खेळण्यातील नव्हे, पण खेळण्यासारख्या दिसणाऱ्या गाडीतून केला ब्रिटनचा प्रवास!

आंतरराष्ट्रीय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

“माझ्या पील पी५० किंवा मॉरिस मायनर ह्या गाडीमधून मी जिथे जिथे जातो, तिथे लोक चुंबक लावल्यासारखे माझ्या गाडीकडे खेचले जातात. माझी गाडी त्यांना जवळून बघायची असते. खरं तर इतकी छोटी गाडी असू शकते यावर त्यांचा विश्वास नसतो, आणि खात्री करून घेण्यासाठी ते प्रत्यक्ष तिला बघायला येतात”. जगातल्या सगळ्यात छोट्या गाडीचा मालक ॲलेक्स ऑर्चिन म्हणतो.

पील पी५० ही तीन चाकी मायक्रो कार आहे जी १९६२ ते १९६५ या काळात पील इंजिनियरिंग कंपनीने बनवली होती. २०१० च्या गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आतापर्यंतची सर्वात लहान गाडी म्हणून तिची नोंद झाली.

ही गाडी इतकी छोटी आहे की त्यात बसून तुम्ही कुटुंबासह प्रवास करू शकणार नाही, त्यात शॉपिंग बॅग्स ठेऊ शकणार नाही, इतकंच काय कुत्र्याचं छोटसं पिल्लू सुद्धां त्यात मावणार नाही.

सिरिल कॅनेल आणि हेन्री किसॅक यांनी डिझाइन केलेली ही गाडी इतकी लहान होती, की १९६२ च्या अर्ल्स कोर्ट मोटरसायकल शोमध्ये ती गाडी म्हणून नव्हे, तर मोटरसायकल म्हणून पात्र ठरली होती. ही एक अत्यंत मूलभूत गाडी आहे आणि त्यामध्ये कोणतंही ऑनबोर्ड उपकरण किंवा ऑटोमीटर नाही आणि फक्त तीन फॉरवर्ड गिअर्स आहेत. ह्या गाडीमध्ये रिव्हर्स गियर नाहीत.

“लोकांना या गाडीबद्दल खूप कुतूहल आहे. त्यांना माझ्याशी या गाडीबद्दल चर्चा करायची असते. त्यांच्या मनात अनेक प्रश्न असतात. ही गाडी मी स्वतः बनवलेली आहे कां? जर नाही, तर ही गाडी मी कुठून मिळवली? जर मी ही गाडी विकत घेतली असेल, तर ती कुठे विकत मिळते? त्याची किंमत काय आहे? एक ना अनेक प्रश्न. आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त गाड्या आवडणारे लोकच माझ्या गाडीकडे आकृष्ट होतात असं नव्हे, तर केवळ कुतूहलापोटी देखील अनेक जण माझ्याशी बोलायला येतात”.

पूर्व ससेक्समधील विवेल्सफील्ड येथील रहिवासी ॲलेक्स ऑर्चिनने गरजू मुलांसाठी जवळपास £१०,००० जमा करण्यासाठी सिंगल सीटर, तीन-चाकी पील पी५० मध्ये ८७४ मैलांचा दीर्घ प्रवास केला. १३ नोव्हेंबरला तो स्कॉटलंड मधून निघाला आणि ४ डिसेंबर रोजी कॉर्नवॉलला पोहोचला.

“माझ्या या प्रवासामध्ये मला खूप लोकांनी उत्स्फूर्तपणे मदत केली. काही जणांनी गाडीत पेट्रोल भरलं, तर काही जणांनी खाण्यापिण्याच्या वस्तू दिल्या. माझी गाडी बघण्यासाठी गर्दी होत असे हे खरं असलं तरी जेव्हां लोकांना माझ्या प्रवासाच्या हेतूबद्दल समजलं, तेव्हां ते माझ्याकडे आदराने बघू लागले. केवळ काही सनसनाटी निर्माण करावी हे माझं ध्येय नव्हतं, तर गरजू मुलांसाठी जितकी शक्य होईल तितकी रक्कम मला जमा करायची होती आणि ह्याचं सगळं श्रेय मी माझ्या छोट्या गाडीला देईन. जेव्हां लोक ह्या गाडीला बघायला येत असत, तेव्हां त्यांना माझ्या ध्येयाबद्दल समजत असे आणि ते कोणत्या ना कोणत्या प्रकारे मदत करत ज्यामुळे मी गरजू मुलांसाठी इतकी मोठी रक्कम जमवू शकलो”. ॲलेक्स ऑर्चिन सांगतो.

‘मूर्ती लहान पण कीर्ती महान’ अशी म्हण आहे आणि ती या छोट्या गाडीने सिद्ध केली आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा