‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या प्रसिद्ध ओळी मागे नक्की कोणती घटना घडली की याचे वर्णन या ओळींमधून केले जाते ? ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

लोकप्रिय शैक्षणिक

आपण आज जाणून घेणार आहोत ‘वेडात मराठे वीर दौडले सात’ या प्रसिद्ध ओळी मागे नक्की कोणती घटना घडली की याचे वर्णन या ओळींमधून केले जाते. त्या वेळी नक्की काय झालं की सात मराठे 17000 मुघलांवर तुटून पडले आणि त्यावेळी बाकीची फौज तेव्हा कुठे होती? बाकीचे मावळे काय करत होते? असे धाडस सरनोबत प्रतापराव गुजर यांनी का केले असावे हे आपण आज समजावून घेवूया.

ही गोष्ट आहे पुरंदरच्या तहानंतरची गोष्ट आहे सरनोबत प्रतापराव गुजर यांची. मिर्झा राजे जयसिंग यांनी पुरंदरला वेढा दिलेला असताना मावळा तुकडोजी यांनी केलेल्या धाडसी पराक्रमामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी तुकडोजी याला सरनोबत ही पदवी देऊन प्रतापराव गुजर हे नावही दिले. त्याने पराक्रम ही तसाच केला होता.

प्रतापराव गुजर फक्त सहा मावळे घेऊन 17000 मुघलांवर तुटून कसे पडले याबद्दल माहिती आपण पाहुयात. मिर्झाराजे जयसिंग यांच्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी तह केला. त्यामुळे स्वराज्यातील अनेक किल्ले मुघलांना देण्यात आले. शिवरायांनी दोन पावले मागे घेतली होती, पण यामागे त्यांची खूप मोठी दूरदृष्टी होती.मिर्झाराजे जयसिंग यांचे सैन्य खूप मोठे होते त्यामुळे त्यांच्याशी युद्ध करून विजय मिळवला असता तरी स्वराज्याचे मोठे नुकसान झाले असते हे त्यांनी ओळखले होते.

शिवाय दक्षिणेचा नाग दबा धरून बसला होता त्यामुळे शिवरायांनी अनेक किल्ले मोगलांना दिले पण बोलतात ना वाघ दोन पावलं मागे येतो ते घाबरून नव्हे तर शिकारावर झडप घालण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांनी केले. तह करून शिवाजी महाराजांनी मिर्झाराजे जयसिंग यांना माघारी पाठवले. येत्या काही महिन्यातच त्यांनी आपले किल्ले परत स्वराज्यात आणण्यास सुरुवात केली. आणि यात अनेक मराठी सरदारांनी महत्त्वाची कामगिरी बजावली.

त्यातीलच एक होते सरनोबत प्रतापराव गुजर. या काळात दख्खनचे अनेक प्रदेश शिवरायांनी जिंकले. त्यांनी विजापूरच्या आदिलशहाच्या पन्हाळा किल्ला जिंकला. त्यामुळे विजापूर ते पूर्ण सत्ता केंद्र ह्या दख्याने हल्ले होते. शिवराय असेच प्रदेश जिंकत रहीले तर संपूर्ण आदिलशाही संपवतील याची भीती विजापूरच्या राजदरबारात वाढू लागली आणि ती भीती सहाजिकच होती. छत्रपतींनी पूर्ण आदिलशाही साम्राज्याचा कणाच मोडून ठेवला होता. त्यांच्या अनेक पेठा ही लुटल्या होत्या.

एवढेच काय तर आदिलशहाचा सर्वात मोठा आणि पराक्रमी समजला जाणारा सरदार अफझलखान याला तर शिवरायांनी स्वतःच्या हातानेच फाडला होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ऐकूनच आदिलशाहीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने धडकी भरायची. पण छत्रपती शिवाजी महाराज यांना अडवणे गरजेचे झाले होते, छत्रपती शिवाजी महाराजांना अडविण्यासाठी तेथील राजदरबारात बैठक झाली आणि पन्हाळा किल्ल्यावर आक्रमण करायचे असे ठरले.

छत्रपती शिवाजी महाराज त्यावेळी पन्हाळा किल्ल्यावर होते. आदिलशाहीने या मोहिमेचे नेतृत्व करायला एक पठाण सरदार पुढे आला, त्याच नाव होतं अब्दुल करीम बहलोलखान. उंच, धिप्पाड, पराक्रमी, आणि अत्यंत कपटी, की त्याला दुसरा अफजलखान बोलणे चुकीचे ठरणार नाही. पण हा बहलोलखान अफजलखाना पेक्षा जास्त कपटी आणि पाताळयंत्री होता. तो हजारांचे सैन्य, पठाणी सैनिक, आणि मोठे हत्ती घेऊन स्वराज्यावर चालून येण्यास सज्ज झाला.

पण छत्रपती शिवाजी महाराजांचे गुप्तहेर खाते अतिशय कार्यक्षम आणि हुशार होते. त्यामुळे बहलोलखान स्वराज्यावर चालून येणार या आधीच तो येणार ही बातमी शिवरायांपर्यंत पोचली होती. स्वराज्यावर चालून येणार्‍या बहलोलखानाला स्वराज्याचा सीमेवरच अडवून त्याला तिथेच संपवायाचे असे शिवरायांनी ठरवले. त्यांनी ही कामगिरी सरनौबत प्रतापराव गुजर यांच्यावर सोपावली. 15 हजाराची फौज घेवून सरनौबत प्रतापराव गुजर बहलोलखानास अडवायला गेले.

बहलोलखान पूर्ण ताकतीनिशी होता. पण प्रतापराव यांनी नामी युक्ती लावली. खानाच्या फौजेचा थोड्या दूर त्यांनी आपली मराठा फौज थांबवली. खानाची फौज खूप मोठी होती आणि त्यात घोडे आणि हत्ती होते. संपूर्ण फौजेला पाण्याची आवश्यकता असते तेथील बाजूच्या उमरणी येथे एक मोठे तलाव होते. त्यामुळे संपूर्ण फौज या तलावाचे पाणी पिणार हे प्रतापरावांना माहीत होते. प्रतापराव या तलावाच्या भागातच आपलं काही सैन्य घेऊन दडून राहिले.

अगदी वाघ दबा धरून बसतो तसेच सरनौबत प्रतापराव गुजर त्याचे अर्धसैन्य घेवून दबा धरून बसले होते. काही कालावधीने बहलोलखानचे काही सैन्य हत्तींना आणि घोड्यांना पाणी पाजण्यासाठी घेऊन आले. खानाचे सैन्य जसे जवळ आले तसे दबा धरून बसलेले प्रतापराव आणि त्यांचे 1 ते 2 हजार मावळे त्यांच्यावर तुटून पडले. मराठ्यांनी बहलोलखानाच्या सैन्यावर हल्ला चढवला. मराठ्यांनी आपल्यावर आक्रमण केले हे समजण्यातच बहलोलखानाला वेळ लागला.

आणि जोपर्यंत त्याचे बाकीचे सैन्य घेवून आला तोपर्यंत मराठ्यांनी पठणांच्या कत्तली करायला सुरुवात केली होती. बहलोलखानाचे बाकीचे सैन्य हे मराठ्यांना चोख प्रत्युत्तर देऊ लागले होते. मराठे आणि पठाण यांच्यात हे युद्ध जवळपास तीन ते चार तास चालू होते. पण प्रतापराव आणि त्यांचे अर्धे अधिक सैन्य मागे ठेवले होते. त्यांना प्रतापरावांना आदेश दिला की बहलोखानाच्या फौजेला चारी बाजूने घेरा त्याप्रमाणे मराठा सैन्याने बहलोलखानाच्या चारी बाजूंनी घेरून टाकले.

यात बहलोलखानाचे अनेक सैनिक मारले गेले. पण त्याचे सैन्य तहानलेले होतं. त्यामुळे ते अजून युद्ध लढणे शक्य नव्हतं. अशातच त्यांच्या फौजेतील एक तहानलेला हत्ती बिथरला आणि साखळदंड तोडून बहलोलखानाच्या सैनिकांना मारू लागला. अनेक पाठणांना त्याने सोंडेत उचलून फेकून दिले, तर काहींना पायाखाली चिरडले, त्यामुळे आपला पराभव निश्चित आहे हे बहलोलखानाला कळाले.

त्याची पाळायची तयारी करायला सुरुवात केली पण उरलेले आपले सैनिक घेवून पळणार इतक्यातच त्याला कळाले की मराठ्यांनी आपल्याला चारही बाजूने घेरले आहे. हे कळलेवर त्याला धडकी भरली. पळून जाणे शक्य नव्हते. आणि मराठ्यांचा सामना करणे शक्य नव्हते. म्हणून बहलोलखान याने ठरवलं की सरनौबत प्रतापराव गुजर यांना शरण जायचे. मराठ्यांचे पाय धरले की ते मोठ्या मनाने आपल्याला माफ करतील याची खात्री बहलोलखानाला होती.

त्याने आपले उरलेले सैन्य मागे घेतलं आणि प्रतापरावांचे पाय धरले, त्यांची तो माफी मागू लागला. सरनौबत प्रतापराव गुजर यांना जसा राग लगेच यायचा तसेच दया देखील लगेच यायची. आपल्याला शरण आलेल्या माफ करणे हा आपला हिंदू धर्म आहे असे म्हणून प्रतापरावांनी बहलोलखानाला सोडून दिले.

त्यामुळे उरलेले सैन्य घेऊन बहलोलखान विजापूरला पळून गेला, पळून जाताना मागे वळूनही पाहिले नाही. सरनौबत प्रतापराव गुजर यांनी बहलोलखान याचा पराभव केला हे समजताच शिवराय आनंदित झाले. पण जेव्हा त्यांना कळाले की प्रतापरावांनी बहलोलखानाला जिवंत जाऊ दिले तेव्हा मात्र शिवरायांना राग आला. कारण मुघल हे कटकारस्थानी आणि पातळी आहेत हे ते जाणून होते. त्यामुळे शिवरायांनी रागात येवून एक पत्र लिहिले. त्या पत्रात त्यांनी प्रतापरावांना खडसावत विचारले की बहलोलखानास जिवंत का सोडले? शिवराय आपल्यावर रागावले आहेत हे कळताच प्रतापरावांना खूप वाईट वाटले होते.

शिवरायांचे रागावणे ही योग्य होते. कारण हे मुघल क्षमा करण्या लायक नव्हते हे सापासारखे होते. याआधी भारताच्या इतिहासात अशी घटना घडली होती. महाराजा पृथ्वीराज चव्हाण आणि मोहम्मद घोरी यांचा ती घटना घडली होती. मुहम्मद घोरी यांनी भारतावर भयंकर आक्रमण केले होते. त्याने आजूबाजूची सगळी राज्य जिंकली होती. पण भारतात त्याचा सामना पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी झाला. त्यांच्यात सतरा वेळा युद्ध झालं, आणि सतराही वेळा पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद घोरीचा पराभव केला.

पण घोरी सतरा ही वेळा पृथ्वीराज चव्हाण यांना शरण आला आणि माफी मागितली. त्यामुळे हिंदू धर्माप्रमाणे शरण आलेल्यास जीवन दान द्यावे म्हणून पृथ्वीराज चव्हाण यांनी मोहम्मद घोरिला जीवनदान दिले. पण त्यांच्यात अठरावे युद्ध झाले तेव्हा मात्र पृथ्वीराज चव्हाण यांना जिवंत पकडण्यात मोहम्मद घोरी याला यश आलं. आणि त्याने त्यांना बंदी बनवून त्यांचे डोळेही काढले. पण शेवटी पृथ्वीराज चव्हाण यांनी अशा अवस्थेत मोहम्मद घोरीचा वध केला.

पृथ्वीराज चव्हाण यांची ही गोष्ट फार मोठी आहे. मुघल किती कपटी आहे ते या गोष्टीमुळे शिवरायांना माहीत होत. म्हणून त्यांना प्रतापरावांचे वागणे आवडले नाही. यानंतर काही काळात प्रतापरावांनी आदिलशहाचा अनेक प्रदेश जिंकला अनेक पेठा लुटल्या. दख्खनमध्ये पुन्हा कार माजवला. पण आपले छत्रपती आपल्यावर रागावले आहेत याची खंत मात्र त्यांच्या मनात होतीच. काही काळाने शिवराय यांना वाटलेली भिती खरी ठरू लागली. काही काळाने कपटी असलेला बहलोलखान शेवटी सापासारखा परतला.

तो पुन्हा स्वराज्यावर आक्रमण करायला चालून आला. त्याने यावेळी आधीपेक्षाही जास्त सैन्य जमवन्यास सुरुवात केली होती. यावेळी मात्र पूर्ण ताकतीनिशी आक्रमण करायचे असे बहलोलखानाने ठरवले ही बातमी शिवरायांना पोहोचली. त्यामुळे त्याला पूर्ण समाप्त करावे अशी जबाबदारी त्यांनी प्रतापरावांना दिली. आणि प्रतापरावांना पाठवलेल्या पत्रात असे लिहिले की, “तो बहलोल्या पून्हा स्वराज्यावर चालून येत आहे तुम्ही त्याला नष्ट केल्याशिवाय तुमचे तोंड आम्हास दाखवु नये.” हे पत्र वाचून प्रतापरावांचे मन व्याकूळ झाले.

