ऑफिस आणि करिअरसाठी उपयुक्त वास्तू टिप्स

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आपण भारतीय अनेक बाबतीत कितीही मॉडर्न असलो तरी परंपरा पाळण्याला आपण कायमच प्राधान्य देत असतो. भारतीय संस्कृती विविध परंपरा आणि रितीरिवाजांनी नटलेली असते. पण अनेकदा आपण इतर देशाच्या काही रितींना सणांनाही साजरा करत असतो. आशिया खंडातील आपला शेजारी चीनकडून आपल्याला मिळालेली वास्तुशास्त्राची देणगी म्हणजे फेंगशुई.

तर भारतालाही वास्तू शास्त्राचा प्राचीन इतिहास आहे. अनेकदा नवीन वास्तू बांधताना ती वास्तूशास्त्राला अनुकूल आहे का पाहिलं जातं. नसेल तर त्यात आवश्यक ते बदलही केले जातात. आताही आम्ही तुम्हाला ऑफिसच्या वास्तूशास्त्रात सकारात्मक उर्जेसाठी काही बदल कसे करावेत हे सांगतो आहे.

Office - Wikipedia

नोकरी असो की व्यवसायात प्रगती करण्याची प्रत्येकाचीच इच्छा असते. पण अनेकदा अगदी जवळ येऊनही यश हुलकावणी देत जातं. अशावेळी काही छोटे आणि सकारात्मक बदल तुम्हाला यशाच्या वाटेवर नेऊ शकतात.

लेखक, रिसर्च स्टुडंट यांनी आपल्या बसण्याचं ठिकाण भिंतीकडे पाठ करुन असणारं असावं. शक्यतो हे ठिकाण मुख्य दरवाजापासून लांब असणारं असावं. यामुळे त्यांच्या कामात एकाग्रतामध्ये वाढ होऊन अपेक्षित परिणाम मिळण्याची शक्यता वाढते.

सध्या वर्क फ्रॉम होमचा ट्रेंड सुरु आहे. त्यामुळे प्रत्येकाचं वर्क स्टेशन हे बेडरुम किंवा हॉल असण्याची शक्यता आहे. अशा वेळी शक्यतो बेडरुमला वर्कस्टेशन बनवणं टाळावं. जरी याला पर्याय नसेल तर सकारात्मक वातवरण निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.

ऑफिसमधलं कॉन्फरन्स टेबल अनेक बाबींवर परिणाम करत असतं. त्यामुळे शक्यतो कॉन्फरन्स टेबल निवडा ज्याला कॉर्नर्स नसतील. अशावेळी अंडाकृती किंवा गोल टेबल निवडा.

How to prepare for your return to the office: mastering touch typing -  doggroomerjobdescription.com

तुम्ही बसण्यासाठी कोणती खुर्ची निवडता यावर ब-याच बाबी अवलंबून असतात. योग्य खुर्ची निवडणं शारिरीकदृष्ट्या आणि वास्तूशास्त्राच्या दृष्टीने अतिशय गरजेचं आहे.
तुमचं डेस्क कसं आहे. यावरुनही ब-याच बाबी ठरवल्या जातात. क्लीन डेस्क कामाचा उत्साह वाढवते.

पण कामात यश मिळण्यासाठी तुम्ही टेबलवर एक क्रिस्टल बॉल किंवा पिरॅमिडही ठेवू शकता. याशिवाय ऑफिसमध्ये बसताना शक्यतो चेहरा उत्तरेकडे राहील याची काळजी घ्या. तसेच ऑफिस डेस्क गोल असणार नाही याचाही आवर्जून विचार करा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.