आपल्याकडे असलेल्या विहिरीचे अधिकार काय असतात? ।। विहिरीचे व्यवहार करता येतात का ? विहिरीचे व्यवहार कसे करावे ? याबाबत थोडक्यात आणि महत्वाची माहिती या लेखात जाणून घेऊया !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

कोणत्याही जमिनीच्या निवासाकरता किंवा शेती करता जर वापर करायचा असेल तर त्या जमिनी करता पाण्याची सोय असणं हे अत्यंत महत्त्वाच आहे. ज्या जमिनीला कोणत्याही स्वरूपाची पाण्याची सोय नाही, अशा जमिनीचा निवासाकरता किंवा शेती करता परिणामकारक वापर होणं हे जवळपास अशक्य आहे.

आता पाण्याचे जे असंख्य प्रकारचे स्त्रोत असतात त्याच्यापैकी विहीर हा एक अत्यंत महत्त्वाचा स्त्रोत आहे. आपल्यापैकी अनेकांच्या गावांमध्ये, घरामध्ये किंवा शेतीमध्ये विहीर असणं हे अतिशय सर्वसामान्य गोष्ट आहे. आता काही वेळेला काय होतं की एक विहीर ही एकापेक्षा जास्त घरांना किंवा शेतीला वापरण्यात आलेली असते.

आणि अशा वेळेला ह्या शेतीकरता किंवा घराकरता ज्या विहिरींना आपण पाणी वापरतोय त्या संदर्भाने कधीतरी कोठेतरी नोंदणीकृत करार किंवा करार करणं हे आवश्यक ठरत. आता विहिरीचा करार करावा का? कसा करावा? हे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतात. सगळ्यात पहिले एक लक्षात घेतलं पाहिजे की विहीर ही गोष्ट अशी आहे की जी जमिनीशी संलग्न किंबहुना जमिनीशी एकरूप आहे.

कोणत्याही परिस्थितीत विहीर ही त्या जमिनी पासून विभक्त किंवा वेगळी करता येऊ शकत नाही. म्हणूनच जेव्हा आपल्याला एखाद्या विहिरीचे अधिकार हवे असतात. तेव्हा काही वेळेला ती विहिर ज्या जमिनीत आहे त्या जमिनीचे सुद्धा अधिकार घेणे आवश्यक ठरतं. मात्र याला अडचण कुठे येते तर एखादी विहीर जर आकाराने छोटी असेल आणि त्या विहिरीच्या खरेदी करता आपण जो व्यवहार करणार त्याला त्या छोट्या आकारामुळे तुकडेबंदी आणि तुकडेजोड कायद्याची बाधा येते.

आता तुकडेबंदी तुकडेजोड कायदा काय सांगतो तर कोणत्याही ठिकाणी किंवा ज्याठिकाणी विशेषतः तुकडेबंदी तुकडेजोड कायदा लागू आहे, त्याठिकाणी एका ठराविक आकारापेक्षा लहान आकाराच्या जमिनीचा तुकडा करण्याला कायद्याने मनाई आहे आणि सर्वसाधारणतः विहीर आणि त्याचा आकार जर आपण लक्षात घेतला.

तर त्याला या तुकडेबंदी तुकडेजोड कायद्याची बाधा किंवा अडचणी येणार हे जवळपास निश्चित आहे. मग अशावेळी आपल्याला काय करता येईल म्हणजे तुकडेबंदी तुकडेजोड कायद्यामुळे जर आपल्याला विहिरी पुरत क्षेत्रफळ विकत घेता येत नसेल तर मग त्याला दुसरा पर्याय काय?

तर मग त्याला दुसरा एक पर्याय असा असू शकतो की आपण त्या विहिरीच्या किंवा विहिरीच्या पाण्याच्या वापराचे अधिकार संपादन करू शकतो, त्याकरता आपण रीतसर करार करून त्याची नोंदणी सुद्धा करू शकतो. आता जेव्हा वर्ग दोनच्या जमिनी असतात किंवा ज्या जमिनीच्या हस्तांतरणावर निर्बंध असतात.

त्याच्या करता थेट खरेदी खत न करता साठे करार किंवा विकास करार असे काही कराराचे प्रकार अवलंबले जातात. ज्याने त्या करारात सामील पक्षकाराचे काम सुद्धा होतं आणि ते हस्तांतरण न ठरल्याने तुकडेबंदी तुकडेजोड किंवा इतर कोणत्याही कायद्याचे उल्लंघन सुद्धा होत नाही.

