नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
लग्न हा कोणत्याही मुलीच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण असतो. लग्न तिच्या आयुष्यातील असं वळण आहे ज्यात ती अनेक बदलांना सामोरं जात असते.
या दिवसासाठी प्रत्येक मुलीने एकदा ना एकदा स्वप्न पाहिलेलं असतं.
यासाठी तिने काही प्लॅनिंगही केलं असतं. पण लग्नासारख्या सोहळ्यासाठी खुप तयारी करावी लागते. अशा वेळी अनेकदा खरेदी करताना त्वचेच्या आणि केसांच्या आरोग्याकडे आपसूक दुर्लक्ष होतं. अशावेळी लग्नासाठी अत्यंत कमी वेळ शिल्लक असताना केमिकलचा मारा केला तर केसांचा पोत बिघडून खराब होण्याची शक्यताच जास्त असते. त्यामुळे रोज कितीही बिझी असलात तरी केसांसाठी थोडासा वेळ जरुर काढा.
या सोप्या टिप्सनी तुम्ही लग्नापुर्वी केसांची योग्य प्रकारे काळजी घेऊ शकता-
ऑईलिंग – केसांना योग्यवेळी केलेलं ऑईलिंग केसांसाठी वरदान आहे. यामुळे केसांची मुळं कमजोर होत नाहीत. त्यांना आवश्यक ते योग्य पोषण मिळतं. या दरम्यान मालिश केली की रिलॅक्स होण्यासही मदत मिळते.
डीप कंडिशनिंग – केसांच्या मुळांना ऑईलिंगने तर केसांच्या शेंड्यांना कंडिशनिंगने पोषण मिळतं. त्यामुळे लग्नाला एक महिना बाकी असेल तर प्रत्येक वॉशवेळी केसांना आवर्जून डीप कंडिशनिंग करा. त्यामुळे केस रुक्ष न होता मऊ राहतात.
केमिकल ट्रीटमेंट टाळा – लग्नाला महिना भराचाच अवधी बाकी असेल तर केमिकल ट्रीटमेंट शक्यतो टाळा. कारण जर यामुळे अॅलर्जी किंवा तत्सम काही त्रास झाला तर तुमचा स्पेशल डे चा मुड खराब होऊ शकतो.
नवीन एक्सपेरिमेंट्स ना नो – अनेकदा लग्नाच्या दिवशी खास दिसण्यासाठी आपण वेगवेगळे एक्सपेरिमेंट्स करतो. पण खरं तर या दरम्यान कोणतंही नवीन एक्सपेरिमेंट करणं टाळा. अनेकदा लूकबाबतचे अंदाज चुकू शकतात. त्यामुळे शक्यतो नवीन एक्सपेरिमेंट करणं टाळा.
ट्रीम करा – वेळोवेळी केसांना ट्रीम करत रहा. यामुळे दुतोंडी केसांचं प्रमाण कमी होऊन केसांची वाढ होण्यास मदत मिळते. याशिवाय वेळोवेळी केलेल्या ट्रीमिंगमुळे केस निर्जिव होण्याचं प्रमाण अतिशय कमी होतं.
हीटींग इंस्ट्रुमेंट – लग्नापुर्वी आपण अनेकदा विविध कार्यक्रमांना हजेरी लावतो. अशा वेळी अनेकदा स्ट्रेटनर, कर्लरचा वापर केला जातो. पण लग्नाला केवळ एक महिना बाकी असेल तर हे करणं टाळा. हीटींग इंस्ट्रुमेंट केसांना मोठ्या प्रमाणावर डॅमेज करतात. त्यामुळे शक्यतो हीटींग इंस्ट्रुमेंट टाळलेलच बरं.
डाएट – केसांच्या आरोग्यावर खान पान जीवनशैलीचा प्रभावही खुप असतो. त्यामुळे जंक आणि मसालेदार फुड टाळा. त्याऐवजी चौरस आहार आणि ड्रायफ्रुट्स खाण्यावर भर द्या.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.