नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
मसाला व्यवसाय सुरू करायचा आहे? किंवा होलसेल मसाला मार्केट शोधत असाल. तर याच्याबद्दल सविस्तर माहिती इथे देत आहे. कमीत कमी किमतीमध्ये, चांगल्यात चांगले मसाले कुठे भेटू शकतात? त्याची सगळी माहिती तुम्हाला येथे भेटेल.
◼️ मसाला बिजनेस सुरु कसा करायचा?
मसाला व्यवसाय जर आपल्याला चालू करायचा असेल तर, आपल्या डोक्यात एक विचार येतो की आपल्याला या बिजनेस मध्ये फायदा होईल का? आपल्याला ते जमेल का? व्यवसाय चालू करायचा की नाही? सगळ्यात स्वस्त मसाले कुठे मिळतील? मसाल्यांचा स्वस्त मार्केट आपल्याला कुठे भेटेल? तरी या सर्वांबद्दल माहिती आज येथे देत आहे.
एक विनंती आहे जेव्हा आपण होलसेल मसाले कुठे भेटतील याच्या शोधात असतो, तेव्हा आपण यूट्यूबला व्हिडिओ बघतो किंवा कोणाच्या तरी रेफरन्स मधून डाटा काढतो. अशा वेळी लोक आपल्याला पूर्ण मार्केट मधून माहिती काढताना मुंबई, पुणे, नागपूर अशा काही ठराविक होलसेलर ची नाव सांगतात.
परंतु तसं पाहायला गेलं तर ही लोक आहेत पुणे नागपूर मुंबईची जी मोठी मोठी लोक आहेत ते स्वतः शेतकरी नाहीयेत किंवा मॅन्युफॅक्चरर नाहीयेत ते फक्त प्रोसेस करून देतात. आपल्याला ते त्यामुळे त्यांचं कमिशन असतं. त्या कमिशन मुळे आपली त्या प्रॉडक्टची खरेदी ची किंमत वाढते.
त्यामुळे आपण ते वाढलेल्या किमती नी खरेदी करतो. तर तुम्हाला या मसाल्यांचा दर होलसेलर चा व्यवसाय करायचा असेल, मसाला मेकिंग बिझनेस करायचा असेल किंवा जर ते तुम्हाला बल्क मध्ये विकण्यासाठी लागत असतील. पॅकिंग करून किंवा स्वतःसाठी खरेदी करायचे असतील तर ते स्वतः खुद्द मार्केट मधून घ्यायचा प्रयत्न करा आणि त्यामुळे तुमचे पैसे वाचतील आणि हा व्यवसाय शिकता सुद्धा येईल.
या व्यवसाय मध्ये आपण खालील काही पॉइंट्स पाहणार आहोत :
१. मुख्य मसाला मार्केट कुठे आहे?
२. मसाल्यांची कॉलिटी कशी चेक करायची?
३. प्रॉफिट किती होऊ शकतो?
४. मार्केट ची माहिती नंबर
५. बिजनेस कसा सुरू करायचा आणि कसा विकायचं कागदपत्रे काय लागतात?
🌶️ मिरची 🌶️ : तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपण मिरची या प्रॉडक्ट बद्दल माहिती जाणून घेऊ. आपल्या जीवनातील खाद्यपदार्थातील सर्वात महत्त्वाचा प्रॉडक्ट आहे हा मिरचीचे तेजा मिरची, बॅडगी मिरची, काश्मिरी मिरची या तीन टाईपच्या मिरच्या खूप जास्त प्रमाणात विकल्या जातात आणि या मिरचीचा सगळ्यात मोठं मार्केट आहे ,आंध्र प्रदेश( गुंटूर )मध्ये जे आशियामधील सर्वात मोठं मार्केट आहे. तसेच कर्नाटक मध्ये बेडगे, हुबली, मैसूर आणि महाराष्ट्र मध्ये पहायला गेलं तर नंदुरबारमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या क्वालिटीच्या मिरच्या पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणावर विकला सुद्धा जातात.
तर मिरची मध्ये कॉलिटी कशी चेक करतात ? : तर काही काही ठिकाणी मिरची मध्ये ओली मिरची मिक्स करून विकतात किंवा मिक्स मिरची विकतात. त्यामुळे तुम्ही जेव्हा पण मिरची खरेदी करू इच्छिता तेव्हा या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे. त्यानंतर आपण जो मार्केट मधून माल घेतो तेव्हा ते आपल्याला कितीपर्यंत मिळतं किंवा जे कोर मार्केट असतात तिथे जर तुम्ही घेतलं तर तुम्हाला प्रत्येक किलोमागे 40 ते 60 रुपये चा फरक जाणवेल. म्हणजेच महाराष्ट्रातील होलसेलर आहेत आणि जे खुद्द मार्केट मधून आहेत यांच्यामध्ये तुम्हाला एवढ्यात फरक जाणवेल.
