मित्रांनो आपण प्रत्येकजण दैनंदिन जीवनामध्ये पैसे कमवण्यासाठी खूप कष्ट करतो कारण पैसा जीवनाला आवश्यक आहे कारण पैशामुळे आपण चांगले शिक्षण घेऊ शकतो स्वतासाठी चांगले घर घेऊ शकतो आपल्या मुलाला चांगल्या शाळेत शिकू शकतो.
थोडक्यात पैशाने आपण चांगले सुख सुविधा मिळू शकतो जेणेकरून आपलं आयुष्य सुखकर होईल. पण आज असे दिसून येते की माणसे पैसे कमावतात पण त्यांना ते नेहमी कमीच पडतात थोडक्यात किती पैसे कमावले तरी ते टिकत नाही. आर्य चाणक्यांनी पैसे घरात न टिकण्याची तीन कारणे सांगितली आहे चला तर मग बघुया काय आहे ते.
पहिले कारण मूर्ख लोकांचा सन्मान: चाणक्य सांगतात ज्या घरात मूर्ख लोकांचा सन्मान केला जातो तिथे लक्ष्मी कधीच टिकत नाही इथे मूर्ख म्हणजे त्यांना अज्ञानी म्हणायचे आहे उदाहरण द्यायचे झाले तर आपण बघतो हे बुआ बाबा लोक जी असतात ते भोळ्याभाबड्या लोकांचा फायदा उचलतात.
त्यांना महागड्या गोष्टी करायला सांगतात जसे की तुम्ही या खड्याची अंगठी घाला तुमचे घर योग्य दिशेला नाही याची मोडतोड करावी लागेल वगैरे वगैरे अशा लोकांची सगळे पैसे इथेच खर्च होतात तसं पाहायला गेलं तर या बुवा बाबा काही ज्ञान नसते ते फक्त फालतू गोष्टी करायला सांगतात.
त्याच्या मागे सुद्धा काहीतरी फालतू कारण सांगत ज्याला शास्त्रीय आधार नसतो पण अशा लोकांची जी पूजा करतात त्यांच्या घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही पण ज्या घरात ज्ञानी व्यक्ती ची पूजा होते म्हणजे खरंच ज्या व्यक्तीला खरच ज्ञान आहे जो योग्य मार्गदर्शन करतो.
जो फालतू भानगडी तुमच्या मागे लावत नाही ते घर नेहमी प्रगतीपथावर असते अशा घरातली लोक नोकरी किंवा धंदा करत असतील तर ते त्यांच्या क्षेत्रातील टॉप जी लोक आहेत त्यांचे मार्गदर्शन घेतात त्याचे थेट मार्गदर्शन भेटत नसेल तर त्यांची पुस्तके वाचतात अशा प्रकारे त्यांची प्रगती होत जाते आणि लक्ष्मी त्यांच्या घरी येतेच पण तिथे कायम वास करते
दुसरे कारण धनधान्याची नसाडी: चाणक्य सांगतात ज्या घरात धनधान्यचा संचय केला जातो तिथे कष्टाची किंमत आहे आणि तिथे लक्ष्मी नेहमीच वास करते चाणक्यांनी त्यांच्या काळात धनधान्य सांगितले पण आजच्या काळात आपण सेविंग म्हणजे गुंतवणूक म्हणू शकतो ज्या व्यक्तीला सेविंग ची किंमत नाही ज्याचा फक्त पैसे उधळण्यावर भर असतो.
त्याचे म्हणणे असते की उद्याचा कोणी बघितले आजच मज्जा मारून घ्या आणि अशी वाक्य वापरून तो काय करतो जेवढे पैसे कमावले ते सगळ्या महागड्या गोष्टींवर खर्च करतो पण अशा व्यक्तीच्या आयुष्यात अचानक काही संकट ओढवले जसे की कोणी आजारी पडले किंवा नोकरीवरून काढून टाकले नंतर ठप्प झाला अशा वेळेस या लोकांकडे काही गुंतवणूक नसते.
आणि मग ही लोक कर्ज काढतात लोकांकडे पैसे मागतात अशा लोकांकडे लक्ष्मी कधीच टिकत नाही पण जे शहाणे असतात त्यांना माहिती असते की आपल्यावर कधीही आपत्ती येऊ शकते अशा वेळेस त्यांनी गुंतवणूक केलेले पैसे त्यांना कामाला येतात आणि येणाऱ्या आपत्तीला ते शांत चित्ताने तोंड देतात त्यामुळे जी व्यक्ती सेविंग करत नाही त्या व्यक्तीच्या घरी लक्ष्मी टिकत नाही.
तिसरे कारण ज्या घरात नवरा बायको मध्ये भांडण होत राहतात: चाणक्य सांगतात ज्या घरात पती-पत्नी सामंजस्याने राहतात एकमेकांना समजून घेतात एकमेकाचा आदर करतात एकमेकांच्या आवडीनिवडी जपतात अशा घरात लक्ष्मी कायम वास करते पण ज्या घरात पती-पत्नी सारखे भांडत असतात एकमेकांना टचके टोमणे मारतात.
छोट्या छोट्या गोष्टीवरून घटस्फोटाची भाषणे करतात अशा घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही अशा घरात पती-पत्नीमध्ये समंज्यान नसल्यामुळे दोघेपण आनंद बाहेर शोधतात नवरा दारूच्या आहारी जातो आणि बायको महागडे गोष्टीच्या मागे जाते कारण आपले जीवनही आनंद साठी चालले आहे
आणि घरात आनंद भेटत असल्यामुळे दोघेपण आनंद बाहेर शोधतात आणि मग यामुळे त्यांचे सगळे पैसे इथेच खर्च होतात दोघांच्या अशा वागणुकीमुळे मुलांवर संस्कार सुद्धा नीट होत नाही त्यामुळे अशा घरात लक्ष्मी कधीच टिकत नाही त्यामुळे तुमच्या घरात लक्ष्मी किंवा पैसा टिकवायचा असेल नवरा-बायकोने एकमेकांची मनं समजून घेतली पाहिजे समाधानी राहिला पाहिजे तरच लक्ष्मी तुमच्या घरी टिकेल
मित्रांनो थोडक्यात सांगायचे तर चाणक्य सांगतात ज्या घरात मूर्खांची पूजा होते धनधान्याचा संचय होतो म्हणजे सेविंग होत नाही आणि ज्या घरात नवरा-बायको सारखे भांडत असतात त्या घरात लक्ष्मी म्हणजे पैसा कधीच टिकत नाही.
वरील माहिती www.youtube.com/c/ShahanPan या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.