पीएफ रक्कम काढण्यासाठी PF खात्यासंदर्भातील UAN ऍक्टिव्हेट कसा करायचा? ।। युएएन अकाउंट सक्रिय कसे करायचे? जाणून घ्या या लेखातून !

  • by

नमस्कार, पीएफ विड्रॉवल करण्यासाठी लागणाऱ्या पीएफ अकाउंट च्या ऍक्टिव्हेशन प्रोसेस बद्दल माहिती करून घेणार आहोत. तर पीएफ चे पैसे विड्रॉवल करण्यासाठी सगळ्यात आधी तुम्हाला गुगल वरती UAN पीएफ विड्रॉवल सर्च करायचा आहे.

त्यानंतर तुम्हाला बरेसचे लिंक दिसतील, या मध्ये पाहिली आहे युनिफाईड मेंबर पोर्टल. ही एक इपीएफो ची ऑफिशिअल लिंक आहे. ह्या लिंक वरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. याच्यावर क्लिक केल्या नंतर तुम्ही एम्प्लॉइ प्रोविडेंट ऑफ इंडिया च्या ऑफिशिअल पेज वरती याल. हे एक ऑफिशिअल पोर्टल आहे या मध्ये तुम्ही काय करायचे आहे तर UAN आणि पासवर्ड टाकून त्याच्यामुळे तुमच्या अकाउंट मध्ये लॉग इन करू शकता.

पण त्याच्या आधी लॉग इन करण्यासाठी तुम्हाला UAN आणि पासवर्ड माहिती असण्याची खूप गरज आहे. जर तुम्ही जर UAN ॲक्टिव केला नसाल तर खाली दिलेल्या अक्टिवेट UAN या लिंक वर क्लिक करून तुम्ही तुमचे UAN ॲक्टीवेट करू शकतात. तिथे पहिला प्रश्न असा आहे की UAN भेटेल कुठे, UAN हे आहे तुमच्या सॅलरी स्लिप वरती अवेलेबल असतो.

आणि जर नसेल तर तुमच्या एम्प्लॉइर च्या HR कडून तुम्हाला तुमचा UAN नंबर भेटेल. आता तर अक्टीवेट पिन या लिंक वर क्लिक करूया. अक्टिवेट पिन या लिंक वर क्लिक केल्यानंतर अशी एक विंडो ओपन होईल, या विंडो मध्ये तुम्हाला तुमचे रेकॉर्ड एंटर करायचा आहेत.

जसे की UAN नंबर, आधार कार्ड आणि पॅन नंबर तुम्ही एंटर करू शकत नाही. इथे डेट ऑफ बर्थ, मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी एंटर करायचा आहे. आणि खाली कॅपचा एंटर करून ऑथेंटिकेशन वरती क्लिक करायचं आहे. ह्या ठिकाणी मोबाईल नंबर आणि ईमेल आयडी एंटर करताना थोडी काळजीपूर्वक करा

कारण याच मोबाईल नंबर वरती तुम्हाला ओटीपी येईल ज्याने तुम्ही तुमच्या अकाउंट वरती लॉग इन करू शकता. नंबर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या मोबाईल वर एक मेसेज येईल, त्यात एक ओटीपी असेल, त्या नंतर तुमच्या स्क्रीन वरती एक विंडो ओपन होईल त्या मध्ये तुम्ही एंटर केलेली आता पर्यंत ची तुमची पूर्ण माहिती असेल.

नाव, जन्मतारीख, मोबइल नंबर आणि ईमेल आयडी ह्या सर्व गोष्टी चेक केल्यानंतर आय ऍग्री ह्या बटन वरती क्लिक करा आणि तुमच्या मोबाईल वर आलेला ओटीपी इथे एंटर करून घ्या. ओटीपी एंटर केल्या नंतर व्हेरिफाय ओटीपी आणि ॲक्टीवेट UAN ह्यावरती क्लिक करा ह्या नंतर तुम्ही अकाउंट ॲक्टीवेट होऊन जाईल.

अक्टीवेट UAN वरती क्लिक केल्या नंतर तुमच्या फोन वरती एक मेसेज येईल ह्या मेसेज मध्ये तुमच्या UAN नंबर आणि पासवर्ड असेल ह्या पासवर्ड नुसार तुम्ही तुमच्या UAN अकाउंट ला लॉग इन करू शकता. हे तुमचे UAN अकाउंट आहे आणि हे अकाउंट आता ॲक्टीवेट झालं आहे. ह्या मध्ये आपण KYC अपडेट करू शकतो आणि तुमच्या पीएफ च्या अमाऊंट घेऊ शकतो.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

Tags:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *