हिंदू वारसा हक्क कायदा हा हिंदू, बुद्ध, शीख,जैन या सर्वांसाठी लागू होतो. हा कायदा घरातील प्रमुख व्यक्ती मरण पावल्यास त्यांच्या संपत्तीचे वारस कोण हे ठरवतो. प्रमुख व्यक्ती म्हणजे कोण तर घरातील अशी व्यक्ती जिच्या नावावर सर्व स्थावर मालमत्ता असते.
कुटुंबातील मयत झालेल्या प्रमुख व्यक्तीच्या नावे असणारी संपत्ती ही जर वडिलोपार्जित असेल तर अशा संपत्तीस वारसांची नोंद हिंदू वारसा हक्क कायदा १९५६ नुसार होते. कुटुंबातील मयत झालेल्या प्रमुख व्यक्तीच्या नावे असलेली संपत्ती ही स्वतः कमावलेली असेल
आणि जर मयत व्यक्तीने मृत्यूपूर्वी मृत्यूपत्र करून ठेवले असेल तर मग त्या मृत्यूपत्रानुसार ज्याच्या अधिकारात मृत्यूपत्र बनवले असते त्या व्यक्तीस ती संपत्ती मिळते. पण जर मृत्यूपत्र केले नसेल तर वारसा नोंद हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार होते. हिंदू वारसा कायदा १९५६ कायद्यानुसार सर्वात प्रथम वर्ग १च्या वारसांना प्राधान्य दिल जात.
आणि जर वर्ग १ चे वारसदार नसतील तर वर्ग २च्या वारसदारांना प्राध्यान दिल जात, जर वर्ग २ चे वारसदार नसतील तर वर्ग ३ च्या वारसदारांना प्राधान्य दिलं जात आणि वर्ग ३चे ही वारसदार नसतील वर्ग ४ च्या वारसदारांना प्राधान्य दिलं जात.अविभक्त कुटुंबातील पुरुष विना मृत्यूपत्र मयत झाल्यास त्याचा वारसा हक्क सर्वप्रथम खालील 12 जणांना वर्ग १ चे वारस म्हणून मिळतो.
१.मुलगा २.मुलगी ३.विधवा (एकाहून अधिक विधवा असतील तर सर्वांना एकत्रित हिस्सा मिळेल) ४.मयताची आई. ५.पूर्ववत मुलाचा मुलगा ६.पूर्ववत मुलाची मुलगी ७.पूर्ववत मुलीचा मुलगा ८.पूर्ववत मुलीची मुलगी ९.पूर्ववत मुलाची विधवा १०.पूर्ववत मुलाच्या पूर्ववत मुलाचा मुलगा.
११.पूर्ववत मुलाच्या पूर्ववत मुलाची मुलगी १२.पूर्ववत मुलाच्या पूर्ववत मुलाची विधवाहिंदू. उत्तराधिकार (सुधारित)अधिनियम २००५,कलम ७ नुसार वर्ग च्या वारासामध्ये खालील चार नाव जोडण्यात आली आहेत. १३.पूर्ववत मुलीच्या पूर्ववत मुलीचा मुलगा.
१४.पूर्ववत मुलीच्या पूर्ववत मुलीची मुलगी १५.पूर्ववत मुलाच्या पूर्ववत मुलीची मुलगी १६.पूर्ववत मुलाच्या पूर्ववत मुलीची मुलगा. जर अविभक्त कुटुंबातील मयत झालेल्या व्यक्तीचे मृत्यूपत्र नसेल आणि वर्ग १ मधील कोणीही नसेल तर वारसाहक्क वर्ग २ मधील व्यक्तींना मिळतो.
वर्ग २ मध्ये ९ वारस येतात. (एक) १.मयताचे वडिल,(दोन) २.मुलाच्या मुलीचा मुलगा ३.मुलाच्या मुलीची मुलगी ४.बहीण,५.भाऊ (तीन)१.मुलीच्या मुलाचा मुलगा २.मुलीच्या मुलाची मुलगी ३.मुलीच्या मुलाचा मुलगा ४.मुलीच्या मुलीची मुलगी (चार)१.भावाची मुलगी
२.भावाचा मुलगा ३.बहिणीची मुलगी ४.बहिणीचा मुलगा. (पाच)१.वडिलांचे वडील २.वडिलांची आई (सहा)१.वडिलांची विधवा २.भावाची विधवा (सात) १.वडिलांचा भाऊ २.वडिलांची बहीण. (आठ) १.आईचे वडील २.आईची आई. (नऊ) १.आईचा भाऊ
२.आईची बहीणअविभक्त कुटुंबातील पुरुष विना मृत्यूपत्र मयत झाला आणि त्याला वरील वर्ग १ आणि वर्ग २ चे कोणीही वारस नसतील तर खालील वर्ग ३ च्या मृतांच्या गोत्रजांकडे त्याचा वारस जाईल. वर्ग ३ -मृताचे गोत्रज:- मृताचे पितृबंधु म्हणजेच रक्ताच्या संबंधामुळे किंवा दत्तक ग्रहनामुळे पूर्णपणे पुरुषांद्वारे संबंध असलेल्या व्यक्ती.
अविभक्त कुटुंबातील पुरुष विना मृत्यूपत्र मयत झाला आणि त्याला वरील वर्ग १, वर्ग २ आणि वर्ग ३ चे कोणीही वारस नसतील तर शेवटी खालील वर्ग ४ च्या भिन्न गोत्रज असलेल्या मृतांच्या गोत्रजांकडे त्याचा संपत्ती वारसा जातो. वर्ग ४ च्या मृताचे भिन्न
गोत्रज:- मयताचे मातृबंधु म्हणजेच रक्ताच्या संबंधामुळे किंवा दत्तक ग्रहनामुळे पूर्णपणे पुरुषांद्वारे संबंध नसलेल्या व्यक्ती. परंतु जर वर्ग १,वर्ग २ ,वर्ग ३ आणि वर्ग ४ यापैकी कुठलेही वारसदार नसतील तर मात्र संपत्ती हिंदू वारसा कायदा १९५६ ,कलम २९अन्वये सरकार जमा करण्याची तरतूद आहे.
सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा
व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
पतीने स्वेच्छेने पत्नीला त्रास देऊन सोडून दिले असेल आणि जर पती पत्नी एकत्र राहत नसतील आणि पत्नीने स्वकष्टाने मालमत्ता केली असेल,आणि पती अचानक परत आला तर पत्नीच्या मालमत्तेवर त्याचा हक्क असतो काय