ट्रेंडसोबत जायचं असेल तर फॉलो करा या हेअर स्टाईल्स

लोकप्रिय

आजच्या युगात केवळ कामात निपुण असून चालत नाही तर बदलत्या काळाप्रमाणे स्वत:च्या व्यक्तिमत्त्वात बदल करणंही तितकंच गरजेचं आहे. विशेषत: करिअरिस्ट महिलांना स्वत:चा पेहराव, नीटनेटकेपणा या कडे विशेष लक्ष द्यावे लागते. उत्तम आणि सुयोग्य पेहरावासोबतच महत्त्वाची असते ती उत्तम हेअर स्टाईल.

सध्या अनेक हेअर अ‍ॅक्सेसरीजच्या मदतीने उत्तम हेअर स्टाईल सहज करता येणं शक्य असलं तरी घाईत ती साधतेच असं नाही. अशा वेळी स्टायलिश हेअर कटने तुम्ही व्यक्तिमत्त्वाला एक नवा लूक देऊ शकता. नेहमीच्या त्याच त्याच लूक मुळे बोअर झाला आहात ? मग नवा लूक देणा-या आणि व्यक्तिमत्त्वाला चार चांद लावणारे हे हेअर कट जरूर ट्राय करा.

बॉब कट – सध्या शॉर्ट हेअरचा ट्रेंड सुरु आहे. उत्तम ग्रुम केलेला बॉब कट व्यक्तिमत्त्वाचा नवा पैलू समोर आणतो. अनेक बॉलिवूड अभिनेत्रीही या ट्रेंडच्या प्रेमात दिसून येत आहेत.

8 Bollywood Celebrities Who Inspire You to Rock the Bob-Lob Trend

 

चॉपी लेअर्स-  केस मोकळे सोडायचे आहेत, पण सतत सावरण्याचा कंटाळा आहे तर चॉपी लेअर्स हा हेअर कट फक्त तुमच्यासाठी आहे. काहीसं मेस्सी हेअरस्टाईलचा लूक हा हेअर कट देतो. कपाळ मोठं असेल तर हा हेअर कट जास्त खुलून दिसतो.

10 Indian Female Celebrity Hairstyles To Try!

 

फुल फ्रिंज – फ्रिंज ही कायम ट्रेंडमध्ये राहणारी हेअर स्टाईल आहे. कपाळ मोठं आहे असं तुम्हाला वाटत असेल तर स्टायलिश दिसण्यासाठी ही सर्वात बेस्ट हेअर स्टाईल आहे. विशेष म्हणजे यासोबत तुम्हाला लाँग किंवा शॉर्ट हेअर्सचा ऑप्शन निवडता येतो. त्यामुळे तुम्ही हवी तशी हेअर स्टाईल निवडून लूक आणखी खास बनवू शकता.

priyanka chopra hd  wallpaper,hair,face,hairstyle,lip,beauty,chin,bangs,skin,eyebrow,layered  hair, #1243056 - Wallpaperkiss

 

 

साईड बॅंग्ज‌ – कपाळावर रुळणारे बॅंग्ज आवडत असतील तर ही हेअर स्टाईल खास तुमच्यासाठी आहे. मधून भांग पाडत असाल तर ही हेअरस्टाईल खास तुमच्यासाठी आहे. विशेष म्हणजे या हेअर कटमध्ये लेंग्थचे अनेक ऑप्शन्स तुमच्या समोर आहेत.

Lara Dutta in Emraan Hashmi's Azhar? - Bollywood News & Gossip, Movie  Reviews, Trailers & Videos at Bollywoodlife.com

 

लेअर्ड बॉब-  हा सध्या ट्रेंड मध्ये असलेला हेअर कट आहे. शॉर्ट हेअर स्टाईलची आवड असेल तर हा हेअर कट जरुर ट्राय करा. हा हेअर कट तुमच्या केसांमध्ये व्हॉल्यूमचा फील देऊ शकतो.

Going For A Chop Let These Bollywood Stars Inspire You With Their Short  Hairstyles

 

पिक्सी-  पीके मध्ये अनुष्का शर्माचा हा हेअर कट अनेकांना आवडला होता. कमीत कमी साधनांमध्ये मेंटेन होणारा म्हणून हा हेअर कट प्रसिद्ध आहे. त्यामुळे टॉम बॉय लूकच्या प्रेमात असाल तर ही स्टाईल कॅरी करायला हरकत नाही.

Check Out: B-Town actresses sport the Pixie cut : Bollywood News - Bollywood  Hungama