नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
आज आपण बघणार आहोत मिस्टर रॉबिन शर्मा यांच्या 5 AM क्लब या पुस्तकाचा सारांश :
या पुस्तकात त्यांनी एक सिक्रेट आपल्याला सांगितले आहे,आणि ते ही एका गोष्टीच्या माध्यमातून. जे सेक्रेट सर्व यशस्वी लोक स्वतःच्या जीवनात फॉलो करतात. गोष्टीच्या सुरवातीला एक बिझनेस सेमिनार चालू असतो, यामध्ये प्रसिध्द उद्योजक मोटिवेशनल भाषण देत असतो.या सेमिनारमध्ये आपल्या गोष्टीतील दोन कॅरेक्टर आहेत. एक म्हणजे डिप्रेस उद्योजक महिला जी तिच्या बिजनेस मध्ये खूप हताश झालेली आहे.
दुसर म्हणजे फ्रस्टेटेड आर्टिस्ट,ज्याला स्वतःला आणखी क्रिएटिव बनवायचे आहे. ते आपापसात बोलत असतात, तेवढ्यात मागून उठून एक व्यक्ती येते जो दिसायला अत्यंत गरीब दिसत होता आणि त्याने जुने आणि मळलेले कपडे घातले होते परंतु आश्चर्याची गोष्ट ही की त्यात गरीब बिचारे व्यक्तीने एक लाख डॉलरच घड्याळ घातलेले असत. आता त्या तिघांमध्ये चर्चा सुरू होते आणि हळूहळू या दोघांनाही हे कळत की ती व्यक्ती गरीब नसून एक बिलिनियर आहे.
तो जुने आणि मळलेले कपडे यासाठी घालतो की त्याला नेहमी याची जाणीव राहावी की आपण कोठून आलो आहोत. तो श्रीमंत व्यक्ती त्या दोघांना सांगतो की मला अशी प्रभावी टेक्निक माहित आहे जी सर्व यशस्वी लोक वापरतात, व मी ती तुम्हाला फ्री मध्ये सांगू पण शकतो.फक्त त्यासाठी तुम्हाला सकाळी पाच वाजता मला भेटावे लागेल. उत्सुकतेपोटी ते दुसऱ्या दिवशी ते दोघेही सकाळी पाच वाजता उठून त्या श्रीमंत व्यक्ती भेटायला जातात.
तेव्हा तो श्रीमंत व्यक्ती त्यांना सांगतो की सकाळी पाच वाजता उठण्याचे सवयीमुळे मी माझे साधारण जीवन बदलू शकलो व यशस्वी आणि श्रीमंत होवू शकलो. पाच वाजता उठल्यामुळे माझी क्रिएटिव्हिटी वाढली, एनर्जी डबल झाली आणि प्रॉडक्टिविटी म्हणजेच काम करण्याची क्षमता तिप्पट वाढली.हे कसे झाले?असे विचारल्यानंतर त्याने सांगितले की आपल्या सर्वांचे मेंदूची एनर्जी लिमिटेड असते, ज्याला आपण बँडविड्थ असे म्हणतो.
आपण दिवसभर खूप काही करत असतो.फिरतो,न्यूज बघतो, लोकांना भेटतो, सोशल मीडियाचा वापर करतो, इत्यादी अनेक वेगवेगळ्या गोष्टी करताना आपल्या मेंदू थकुन जातो. कॉन्सन्ट्रेशन कमी होत आपल्या मेंदूची बँडविड्थ जवळपास संपून जाते.त्यामुळे आपण वेगवेगळ्या कामांवर कॉन्सन्ट्रेशन करू शकत नाही,आपली एनर्जी लवकर संपते.परंतु जर तुम्ही सकाळी पाच ला उठला तर तुमच्याकडे गोल्डन संधी असते,काम विचलित न होता करण्याची.
त्या श्रीमंत व्यक्तीने सांगितले की हे सगळे यामुळे होते की तुम्ही सकाळी पाचला उठते तेव्हा तुमच्या मेंदूमध्ये प्रीफनटल कॉर्टेक्स हा अवयव जो की लॉजिकली विचार करण्याचे काम करतो तो काही वेळेसाठी बंद असतो. त्यामुळे तुम्ही सकाळी पाच ला उठलेत जास्त विचार डोक्यात नसतात.तुमचे टेन्शन पण खूप कमी असते. त्यामुळे हा फायदा होतो की तुम्ही शांत असतात.जास्त विचार नाही,जास्त डिस्टर्ब नाही. सकाळी तुमचा मेंदू फुल एनर्जीने काम करतो.