पण बहलोलखानाला सोडून आपण किती मोठी चूक केली आहे याची जाणीव त्यांना झाली. बहालोलखान असा वागलाय याचा त्यांना प्रचंड राग आला. आपल्या 15 हजारांच्या फौजेनिशी ते युद्धाच्या तयारीला लागले. आपल्या फौजेनिशी ते दक्षिणेला जाऊ लागले. अशातच एका डोंगराळ भागात प्रतापरावांनी सैन्याची छावणी लावली आणि बाजूच्या परीसराची पाहणी करायला ते आपले सहा मावळे घेऊन गेले होते. त्यांची 15 हजारांची फौज छावणीतच होती.

टेहाळणी करत असताना एक गुप्तहेर त्यांना भेटला. त्याने सांगितले की बहलोलखान काही अंतरावरच आपल्या फौजीनिशी नेसरीच्या खिंडीमध्ये आहे. ही बातमी कळताच प्रतापरावांच्या तळपायाची आग मस्तकात गेली. या कपटी बहलोलखाना मुळे माझे राजे माझ्यावर रागावले याचे त्याला वाईट वाटले आणि बहलोलखानावर अजूनच चीड आली. त्यामुळे कसलाही विचार न करता आपल्या छावणीतील सैनिक घेतल्याशिवाय ते एकटेच बहलोलखानाच्या दिशेने धावत सुटले.

आपले सरनौबत शत्रूवर एकटेच धावून जात आहेत हे पाहून बाकीचे सहा मावळेही त्यांच्यापाठून जाऊ लागले. हे सात मराठे घोडेस्वार खानाच्या दिशेने नेसरिखिंडीत जावू लागले. आणि त्या नेसरिच्या खिंडीत होते ते बहलोलखानाच्या अवाढव्य सैन्य. पण त्याची पर्वा या सात मराठे घोडेस्वारांनी केली नाही. कसलाही विचार न करता सरनौबत प्रतापराव व त्यांचे सहा मावळे म्हणजेच असे हे सात वीर बहलोलखानाच्या हजारांच्या फौजेवर तुटून पडले. त्या फौजेला कळाले नाही की काय झाले आहे, ते सात मराठे बंदुकीच्या गोळी सारखे पठाणी सैन्यावर चालून गेले आणि तोफ गोळ्यासारखे तुटून पडले.

सात मराठ्यांनी हजारोंनी असलेल्या शत्रूच्या कत्तली करायला सुरुवात केली. अनेक शत्रू या मराठ्यांनी किडा मुंग्यांसारखे मारले. हे दृश्य पाहून बहलोलखान देखील घाबरला. ते सात मराठे एवढे भारी आहेत तर मग बाकीची फौज आली तर ह्या वेळी आपल्याला जिवंत सोडणार नाहीत याची भीती त्यांना वाटू लागले. पण शेवटी ते सात मराठे होते आणि समोर अवाढव्य फौज होती. त्यामुळे अंत काय होणार हे निश्चित होते. एक एक करून सातही मावळे धारातीर्थी पडले.

मराठा साम्राज्यातील सात हिरे निकळून गेले. पण या सात मराठ्यांनी अनेकांना कंठस्नान घातले. फक्त सात लोक त्या फौजेवर तुटून पडले अशी घटना या आधी कधीच झाली नव्हती. आणि यानंतरही कधी झाली नाही. म्हणून म्हणतात ना,, “वेडात मराठे वीर दौडले सात” ही बातमी जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना कळली तेव्हा त्यांना अतिशय दुःख झाले. स्वराज्यातील अजून एक खिंड पावन झाली होती. या नेसरिच्या खिंडीत सात मावळे मरण पावले पण त्यांचा पराक्रम मात्र अजरामर झाला होता. शिवरायांना या गोष्टीचे प्रचंड दुःख झालं. म्हणून सरनौबत प्रतापरावांचा पराक्रम व्यर्थ जाऊ नये म्हणून शिवरायांनी पूर्ण फौज पाठवून बहलोलखानावर हल्ला केला. आणि त्याला तिथेच संपवल. पण स्वराज्याचे नुकसान मात्र भरून निघाले नाही.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.