♦️ जीरा : जीरा मध्ये शाही जीरा, काला जीरा वेगवेगळ्या प्रकारच मार्केट आहे. सगळ्यात मोठा मार्केट गुजरात मध्ये ऊंजा मध्ये आहे. राजस्थान मध्ये नागोर, जोधपूर , जयपूर आणि महाराष्ट्रामध्ये थोड्या प्रमाणात मुंबई एपीएमसी मधून थोड्या प्रमाणात खरेदी करू शकता.
जीरा मध्ये कॉलिटी कशी बघतात? : तुम्ही जिरा हातामध्ये घ्या आणि हातावर चोळून पहा आणि चोळल्याला नंतर जर तुमच्या हाताला काळा रंग लागला तर, समजून घ्यायचं की त्याच्यामध्ये मीलावठ आहे किंवा त्या जिरेला कलर दिलेला आहे. जेव्हा जीरा चे रेट बघतो तेव्हा आपल्याला खुद्द मार्केटमध्ये आणि साधारण मार्केटमध्ये शंभर रुपयांचा तरी फरक जाणवतो. तरी ते तुम्ही तर खुद्द मार्केटमधून आणलं आणि इथे विकलं तर तेवढं प्रॉफिट मिळवू शकता.
⭐ हळद ⭐ : हळदीचं सगळ्यात स्वस्त मार्केट हे महाराष्ट्र मध्ये सांगली आणि नीमुच मध्ये आहे. हे पूर्ण भारता मधलं सगळ्यात चांगलं मार्केट आहे. तसेच तेलंगणामध्ये निजामाबाद येते आणि दिल्लीमध्ये खारी बोली या ठिकाणी सुद्धा हळदीचे मार्केट आहेत.
हळदीमध्ये कॉलिटी टेस्ट कशी करायची : त्यासाठी “पाणी टेस्ट” आहे. एका ग्लासमध्ये थोडंसं पाणी घ्यायचं आणि त्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद न ढवळता टाकायचे आणि पाच मिनिट वाट पाहायचे. जर ती हळद तळाला जाऊन बसले तर समजायचं हळद प्युअर आहे आणि जर हळद तरंगत असेल तर समजून घ्यायचं की त्याच्यामध्ये काही तर मिलावट आहे. अशाप्रकारे तुम्ही प्रोडक्ट खरेदी करताना टेस्ट करून विकत घेऊ शकता. हळदीमध्ये जे प्राइस आहे त्याच्यामध्ये खुद्द मार्केट मधला आणि आपल्या मध्ये जो फरक आहे तो कमीत कमी 100 रुपयाचा तरी जाणवेल. तिथपर्यंत तुम्हाला जर ते या मार्केट मधून तुम्ही खरेदी केलं तर मार्जिन भेटेल.
इलायची : इलायची मध्ये तुम्हाला सगळ्यात जास्त प्रॉफिट मिळतं. इलायची मध्ये 8MM पासून ते 5MM पर्यंत विलायची चे प्रकार असतात. भारतामध्ये सगळ्यात जास्त विलायची केरळ मध्ये होते. सिक्किम मध्ये 300- 400 पर्यंत मिळते पण भेटत नाही ती साईज ,भेटत नाही ती टेस्ट, भेटत नाही त्यामुळे विलायची चा सर्वात मुख्य मार्केट केरला चा आहे. आपल्याला 90% विलायची केरळ मध्येच भेटते. तिथे auction साठी लायसन्स असतं. पण आपण तिथून विलायची खरेदी करू शकतो. सोबतच कर्नाटक मध्ये आणि तमिळनाडूमध्ये ही काही ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रतीची विलायची खरेदी करू शकता.
इलायची मध्ये क्वालिटी कशी बघायची : विलायची हातावर घेतल्यानंतर ती चोरून पहा. तुमच्या हाताला ग्रीन कलर लागला तर समजुन जा की भेसळ आहे. त्याने तो ग्रीन कलर लावलेला असतो. आणि अशाप्रकारे तुम्ही क्वालिटी चेक करू शकता. विलायची मध्ये मुख्य मार्केट मध्ये आणि आपल्या मार्केटमध्ये जवळजवळ हजार रुपयांचा फरक पडतो. तर तुम्हाला विलायची च्या बिजनेस मध्ये इथपर्यंत मार्जिन भेटतं.
काली मिर्च : काळी मिरी ही जास्त प्रमाणात केरला मध्ये तयार होते. कोची याठिकाणी त्याचे मार्केट आहेत. तिथून तुम्ही खरेदी करू शकता त्याच बरोबर कर्नाटक मध्ये तमिळनाडूमध्ये असे मोठे मोठे होलसेल मार्केट तेथून तुम्ही काळीमिरी खरेदी करू शकता. काळा मेरी मध्ये खूप जास्त भेसळ होते. ती आपण पाण्याचा टेस्ट वरून ओळखू शकतो.