कॉन्सन्ट्रेशन वाढलेले असते. प्रॉटडक्टिविटी वाढलेली असते.नंतर ती श्रीमंत व्यक्ती त्या दोघांना स्वतःच्या प्रायव्हेट जेट मधून मोरिशियस म्हणजेच स्वतःच्या घरी घेऊन जातो. तिथे त्यांना जीवनाचे चार पीलर बद्दल माहिती सांगतो.जे चार पिलार आहेत ते सगळ्यांकडेच आहेत. फक्त आपण त्यांची काळजी घेणे आवश्यक आहे. त्यातला पहिला पिलर म्हणजे माईंड सेट.आपल्या सर्वांना माहीतच आहे की आपण चांगले विचार केले पाहिजेत, सकारात्मक विचार केले पाहिजे, चांगले वाचले पाहिजे, त्यामुळेच आपण जीवनात पुढे जाऊ. यासाठी आपला माईंड सेट चांगला ठेवला पाहिजे.
नंतर त्या श्रीमंत व्यक्तीने सांगितले की आणखी तीन पिलर आहेत याचा विचार आपण करत नाही.या तीन पिलरवर काम केले नाही तर, तुम्ही फक्त 25 टक्केच पोटेन्शियल वापराल. दुसरा पिलर आहे , हार्ट सेट यामध्ये समावेश होतो तुमचा भावनात्मक परिस्थितीचा, जर तुमचा माईंड सेट खूप चांगलं जरी असेल तरी तुम्ही कुठलेही काम प्रॉपर करू शकणार नाही.जर तुम्ही भावनात्मक दृष्ट्या स्टेबल आणि शांत नसेल तर.
आपण म्हणतो ना की आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या पाहिजेत, नाहीतर ते मनातच राहून प्रॉब्लेम होतो व दुसर्या कुठल्याही पद्धतीने ते बाहेर पडतात. त्यासाठी आपल्या भावनांना व्यक्त होऊ द्या आणि समाधानी राहा.हार्ट सेट वर फोकस करून त्याला निरोगी ठेवा. तिसरा पिलर म्हणजे हेल्थ सेट.
हेल्थ सेट म्हणजे फिजिकल हेल्थ सेट. शारीरिक दृष्ट्या मजबूत असणे. समजा तुमच्याकडे सर्व काही आहे पैसे आहे, कार आहे, बंगला आहे,परंतु तुमची तब्येत ठीक नाही किंवा तुम्ही फिजिकली फिट नाही तर या सर्वांचा काय उपयोग.यासाठी हेल्थ सेटची काळजी घ्या.फिट आणि हेल्डी रहा.”हेल्थ इज वेल्थ” म्हणूनच म्हटले जाते.
शेवटचा सेट आहे सोल सेट. त्या श्रीमंत व्यक्तीने सांगितले की सर्व लोक पैसा,सुख सुविधा, यांच्या मागे धावतात परंतु कोणीही आपल मन,आपला आत्माकडे लक्ष देत नाही. तुम्ही मनाला शांती मिळावी यासाठी ध्यान धारणा करायला हवे. त्याने तुम्हाला समाधान आणि शांती मिळेल.हे सर्व ऐकल्यानंतर त्या बिझनेसवुमन आणि आर्टिस्ट वर खूप प्रभाव पडला.
ते बोलले की ठीक आहे मान्य आहे हे सर्व महत्त्वाचे आहे, पण याला आम्ही याला फॉलो कसे करायचे. हे सर्व जीवनात कसे वापरायचे. तेव्हा त्या श्रीमंत व्यक्तीने त्या दोघांना सांगितले की या साठी एक फॉर्मुला म्हणजेच एक सूत्र आहे. तो फॉर्मुला हे ट्वेंटी/ ट्वेंटी/ ट्वेंटी रुल. तो बोलला की फक्त सकाळी पाच वाजता उठणे महत्त्वाचे नाही तर त्यानंतर तुम्ही काय करता हे जास्त महत्त्वाचे आहे.
