टोल नाक्यावर मिळतात इतके फायदे सामान्य जनतेला माहीतच नाही ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

टोल नाक्यावरती वाहनधारकाने टोल भरल्यानंतर मिळणाऱ्या पावती च्या माध्यमातून वाहनधारकांना संबंधित टोलच्या रोडवरती अनेक सुविधांचा लाभ घेता येतो मात्र सामान्य जनतेला याची माहिती नसल्यामुळे बरेच सामान्य वाहनधारक या मिळणार्‍या सुविधांपासून वंचित राहतात. म्हणून च आपण टोल नाक्यावर मिळणाऱ्या पावतीच्या आधारे कोणकोणत्या सुविधा मिळविता येतात याबाबत सविस्तर माहिती पाहणार आहोत.

टोल नाक्यावर मिळतात इतके फायदे सामान्य जनतेला माहीतच नाही : भारतामध्ये रस्ते निर्मितीसाठी खर्च झालेले पैसे टोल नाक्याच्या स्वरूपात परत वसूल केले जातात. एक्स्प्रेस हायवेवरून आपण जात असाल तर त्या ठिकाणी टोल हा उभारलेला आपल्याला दिसून येतो, टोलचा दर हा वाहनाचा आकार, वजन याच्यावरती कमी-अधिक ठरलेला असतो. त्यासाठी टोल वसुली नाक्यावर आपल्याला वेगवेगळ्या वाहनांच्या रांगा दिसून येतात.

टोल नाक्यावरील पावतीच्या बदल्यात वाहनधारकांना कोण कोणते फायदे मिळतात : १. एक्सप्रेस हायवे वरती काही विशेष सुविधा वाहनधारकांना देण्यात येतात जसे की वाहनाची इंधन संपले किंवा वाहनाची बॅटरी डिशचार्ज झाली अशा वेळी त्या वाहनाला वाहन जिथे आहे त्या ठिकाणी इंधन नेऊन देणे व बाहेरून बॅटरी चार्जिंग देण्याची जबाबदारी टोल वसुली करणाऱ्या कंपनीची असते.

२. ज्या रस्त्यावर टोल लागू आहे त्या रस्त्यावरून वाहन धारक टोल रक्कम भरून जात असेल आणि वाहनधारकांची वाहन रस्त्यात बंद पडले तर ते वाहन टो करून नेण्याची जबाबदारी टोल टोलवसुलीचा ठेका घेणाऱ्या कंपनीची असते.

३. तुमच्या वाहनाचा अपघात जरी झाला तरी तुम्ही टोलच्या पावतीवरील क्रमांकावरती संपर्क करून मदत मागवू शकता.

४. वाहनाची इंधन संपल्यास पाच ते दहा लिटर पर्यंत इंधन मोफत मिळते तसेच गाडी पंचर झाल्यास सुद्धा तुम्हाला संबंधित कंपनीकडून मदत मिळविता येते.

५. टोलवसुलीचा ठेका घेतलेला कंपनीने टोल नाक्याजवळ स्वच्छतागृह, पिण्याच्या पाण्याची सोय वाहनधारकांसाठी करून देणे बंधनकारक आहे तसे आपल्याला आढळून न आल्यास वाहनधारकांना तक्रार करण्याचा सुद्धा अधिकार आहे.

बी. ओ. टी. तत्व : टोल नाक्याच्या संदर्भांमध्ये आपण बी. ओ. टी तत्व हा शब्द नेहमी वापरतो. हे नक्की काय आहे हे या ठिकाणी आपण थोडक्यामध्ये पाहूया. बी.ओ.टी चा पूर्ण अर्थ आहे बिल्ड ऑपरेट अँड ट्रान्सफर, राज्य सरकार अथवा केंद्र सरकारकडुण रोडचे बांधकाम करण्याचा ठेका खाजगी गुत्तेदार घेतात. रोडचे काम पूर्ण झाल्यानंतर खाजगी गुत्तेदार कराराप्रमाणे काही ठरावीक वर्षे टोल नाक्याच्या माध्यमातून रोडच्या बांधकामासाठी खर्च झालेले पैसे वसूल करत असतात.

बांधकामाला लागलेल्या खर्च टोल च्या माध्यमातून वसूल झाल्यानंतर टोल वसूली चा दर हा 40% इतकाच ठेवला जातो. नंतर वसूल केल्या जाणारा टोल हा नवीन रोडच्या नंतरच्या देखभालीसाठी असतो पारंपरिक पद्धतीने वसूल केल्या जाणार्‍या टोल हा आता काही ठिकाणी फास्टट्रॅक प्रणालीद्वारे वसूल करण्यात येत आहे फास्टट्रॅक प्रणालीमध्ये टोल नाक्यावर लावलेल्या स्कॅनर यंत्रणेद्वारे वाहनाच्या समोरील काचेवर लावलेल्या फास्टट्रॅक चा बारकोड स्टिकर ला स्वयंचलित रीत्या स्कॅन केले जाते

आणि फास्टटॅग शी सलग्न खात्यातून टोल चे पैसे ऑटोमॅटिकली वसूल केले जातात यामुळे टोल नाक्यावरती वाहनांच्या रांगा लागणे कमी होते व वेळेची व इंधनाची बचत होते. अशा प्रकारे टोलवसुलीचा कॉन्ट्रॅक्ट घेतलेल्या कंपनीकडून वाहनधारकांना विविध सुविधा मिळविता येतात. सामान्य जनतेला ही माहिती खूप महत्त्वाची ठरेल यात काही शंकाच नाही.

1 thought on “टोल नाक्यावर मिळतात इतके फायदे सामान्य जनतेला माहीतच नाही ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

  1. टोल हि सरकारमान्य वाटमारी आहे…त्यासाठी गुंड पोसून त्यानाच ठेका दिला जातो..कुणी आवाज काढला तर तिथेच ठोकून काढतात..पोलिस यंञणा सुद्धा यानाच सामील आसते.यांच्याकडून सोयीसुविधा आपेक्षा करणेही मूर्ख पणा ठरतो.

Comments are closed.