एक ग्लास पाणी घ्या आणि त्याच्या मध्ये खूप सारे मिरी टाका आणि पंधरा मिनिटं वाट बघा जर ती ओरिजनल काळीमिरी असेल तर ती पाण्याच्या तळाला जाऊन बसेल आणि जर ती मिरी तरंगत असेल तर समजून जा की त्याच्यामध्ये भेसळ आहे. आणि ती त्याच्यामध्ये पपईच्या बिया टाकून केलेली असेल तर त्या सार्या पपईच्या बिया पाण्याच्या वरती तरंगती ल म्हणजे आपल्याला समजेल की, किती प्रमाणात आपल्याला भेसळ चा माल दिला जातो. काळा मेरी चा जर रेट बघितल तर जवळजवळ खुदा मार्केटमध्ये आणि आपल्या मार्केटमध्ये पर किलोमागे शंभर ते दीडशे रुपयांचा फरक जाणवतो. तर तो आपण खुद्द मार्केट मध्ये खरेदी करून शंभर ते दीडशे रुपयांचा मार्जिन मिळू शकतो.
📌 मसाला बिझनेस माहिती आणि कागदपत्रे :
मसाला बिझनेससाठी लागणारा जो काय स्टडी आहे, तो तुम्ही स्वतः करा. स्वता त्याच्यामध्ये तुम्ही मार्केटमध्ये फिरा. मार्केटमध्ये स्वतः बघा ते कसे विकतात. स्पर्धक तुमचे जे कॉम्पिटीटर आहेत त्यांचे दर ते कसे विकतात त्याची माहिती काढा. हा सर्व स्टडी झाल्यानंतर मग तुम्ही बिझनेससाठी लागणारा चे काही बेसिक मशीन (जसे की स्टापलर, पॅकिंग मशीन) आहे ,जागा याचा विचार करा त्याची तयारी करा की, आपण हा सगळा माल कुठेपर्यंत घेऊ शकतो?
कुठे स्टोअर करू शकतो? या सगळ्या माहिती एकत्र करून ठेवा आणि व्यापारी लोकांशी चांगली मैत्री करून ठेवा. कारण तुम्हाला या लोकांशीच भविष्यात डिल करायचे आहे. कारण लोकांना तुम्ही एक दोन- एक दोन पीस द्याल पण व्यापाऱ्यांकडून तुम्हाला मोठ्या ऑर्डर्स मिळू शकतात. त्यामुळे त्यांच्याशी मैत्री करून ठेवा आणि बिझनेसची नोंद करायला विसरू नका.
सुरुवातीला फसई आणि जीएसटी चा लायसन्स नाही घेतलं तरी चालेल, परंतु एखाद्या किराणा मालाच्या नावाने किंवा छोट्या बिजनेस एंटरप्राइजेस च्या नावाने सुरुवातीला बिजनेस रजिस्ट्रेशन करून ठेवा. जेणेकरून तुम्हाला नंतर काही व्यवहारामध्ये इशू येणार नाही. नंतर तुम्हाला जीएसटी हा घ्यावा लागेल कारण, तुम्हाला मसाल्यामध्ये प्रत्येक मसाल्याचा काही ना काही प्रमाणात जीएसटी हा द्यावा लागतो.
त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे “मेन मार्केट” : जेव्हा पण तुम्ही मसाले खरेदी करणार असाल, ते मेन मार्केट मधूनच करा जेणेकरून तुमचे पैसे वाचतील. आणि अर्निंग साठी एक सिंपल फंडा आहे तो म्हणजे, स्मॉल पॅकेजिंग चा बिजनेस करा. मसाले पॅकेजिंग करताना ते स्मॉल पॅकेज करा. कोणतेही मसाले तुम्ही एक आटोमॅटिक मशीन घेऊन पॅकिंग करू शकता. त्या अगदी रिझनेबल रेट मध्ये आहेत. त्या मशिनरी मिनिमम एक लाखापर्यंत मिळतात.
ऑटोमॅटिक मशनरी मध्ये छोटे छोटे पॅकेट करून तुमचा स्वतःचा ब्रॅण्ड बनवून तुम्ही ते विकू शकता. कारण जे छोटे छोटे पाकीट असतात ते मोठ्या प्रमाणावर घेतले जातात. कारण मसाले कुणी मोठ्या कॉन्टिटी मध्ये घेत नाही. छोट्या छोट्या पाऊच मध्येच विक्री चांगली होते. तसं नसेल तर तुम्ही ब्रिस्टल पॅकेजिंग च्या छोट्या मशिनरी घेऊ शकता. ब्रिस्टल पॅकिंग मध्ये सुद्धा हे विकलं जातं.
हे मॅन्युअल किंवा ॲटोमॅटीक बनत या मशनरी 15 हजारापासून मिळतात किंवा जर तुम्हाला बल्क मध्ये विकायचं असेल तर, बलकर पॅकेजिंग च्या सुद्धा मशिनरी मिळतात. त्यांच्या मदतीने तुम्ही ऑटोमॅटिकली अर्धा किलो, एक किलो बल्क मध्ये मसाले पॅक करू शकता. ही मशीन तुम्हाला तीन साडेतीन लाखांच्या आसपास मिळू शकते. आणि त्याच्या पेक्षा जास्त मोठ्या किमतीच्या सुद्धा मिळतात. तर अशाप्रकारे तुम्ही पॅकेजिंग करून सुद्धा कमाई मिळू शकता. अशाप्रकारे तुम्ही हा बिजनेस सुरू करू शकता.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा