वडिलांच्या संपत्तीवर ‘मुलींचा’ किती हक्क असतो? वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा वारसा हक्क संपूर्ण माहिती l

अर्थकारण शेती शैक्षणिक

संपत्ती ही दोन प्रकारची असते एक म्हणजे स्वतः कमावलेली आणि दुसरी वडिलो पार्जित. वडिलो पार्जित संपत्ती म्हणजे जी संपत्ती आपल्याला आपले वडील, आजोबा, किंवा पंजोबांकडून लाभलेली असते त्याला वडिलो पार्जित संपत्ती असे म्हणतात. जन्मानंतर मुलांचा आणि मुलींचा त्यावर हक्क तयार होतो. वडिलोपार्जित संपत्ती वर पत्नी आणि मुलांचा बरोबरीचा वाटा असतो. म्हणजे जर एक कुटुंबात तीन मूलं असतील तर त्या तिन्ही मुलांना समान तीन हिस्से मिळतील.

आणि तिसऱ्या पिढीच्या मुलांना त्यांच्या वडिलांच्या हिस्स्यातून समान वाटणी मिळेल. तसेच जर वडिलोपार्जित संपत्ती असेल आणि वडील आणि आई दोघांचा ही मृत्यू झाला असेल आणि त्यांना एक मुलगा आणि मुलगी तर  त्या दोघांनाही समान वाटणी मिळेल. जर समजा वडिलांचा मृत्यू झाला आणि आई हयात असेल व त्यांना दोन मुले व दोन मुली, किंवा तीन मुले किंवा एक मुलगी असेल तर पत्नीला अर्धा हिस्सा मिळतो.

मुलांना अर्धा हिस्सा मिळतो ज्या मध्ये त्यांची समान वाटणी होते. तसेच जर वडिलोपार्जित संपत्ती असलेल्या व्यक्तीच्या पत्नीचा मृत्यू झाला आणि त्यांनी दुसरा विवाह केला तर दुसऱ्या पत्नीला त्या संपत्ती मधील काहीही अधिकार मिळत नाही. पण जर त्या दुसऱ्या पत्नी पासून त्यांना अपत्य असतील तर मात्र त्यांना समसमान वाटणी होते. २००५ पूर्वी  दिलेल्या वारसा हक्क कायदा १९५६ नुसार, वडिलांच्या संपत्तीत मुलीला वगळून वाटणी व्हायची.

परंतु २००५ मध्ये या कायद्यात सुधारणा करण्यात आली व मुलांप्रमाणे च मुलींनाही संपत्तीत समान हक्क प्राप्त झाला. हिंदू कुटुंबामध्ये मुलगा हाच कर्ता मानला जात असल्यामुळे त्यावेळी तसा कायदा होता, आणि म्हणून २० डिसेंबर २००४ पूर्वी जर वाटणी झाली असेल त्यात मुलीला वाटणी मिळणार नाही तसेच ती वाटणी आता रद्द ही करता येणार नाही कारण त्यावेळी कायद्यात तसेच नियम लागू होते. त्याचप्रकारे वडील, भाऊ, नातेवाईक हे मुलीला कायदेशीर रित्या तिचा वारसाहक्क नाकारू शकत नाहीत.

मुलगी लग्नानंतर ही वडिलांच्या संपत्तीत दावा करू शकते व हिस्सा मागू शकते. मुलीने जर आंतरजातीय विवाह केला आहे आणि तिने आंतरजातीय विवाह केला म्हणून तिचा वारसा हक्क नाकारत असतील तर ते बेकायदेशीर आहे. वडिलांनी जर संपत्ती स्वतः कमावाली असेल तर आपल्या मुलींना हिस्सेदारी द्यायची की नाही हे वडिलांच्या मर्जीवर अवलंबून आहे. जर त्यांना हिस्सा द्यायचा नसेल तर मुलगी काही करू शकत नाही, तिच्याकडे कायद्याने संपत्तीत हिस्सा घेण्याचा अधिकार नाही.

तसेच वडिलांची संपत्ती जर स्वतः कमावलेली असेल आणि त्यांच्या मृत्यूपच्छात ती कोणा विशिष्ट व्यक्तीला देण्यातबाबत सूचना केलेली नसेल किंवा मृत्यूपत्र किंवा इच्छापत्र केलेले नसेल तर त्यांच्या मुलांना त्यात समान हक्क मिळतो. अशा वेळेस मुलगी अविवाहित आहे की विवाहित असा भेदभाव करता येत नाही. हा कायदा हिंदू, बौद्ध, जैन आणि शीख समाजाला लागू होतो. वरील माहिती ही सुधारीत हिंदू वारसा हक्क कायदा २००५ झालेल्या नुसार प्रमाणे दिली आहे.

4 thoughts on “वडिलांच्या संपत्तीवर ‘मुलींचा’ किती हक्क असतो? वडिलोपार्जित संपत्तीवर मुलींचा वारसा हक्क संपूर्ण माहिती l

 1. कृपया खालील कुटुंबामधे वडिलोपार्जित जमिनीची वाटणी कशी होऊ शकते याची माहिती द्यावी
  For ex. एका जमीन खातेदाराने पहिली पत्नी जिवंत असताना दुसरी केली व पाहिल्या पत्नीपासून एक मुलगा व दुसर्‍या पत्नीपासून 2 मुले आणि 1 मुलगी असेल मुलीचे लग्न 1985 अगोदर आहे
  साध्य मूळ मालक दोन्ही पत्नी हयात नाही अशा प्रकरणात नेमकी वाटणी कशाप्रकारे होऊ शकते
  किवा पाहिल्या पत्नीच्या मुलाला 50% हिस्सा मिळू शकतो का.

 2. आजोबांनी त्यांच्या हयातीत कायदेशीर बक्षीसपत्र करुन नातवंडांच्या नावावर प्राॕपर्टी केली असेल तर त्या संंपत्तीवर वडीलांचा हक्क राहतो का??

 3. आईच वय 65आहे तर ती वारसा हक्क मागू शकते का
  कारण माझे मामा मामी खूप अडचणी देत
  आहेत

Comments are closed.