तुम्ही पाचला उठून मोबाईलवर टाईमपास केला तर उपयोग काहीच होणार नाही पण मी मात्र नक्की होईल. त्यासाठी तुम्हाला सकाळी पाचला उठून पाच ते सहा या वेळेत विशिष्ट काम करायचे आहे. ट्वेंटी-ट्वेंटी फॉर्म्युला जाणून घेऊयात. पहिल्या ट्वेंटी मिनिट्स मध्ये तुम्हाला व्यायाम करायचा आहे किंवा एक्ससाइज कशी करायची आहे की ज्यामुळे तुम्हाला घाम येईल त्यामुळे तुमचा श्वासच स्पीड वाढेल,असे या पुस्तकात सांगितले आहे.
एक्झरसाइज मुळे घाम आल्यावर तुमच्या शरीरातील कॉर्टिसोल हार्मोन कमी होते जे की ताणतणाव आणि भीती निर्माण करणारे हार्मोन आहेत. याव्यतिरिक्त एक प्रोटीन असते त्यांचं नाव आहे बीडीएनएफ मुळे वाढते. बीडीएनएफ ही प्रोटीन सेलला व्यवस्थित ठेवतात. त्यामुळे ट्वेंटी मिनिट्स एक्झरसाइज गेल्यामुळे तुमचा ब्रेन रिफ्रेश होऊन चांगले काम करायला लागतो.
नंतरचे ट्वेंटी मिनिट्स आत्मा आणि मनासाठी द्यायचे आहेत. ज्यामध्ये तुम्ही स्वतःवर फोकस करू शकाल.या ट्वेंटी मिनिट मध्ये तुम्ही ध्यानधारणा करा. त्यामुळे तुमचा फोकस आणि कॉन्सन्ट्रेशन वाढेल. त्यामुळे तुम्ही शांत आणि समाधानी राहाल. ज्यामध्ये तुम्ही ओमकार, ब्राह्मणी प्राणायाम करू शकतात. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न होईल व तुम्हाला खूप एनर्जी मिळेल. शेवटचे ट्वेंटी मिनिट हे तुमच्या ग्रोथसाठी आहेत. यामध्ये तुम्ही काही नवीन गोष्टी शिकू शकता, एखादी नवीन पुस्तक वाचू शकता, तुमच्या दिवसाचे प्लॅनिंग करू शकता, तुमच्या आवडीची कुठलीही गोष्ट करू शकता.
कोणती ही गोष्ट जी तुमची ग्रोथ करेल, ती करू शकता. तुमचा जॉब, बिझनेस, शिकू शकता. जगातील बहुतेक लोक हे करतात.हा आहे ट्वेंटी ट्वेंटी ट्वेंटी फॉर्म्युला.जर तुम्ही हा फॉलो केला तर तुम्ही 5 क्लब चे मेंबर बनून जाल.परंतु गोष्ट इथेच संपत नाही ती श्रीमंत व्यक्ती नंतर सांगते की तुमच्या दिवसाचा शेवटचा एक तास पण तेवढाच महत्त्वाचा आहे जेवढे की पहिला एक तास.आजकाल बहुतेक लोक रात्री उशिरापर्यंत जागे असतात,कारण ते मोबाईलवर, गेम सोशल मीडियावर वेळ घालवतात, मोबाईल लॅपटॉप वर बघितल्याने शरीरातील मेल्याटोनिन नावाचे केमिकल कमी होते.
या केमिकल मुळे आपल्याला झोप येते.यासाठी श्रीमंत ग्रस्त म्हणतात की रात्री आठ वाजता तुम्ही मोबाईल,लॅपटॉप, टीव्हीपासून दूर व्हायला हवेत. कमीत कमी झोपायचे एक तास अगोदर तरी दुर व्हा.झोपायच्या आधी कोमट किंवा गरम पाण्याने अंघोळ करा,रिलॅक्स व्हा, मेडिटेशन करा, आवडीचे एखादे पुस्तक वाचा. त्यामुळे तुम्हाला लवकर व शांत झोप लागेल. तुम्ही दहा वाजता झोपले पाहिजे. जर तुम्ही दहाला झोपाल तरच तुम्ही सकाळी पाचला उठू शकाल.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.