तुमच्या नावावर किती सिम सुरु आहेत हे जाणून घ्या ह्या पद्धतीने ।। जाणून घ्या महत्वाची माहिती !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

बरेचदा असं होतं की आपला आयडी कार्ड वापरून इतर कोणीही व्यक्ती मोबाईल क्रमांक घेऊ शकतो आणि त्या मोबाईलचा वापर गैर मार्गासाठी किंवा इतर कोणत्याही कारणासाठी तो करू शकतो. अश्यावेळी आपल्याला माहीतही नसणार आहे की आपल्या आयडी चा वापर करून कोणी इतर व्यक्ती मोबाईल क्रमांक वापरत आहे किंवा नाही.

आता ट्राय ने एक नवीन पोर्टल आणलेले आहे त्या पोर्टलच्या माध्यमातून आपण आपल्या आयडी द्वारे इतर कोणी मोबाईल क्रमांक घेतलेलं आहे का हे आपण चेक करू शकतो. तसेच आपल्या आयडीवर इतर व्यक्तीने कुणी मोबाईल क्रमांक घेतलेला त्या ठिकाणी दिसून आला तर आपल्याला तो मोबाईल क्रमांक त्या ठिकाणाहून बंद सुद्धा करता येणार आहे.

तसेच बऱ्याच वेळेला असे होते की आपण खूप दिवसांपूर्वी किंवा आधी आपण एकदम मोबाईल क्रमांक घेतलेला असतो आणि सध्या आपण तो वापरत नसतो, असा मोबाईल क्रमांक सुद्धा पोर्टलच्या माध्यमातून आपल्याला बंद करता येणार आहे.

त्या पोर्टल संबंधी सविस्तर माहिती आज आपण पाहणार आहोत : आपल्या आयडी वरती किती सिम कार्ड ऍक्टिव्ह आहे हे पाहण्यासाठी सर्वप्रथम तुम्हाला https://tafcop.dgtelecom.gov.in ही वेबसाईट ओपन करायची आहे. आता या वेबसाईटवर तुम्हाला एंटर मोबाईल नंबरचा एक बॉक्स दिसून येईल. येथे तुम्हाला तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे.

मोबाईल क्रमांक टाकताना ही काळजी घ्यायची आहे की जो मोबाईल क्रमांक तुम्ही या ठिकाणी टाकत आहात तो मोबाईल क्रमांक तुम्ही तुमचे आयडी कार्ड देऊन घेतलेला असायला हवा. म्हणजे तुमचा आयडी कार्ड मध्ये तुमचा आधार कार्ड असेल किंवा इतर आयडी कार्ड तुम्ही सबमिट करून हा मोबाईल क्रमांक प्राप्त केलेला असावा, असाच मोबाईल क्रमांक तुम्हाला याठिकाणी टाकायचा आहे.

त्यानंतर खालील रिक्वेस्ट ऑटोपी वर क्लिक करायचं आहे. त्यानंतर लगेचच तुम्ही टाकलेल्या मोबाईल क्रमांकावर एक टेक्स्ट मेसेज तुम्हाला ओटीपी क्रमांकाचा प्राप्त होईल. त्या मेसेजमध्ये असलेला ओटीपी क्रमांक तुम्हाला या ठिकाणी या बॉक्समध्ये टाकायचा आहे आणि खाली वॅलीडेट वर क्लिक करायचं आहे.

त्यानंतर तुमच्या आयडी वरती जितके मोबाईल नंबर ऍक्टिव्हेट आहे ते मोबाईल नंबर तुम्हाला या ठिकाणी दिसून येतील. त्यानंतर तुम्हाला या क्रमांका पैकी एखाद्या क्रमांकावरती शंका असेल किंवा तो क्रमांक तुम्ही घेतलेला नसेल तर असा क्रमांक आता तुम्ही बंद करण्यासाठी तुम्ही रिक्वेस्ट टाकू शकता. त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी दिसत असलेल्या चेक बॉक्स वरती टिक करायचं आहे.

आणि त्यानंतर खाली या ठिकाणी दिस इज नॉट माय नंबर या ऑपशन वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर एकदम खाली रिपोर्ट म्हणून पर्याय दिलेला आहे या पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. जर संबंधित नंबर हा तुमचाच असेल मात्र खूप दिवसांपूर्वी तुम्ही तो वापरणं सोडून दिलेला असेल अशा वेळेस नॉट रिकवायर्ड या बटन वर क्लिक करायचं आहे.

आणि या ठिकाणी रिपोर्ट या बटन वर ती तुम्हाला परत क्लिक करायचं आहे. पुढचा पर्याय या ठिकाणी रिकवायर्ड म्हणून दिलेला आहे. रिकवायर्ड म्हणजे तुम्हालाच हा क्रमांक चालू ठेवायचा असेल तो तुमचाच असेल अशावेळी या ठिकाणी क्लिक करून तुम्हाला रिपोर्ट वरती क्लिक करायचं आहे. मात्र तुम्ही असं केलं नाही तरीसुद्धा काही हरकत नाही.

मात्र जर कधी एखादा नंबर संशयास्पद तुम्हाला वाटत असेल अशा वेळेस तुम्ही दिस इस नॉट माय नंबर किंवा नॉट रिकवायर्ड वरती क्लिक करून रिपोर्ट बटन वरती तुम्ही क्लिक केल्या नंतर तुम्हाला एक ट्रॅकिंग आय डी स्क्रीन वरती दिसून येईल तो आय डी तुम्हाला नोट डाऊन करून ठेवायचा आहे. नंतर तुम्ही या ठिकाणी बॉक्समध्ये तो ट्रॅकिंग आयडी टाकून ट्रॅक बटन वर क्लिक करून तुम्ही रिपोर्ट केलेल्या नंबर ची सद्यस्थिती काय आहे ते तुम्ही नंतर चेक करू शकाल.

त्यानंतर या वेबसाईटवरती आणखी काही माहिती दिलेली आहे ती या ठिकाणी पाहूया. तुमचा आयडी वरती 9 मोबाईल क्रमांक किंवा त्यापेक्षा जास्त मोबाईल क्रमांक ऍक्टिव्हेट असतील तर या वेबसाईटद्वारे किंवा या पोर्टलद्वारे तुम्हाला एसएमएस द्वारे नोटिफिकेशन पाठविण्यात येईल. मित्रांनो या वेबसाइटच्या होमपेजवरती या ठिकाणी मेसेज दिलेला आहे की करेंटली दिस फॅसिलिटी इस अवेलेबल ओन्ली इन तेलंगाना ,आंध्र प्रदेश, कंजूमर.

म्हणजेच मित्रांनो ही वेबसाइट सध्या तेलंगणा आणि आंध्र प्रदेश मधील कंजूमर साठी फक्त कार्यान्वित आहे. मात्र या ठिकाणी माझा मोबाईल क्रमांक हा महाराष्ट्रातील असून सुद्धा मी या ठिकाणी टाकलेला आहे. तरीसुद्धा त्या संदर्भातली माहिती या ठिकाणी या वेबसाईटवर आपल्याला मिळालेली आहेत. म्हणजेच या वेबसाईटवर हळू हळू इतर राज्यांचा डेटा सुद्धा उपलब्ध करून देण्याचे काम हे सुरू आहे. तुम्ही सुद्धा तुमचा मोबाईल क्रमांक याठिकाणी टाकून पाहू शकता. (वरील माहिती www.youtube.com/techwithrahul या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे).

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.