईन प्रणाली जी जमिनीच्या आतमध्ये असते ती करायची आहे, की वरती जी ऑनलाईन प्रणाली असते ती करायची आहे. तर इथे 2 ऑप्शन आहे त्यापैकी तुम्हाला जी हवी आहे ते तुम्ही सिलेक्ट करा.

त्यांनतर तुम्हाला खाली सूक्ष्म सिंचनाचे पिके निवडायचे आहे. तर आपण जे पाहिलं होत की पिके ॲड करा. पीक सिलेक्ट करायच आहे त्यांनतर त्याचे अंतर द्यायचं आहे. जे अंतर आहे पिकाच ते मीटर मध्ये सिलेक्ट करायच आहे. आणि त्यांनतर तुम्ही जे पीक लावलेलं आहे ते किती हेक्टर मध्ये आहे ते सिलेक्ट करायच आहे. गुंठयामध्ये असेल तर पॉइंट जे असेल ते टाकायचं आहे.

त्यांनतर तुम्हाला पूर्वसमती ज्या अटी शर्ती आहे त्या मान्य करायच्या आहेत. आणि नंतर तुम्हाला ‘जतन करा’ या ऑप्शन वरती क्लिक करायच आहे. जतन झालेलं आहे जर तुम्हाला अजून पिके ॲड करायची असेल तर जो एसएमएस बॉक्स येतो त्यातील ‘येस’ ऑप्शन वरती क्लिक करा. आणि नसेल करायचे तर ‘नो’ या ऑप्शन वरती क्लिक करा. ‘नो’ केल्यानंतर तुम्हाला होमपेज वरती ‘अर्ज सादर करा’ असा एक ऑप्शन येईल. तिथे क्लिक करायच आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला ‘पहा’ ऑप्शन वरती क्लिक करायच आहे.

त्यावर क्लिक केलेवर तुम्ही आता पर्यंत जितके अर्ज केलेले आहेत ते तुमच्या समोर डिस्प्ले होतील. तर तुम्ही त्यामध्ये पाहू शकता जो आपण अर्ज केला आहे ठिबक सिंचनचा तो ॲड झालेला आहे का नाही. आता हा अर्ज जो आहे तो आपल्याला सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्याच्या पूर्वी तुम्हाला प्राधान्य क्रमांक विचारले जाईल. इथे प्राधान्य क्रमांक तुम्ही देवू शकता.

अगोदर तुम्हाला कोणत्या लॉटरीची अपेक्षा आहे त्या गोष्टीला तुम्हाला प्राधान्य द्यायचे आहे. प्रत्येक अर्जापुढे तुम्हाला 1,2,3,4,असे प्राधान्य द्यायचे आहे. त्यांनतर या योजनेच्या अटी व शर्ती मान्य आहे यावर क्लिक करायच आहे. त्यानंतर ‘अर्ज सादर करा’ या ऑप्शन वर क्लिक करायच आहे. अर्ज सादर झाल्यानंतर तो छाननी मध्ये जाणार आहे. म्हणजे जेव्हा तुमची लॉटरी लागेल तेव्हा तुम्हाला मेसेज येईल की तुमची लॉटरी लागलेली आहे. तुम्ही कागदपत्रे अपलोड करा.

तर इथे ‘मी अर्ज केलेल्या बाबी’ या ऑप्शन मध्ये तुम्ही गेल्यानंतर आपला अर्ज छाननी अंतर्गत आहे अस दाखवण्यात येईल. तर तुम्ही ते चेक करून पहा. त्याची पावती तुम्हाला डाउनलोड करायची असेल तर तिथे पोचपावती असे दिसेल त्यावर डाउनलोड करून घ्यायची आहे. त्यांनतर फीज पेड केलेली पावती सुध्दा तुम्ही तेथून डाउनलोड करू शकता. जेव्हा तुमची लॉटरी लागेल तेव्हा तुम्हाला एसएमएस येईल.

एसएमएस आल्याच्या 10 दिवसाच्या आत मध्ये ‘कागदपत्रे अपलोड करा’ या ऑप्शन वर यायच आहे. इथे आल्यानंतर ‘वैयक्तिक कागदपत्रे अपलोड करा’ या ऑप्शन वर क्लिक करायच आहे. तिथे लॉटरी लागली ते दिसेल त्याचे जे कोटेशन असेल ते तुम्हाला अपलोड करायचे आहे. 7/12 आणि 8अ चे उतारे अपलोड करायचे आहे. आणि ही जी कागदपत्रे आहेत ती तुम्हाला 10 दिवसाच्या आतमध्ये अपलोड करायचे आहे.

नाहीतर तुमचा जो अर्ज आहे तो बाद केला जातो. एकदा कृषी अधिकाऱ्यांना तुम्हाला कॉल करायचा आहे की अजून कोणकोणती कागदपत्रे आम्ही अपलोड करू त्यामुळे आमचा जो फॉर्म आहे तो रीजेक्ट होणार नाही. डिजिटल 7/12 तुम्ही अपलोड करू शकता. तो नसेल तर सही शिक्का असलेला तो तुम्ही सादर करू शकता. कागदपत्रे जी आहेत तुमची ती कृषी अधिकाऱ्यांकडे जाणार आहेत.

सर्व कागदपत्रे ते चेक करतील बरोबर असतील तर तुम्हाला एक पुर्वसमती पत्र जे आहे ते दिल जात. त्या ऑप्शन वर गेलेनंतर तुम्ही पूर्वसमती पाहू शकता. आणि पूर्वसमती मध्ये तुम्हाला किती अनुदान भेटेल ते सर्व माहिती जी आहे ती त्यामध्ये असते. ती सर्व वाचून घ्यायच आहे आणि त्यांनतर तुमचे जे काही असेल ट्रॅक्टर असेल, ठिबक सिंचन असेल, ती जे वस्तू असेल ती तुम्हाला घ्यायची आहे स्वखर्चाने.

वस्तूचे जे जीएसटी बिल असेल ते तुम्हाला तिथे अपलोड करायच आहे. ‘बिल देयक’ हा ऑप्शन आहे त्या बिल देयकच्या ऑप्शन मध्ये जीएसटी बिल अपलोड करा. अपलोड केल्यानंतर ते बिल जे आहे ते चेक केलं जाईल, व्हेरीफिकेशन होईल. सर्व व्यवस्थित असेल तर तुमच जे अकाउंट आहे त्या अकाउंट मध्ये तुमच्या अनुदानाची रक्कम जी आहे ती पाठवण्यात येईल. तर अशा प्रकारे हा जो फॉर्म आहे तो भरायचा आहे.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.