आर्थिक नियोजनाची ही गुरुकिल्ली जरुर सोबत ठेवा !

अर्थकारण

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आपल्याला माहिती आहे ,की आपल्या आर्थिक नियोजन करणे हे आपल्या आर्थिक ध्येयापर्यंत पोहोचण्यासाठी किती महत्त्वाचे आहे. आपल्याला हेही माहिती पाहिजे की, आज पासून 20 वर्षांनी आपल्याला किती पैशाची गरज आहे आपला विमा किती रुपयांचा असला पाहिजे म्हणूनच आज पासून आपल्याला आपली बचत आणि इन्व्हेस्टमेंट करणे गरजेचे आहे. म्हणूनच अगदी साध्या आणि सुटसुटीत भाषेत सांगण्याचा प्रयत्न आहे कि कसे आपण स्वतःचे आर्थिक नियोजन करू शकतो? आणि आपली सर्व स्वप्ने पूर्ण करू शकतो.

वैशिष्ट्ये : 🔴 आर्थिक ध्येय  🔴 बचत  🔴 अत्यावश्यक बचत  🔴 विविध उत्पन्नाचे स्त्रोत  🔴 निवृत्ती नंतरचे जीवन

१. आर्थिक ध्येय –

यामध्ये आपल्याला काही प्रमाणात आपले लक्ष्य निर्धारित करावी लागते. ज्यामध्ये कमी मुदतीचे लक्ष जेणेकरून आपली पर्यटन, कपडे, फी, सन, मुला मुलांची शिक्षण संस्था इत्यादी सारखा खर्च जेकि एक वर्षाच्या आतील असेल अशा खर्चाचा समावेश कमी मुक्तीचे लक्ष यामध्ये समावेश करायला पाहिजे. दुसरं म्हणजे मध्यम मुदतीचे लक्ष ज्यामध्ये, गाडी घ्यायची असेल किंवा घर दुरुस्ती करायची असेल किंवा तीन ते पाच वर्षातील जो काही खर्च आपल्याला माहित असेल किंवा येणार आहे असे वाटत असेल या सर्व खर्चाचा समावेश मध्यम मुदतीचे लक्ष यामध्ये करणे गरजेचे आहे. तिसरे दीर्घ मुदतीचे लक्ष यामध्ये मुलांचे उच्च शिक्षण किंवा एखादं घर घ्यायचा असेल किंवा निवृत्तीनंतरचे जीवन यालाच रिटायरमेंट प्लॅन म्हणतो. या खर्चाचा आणि पद्धतीचा समावेश दीर्घ मुदतीचे लक्ष यामध्ये करणं गरजेचे आहे.

२. बचत- 

अर्थातच सेविंग, सेविंग मध्ये किंवा बचती मध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी मध्ये सेविंग असणं गरजेच आहे. या गोष्टींचा समावेश यामध्ये होतो. रिकरिंग डिपॉझिट, फिक्सड डिपॉझिट आणि पीपीएफ अकाउंट यामध्ये आपली बचत असणे गरजेचे आहे. आणि यामध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट बचत ही आपल्या कुटुंब चालवण्यासाठी.
दुसरा मुद्दा म्हणजे शेअर मार्केट यामध्ये बरेच ऑप्शन आहेत. यामध्ये इक्विटी आहे. मिटिंग मध्ये स्टॉप किंवा म्युच्युअल पण घेऊ शकताे. एसआयपी करू शकताे.

आत्ताचा काळ covid मुळे खूप खूप मंदीचा काळ आहे. आणि या काळातच संधी शोधायची आहे. तुम्ही जर तरुण असाल तर तुम्ही म्युचल फंड किंवा स्टॉप मध्ये इन्वेस्टमेंट करायला काही हरकत नाही. म्युचल फंड मध्ये केलेली इन्व्हेस्टमेंट सोनं आणि रिअल इस्टेटमध्ये केलेल्या गुंतवणुकीपेक्षा नक्कीच जास्त परतावा देणारी ठरेल यात दुमत नाही. तिसरा मुद्दा म्हणजे जीवन म्हणजेच लाइफ इन्शुरन्स.

जीवन विमा कोणाचा असावा? तर घरात ज्या कोणी व्यक्ती कमवत आहेत कमीत कमी अशा व्यक्तींचा तरी जीवन विमा असणे आजच्या परिस्थितीला खूप महत्त्वाचा आहे. एखादी व्यक्ती घरात कमावती नसेल तर तिचा जीवन विमा असलाच पाहिजे असे नाही, पण ज्या व्यक्ती कमवत आहेत त्यांचा तरी नक्कीच जीवन विमा असणे गरजेचे आहे. जीवन विमा किती असावा? तर जो काही वर्षाचा इन्कम आहे त्याच्या वीस पट हा सम assured असणे गरजेचे आहे.

How to Save Money

चौथा मुद्दा आरोग्य, म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. घरामध्ये सर्वांसाठी चा विमा असणे गरजेचे आहे असे समजा की प्रत्येकासाठी कमीत कमी एक लाख रुपये किंवा सर्वांसाठी मिळून कमीत कमी पाच लाख रुपयांचा तरी हेल्थ इन्शुरन्स असणं गरजेचं आहे.

