📺 टॉप ५ मराठी मोटिव्हेशनल चित्रपट ।। सर्वांनी नक्की बघावे असे मराठी चित्रपट जाणून घ्या या लेखातून ! 📺

मनोरंजन लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

अनेक पालकांच्या तक्रारी असतात की आमची मुले अभ्यास करत नाही, आणि आहे त्या परिस्थितीशी जुळवून घेत नाहीत, हार्ड वर्क करण्याची त्यांची मानसिकता नाही, आपल्या मित्र- मैत्रिणींना ज्या सुखसुविधा आहेत, त्या त्यांनाही हवे असतात. या सर्व सवयी बदलणे पालकांना च काय तर शिक्षकांनाही कठीण जाते.

तुमच्या मुलांच्या या समस्या ते स्वतःहून दूर करतील, त्याच्यात जिद्द निर्माण होईल. ध्येय राखण्यासाठी ते पेटून उठतील. त्यासाठी त्यांना हे पाच चित्रपट दाखवा आणि तुम्ही पण स्वतः हा पहा. कारण चित्रपटांच्या नायकांमध्ये ते स्वतःला पाहत असतात. चित्रपटाचा मानवी मनावर खूप खोलवर परिणाम होत असतो. मग मुलांना सैराट सारखे फालतू चित्रपट दाखवण्यापेक्षा आणि टिक टाॅक वरील तमाशा दाखवण्यापेक्षा हे 5 चित्रपट नक्की दाखवा. तर आता ते 5 चित्रपट कोणते ते ओळीने पाहू.

5. अंकगणित आनंदाचं : कितीही संकटे आली तरी आनंदाने जीवन जगावं. नकळत आपल्या हृदयाशी स्पर्श करून जाते हे आनंदाचं अंकगणित. Try try but dont cry हे या म्हणीचा खरा अर्थ काय आणि आलेल्या कठीन प्रसंगांना कसे सामोरे जावे हे शिकवणारा अतिशय भावनिक चित्रपट आहे. आयुष्यात अडचणी खूप आहे आणि असणेही गरजेच आहे

त्यामुळे माणसाला कळत जगणं अवघड आहे, मरण्यापेक्षा. माणसाने कधीही धीर सोडू नये हे हा चित्रपट शिकवतो. वडिलांचे कष्ट, त्यांची ढासळलेली आर्थिक परिस्थिती अशा वाईट परिस्थितीत ही आपल्या वडिलांना समजून घेणारा समजदार मुलगा हे पाहताना ज्याच्या डोळ्यात पाणी आले नाही त्याच्या शरीरात हृदय आहे की नाही? असा प्रश्न पडला तर नवल वाटायला नको. अशा अतिशय भावनिक प्रेरणादायी छान चित्रपटाला जर तुम्ही आतापर्यंत पाहिले नसेल तर लगेच वेळ मिळाल्यावर पहा.

नं. 4 – गावठी : ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेल्या, शेतकरी पुत्राची ही प्रेरक कथा आहे. साधी राहणी आणि इंग्रजी विषयावर प्रभुत्व नसणे या दोन गोष्टींमुळे उपेक्षित राहिलेल्या पण कर्तुत्ववान व्यक्तीची कहाणी सांगणारा हा चित्रपट आहे. हा चित्रपट पाहिल्यावर आपल्या ज्या काही कमकुवत बाजू आहे त्या पुर्ण करण्याचा आणि जसा देश तसा बेस या उक्तीप्रमाणे वागण्याची शिकवण नक्की मिळेल. नक्की मिळेल त्यामुळे हा सुद्धा चित्रपट आयुष्यात एकदा तरी पाहावा.

नं. 3 सोपान : आयुष्यात आई वडिलांचे महत्व सांगणारा हा चित्रपट आहे. हात पाय असूनही कर्तृत्वशून्य असणाऱ्या आजच्या तरुण पिढीच्या काळात चांगलीच चपराक मांडणारा हा चित्रपट आहे. दोन्ही हात पाय नसताना केवळ इच्छाशक्तीच्या बळावर अनेक संकटांवर मात करणाऱ्या सोपान या व्यक्तीचे प्रेरणादायी आणि संघर्षमय जीवन कथा सांगणारा हा चित्रपट एकदा तरी नक्की पाहावा असा हा चित्रपट आहे.

नं.2 पळशीची P.T. : कोणत्याही कामाला यश मिळाले की स्वतः श्रेय घेणाऱ्या स्वार्थी मानसिकता असलेल्या समाजात, कुठलेही श्रेय न घेता निस्वार्थीपणे विद्यार्थी सेवा करणाऱ्या एका दिव्यांग शिक्षकाची ही एक कथा आहे. अडाणी आईबापाच्या पोटी जन्म घेतलेल्या आणि गावकुसाबाहेर राहणाऱ्या एकाधावपटू मुलीची प्रेरक कथा आहे. कोणत्याही भौतिक सुविधा मानसिक आधार नसताना नॅशनल लेव्हलच्या धावण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या खेळाडू मुलीचे प्रेरणा देणारी कथा आहे. आणि चित्रपट तुमच्या मुलांना कार्य करण्याची प्रेरणा दिल्याशिवाय राहणारच नाही.

नं.1 तानी : अत्यंत गरिबीत जीवन जगत असलेल्या एका रिक्षावाल्याच्या मुलीची जिद्दीची हे गोष्ट आहे. मोलकरीण आई आणि रक्ताचं पाणी करून सायकल रिक्षा चालवणारे आई बापाची हे मुलगी स्वतःच्या जिद्दीने कलेक्टर होते. तानी शंकर पाटील स्वतः आईच्या हाताखाली घरोघरी भांडी घासून घरात लाईट नसताना, दिव्याच्या प्रकाशात अभ्यास करून कलेक्टर होणाऱ्या मुलींची जीवन कथा दाखवणारा तानी हा चित्रपट.

स्वतः पाहून तुमच्या मुलांना नक्की दाखवा ते रात्रंदिवस अभ्यास करण्यासाठी प्रेरित होतील. तर मित्रांनो हे होते मराठी मधील 5 टॉप मोटिवेशनल चित्रपट जे कोणत्याही वयातील माणसाला कार्य प्रेरणा देतील किती ही मोठी संकटे आली तरी परिस्थिती कशीही असली तरी पण निश्चित ध्येय गाठता येते. तुमचा आत्मविश्वास वाढवणारे आणि मनातून मजबूत करणारे हे पाच चित्रपट नक्की पहा.

आता तुमच्या मनात प्रश्न पडला असेल हे चित्रपट जर एवढे चांगले असतील तर यांची नावे आम्ही का ऐकलेली नाहीत? तर एखाद्या गावातील दारूच्या दुकानाचा पत्ता सर्वांनाच माहित असतो, पण ग्रंथालयाचं पत्ता फार कमी जणांना माहीत असतो. म्हणूनच मित्रांनो हे पाच चित्रपट नक्की पहा आणि या पाच व्यतिरिक्त तुमच्या मनातील प्रेरणादायी चित्रपट असेल तर तोही पहा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.