या नंतरचा मुद्दा आहे रियल इस्टेट, तसं म्हणायला गेलं तर आपल्या भारतीय लोकांचा सर्वात आवडता इन्व्हेस्टमेंट. पण रियल इस्टेट जेवढा आपल्याला चांगला वाटतोय तेवढा प्रॅक्टिकली चांगला नाही. कारण रिटर्न्स आपल्याला शेअर मार्केट आणि म्युचल फंड मधून येतात, तेवढे रिटन रियल इस्टेट मधून येताना पाहायला मिळत नाही. पण या ऑप्शनमध्ये एक तरी घर नक्की घेऊ शकता जे की, स्वतःला रहायला असेल आणि सरकारी योजना मधून फायदा मिळवून देऊ शकतो.

या नंतरचा मुद्दा आहे गोल्ड, प्रत्येकाने सोन्यात गुंतवणूक केली पाहिजे. याचा अर्थ असा होत नाही की, आपल्याला ज्वेलरी घ्यायची आहे. कारण ज्वेलरीमध्ये मेकिंग चार्जेस वेगळे असतात. तसेच जर ज्वेलरी मोडायला गेलो तर त्या वेळचे डिडक्शन वगैरे असतात याची वेगळे रेट्स असतात. जर आपण सोन हे इन्व्हेस्टमेंट साठीच घेणार असाल ,तर गोल्ड बॉन्ड यासारखा ऑप्शन उपलब्ध आहे यामध्ये तुम्हाला सोन्याच्या किमती जेवढ्या जास्त असेल तिची किंमत मिळेल प्लस अडीच टक्के वार्षिक व्याज सुद्धा मिळते.

३. अत्यावश्यक बचत- 

याचे महत्त्व खूप आहे, कारण समजा जॉब करत असाल किंवा व्यवसाय करत असताना अचानक job गेला किंवा व्यवसाय तोटा झाला किंवा जॉब चेंज केला किंवा व्यवसाय बदलत असाल तर येणारे सहा महिने खूप अतीतटीच्या असू शकतात. म्हणूनच इमर्जन्सी fund मध्ये आपल्या कुटुंबाचा पुढील सहा महिन्याचा खर्च किती आहे? एवढा इमर्जन्सी फंड जवळ असणे गरजेचे आहे.त्याचप्रमाणे घरातील हॉस्पिटलचा खर्च अचानक उद्भव शकतो. तो सुद्धा खर्च आपल्या एमर्जन्सी fund मध्ये असणं गरजेचे आहे.

४. विविध उत्पन्नाचे स्रोत- 

यामध्ये जर जॉब करत असाल किंवा आपला व्यवसाय असेल तर, त्याच्या जोडीलाच आपल्याकडे काहीतरी साइड बिझनेस असणे गरजेचे आहे. आता या साईड बिजनेस मधून येणारा जो इन्कम आहे हा तुमच्या आधीच्या गरजा पूर्ण करण्यासाठी तुम्ही उपयोगात आणू शकता. यामध्ये ऑनलाइन बिजनेस करू शकता बिझनेस घरच्या घरी आपण करू शकतो. नेटवर्क मार्केटिंग असेल, नेटवर्किंग मार्केट असेल, मल्टीलेवल नेटवर्किंग, डायरेक्ट सेलिंग असेल तर यासारख्या प्रोसेस मधून चांगल्या प्रकारे उत्पन्न कमी होऊ शकतो.

काही महत्त्वाच्या टिप्स

असे समजा, की आपले उत्पन्न हे शंभर टक्के आहे. त्यामधील 30 टक्के भाग हा घर खर्चासाठी वापरायचा आहे. त्यानंतर चा उर्वरित 30 टक्के भाग ,आपली कर्ज किंवा EMI किंवा देणी देण्यासाठी आपल्याला त्याचा उपयोग करायचा आहे. राहिलेल्या 30 टक्क्यांमध्ये आपल्याला भविष्य नियोजनाची तरतूद करून ठेवायला हवी.

आणि राहिलेल्या 10% मध्ये फक्त आपल्याला मनोरंजन यासाठी आपल्याला खर्च करावा लागणार आहे. प्रत्येकाला आयुष्यात कर्ज काढावे लागते. परंतु, 35 ते 40 वर्षापर्यंतच कर्ज काढावं. या नंतरचा मुद्दा मर्यादित बँक खाते, म्हणजेच घरातील प्रत्येकाची भरमसाठ बँकेत खाते असण्यापेक्षा काही मोजक्याच विश्वासू बँकेत खाते असावी. ज्यामुळे परतावा जास्त असेल. मात्र उल्लेख केल्याप्रमाणे घरातील कमावत्या व्यक्तीचा किमान एक तरी term plan नक्की असावा. आणि त्याच प्रमाणे संपूर्ण कुटुंबाचा एक तरी हेल्थ इन्शुरन्स असणे ही आजच्या काळाची गरज आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.