असा जर मधला मार्ग निवडला तर कोणत्याही कायद्याचे उल्लंघन न करता, जे विहिरीचे किंवा विहिरीच्या पाण्याचे अधिकार जे आहेत ते कायदेशीररित्या प्रस्थापित होऊ शकतात. आता जेव्हा आपण कोणताही करार करायचा म्हणतो तेव्हा तो करार कायद्यानुसार वैध ठरतो किंवा नाही याचाही विचार करणे आवश्यक आहे.

आता करार कायद्यानुसार करार वैध ठरण्याकरता काही विशिष्ट अटी आणि शर्ती आहेत. त्या अटी आणि शर्तींचा आपण थोडक्यात विचार केला तर एक म्हणजे त्या करारातील व्यक्ती सज्ञान असणे, तो करार कायदेशीर कारणाकरता असणे, त्या कराराकरता दिला जाणारा मोबदला हा सुद्धा कायदेशीर असणे.

आणि तो करार ज्यातील सामील व्यक्तींनी स्वसंमतीने केलेला असणे, या वैध कराराच्या काही मुख्य अटी आणि शर्ती आहेत. आता जर आपण विहिरीच्या वापराच्या कराराचा या अटी आणि शर्तींच्या पार्श्वभूमीवर विचार केला तर या सगळ्या चारही अटी म्हणजे सक्षम व्यक्ती, कायदेशीर कारण, कायदेशीर मोबदला आणि स्वसंमती या चारही प्रमुख अटी आपण या विहिरीचा करारामध्ये पूर्ततेची करू शकतो.

त्यामुळे आपल्यापैकी ज्या लोकांना विहिरीचा एखादा करार करायचा असेल किंवा विहिरीमध्ये हक्क संपादित करायचे असतील. आपले हक्क प्रस्थापित करायचे असतील किंवा ज्यांचे विहीर आहे त्यांना त्या विहिरीचेे किंवा विहिरीच्या पाण्याचे हक्क त्रयस्थांना द्यायचे असतील तर, त्याचाकरता विहीर आणि त्यातील पाण्याचा वापराचा करार हा एक सर्वोत्तम उपाय किंवा पर्याय ठरू शकतो.

त्याकरता आपण म्हणजे ज्या लोकांमध्ये हा करार करायचा आहे त्यांनी त्या दोघांमधला व्यवहार आणि त्याचा अटी आणि शर्ती एकदा निश्चित केल्या, आणि त्या आपण एका कराराच्या स्वरूपात कागदावर उतरवल्या की आपण त्याला मूर्त आणि कायदेशीर रूप देऊ शकतो. आपल्याला जर या कराराची नोंदणी करायची असेल तर आपण हा करार नोंदणीकृत देखील करू शकता.

मात्र काही वेळेला जेव्हा कराराची नोंदणी करायची वेळ येईल तेव्हा या कराराचे मुल्यांकन नक्की कसं करायचं? मग त्यावर मुद्रांक शुल्क किती आकारायचं? नोंदणी फी किती आकारायची? या अनुषंगाने काही समस्या येऊ शकतात. मात्र त्याकरिता आपण स्थानिक निबंध किंवा नोंदणी कार्यालयातील जे अधिकारी आहेत

त्यांची मदत घेऊ शकता आणि त्यांच्या मार्गदर्शनाने या कराराकरता नियमानुसार जी काही मुद्रांक आणि नोंदणी फी भरायची असेल ती जर आपण भरली तर आपण विहिरीचे किंवा विहिरीतील पाण्याच्या वापराचे अधिकार नोंदणीकृत कराराद्वारे संपादित निश्चितपणे करू शकतो. आता याचा फायदा काय आहे

तर समजा कालांतराने या विहिरी संदर्भात किंवा विहिरीच्या पाण्याच्या वापराच्या संदर्भात काही वाद विवाद निर्माण झाला तर ज्या व्यक्तीने त्या विहिरीचे किंवा पाण्याचे अधिकार संपादित केलेले आहेत त्याला त्या हक्काच्या संरक्षणार्थ योग्य त्या ठिकाणी म्हणजे दिवाणी किंवा फौजदारी न्यायालयामध्ये दाद मागता येईल.

कोणत्याही अधिकार जर नोंदणीकृत कराराद्वारे संपादित केले असतील किंवा नोंदणीकृत कराराद्वारे अस्तित्वात आले असतील तर त्या कराराची पूर्तता करण्याकरता किंवा त्या कराराचा भंग रोखण्याकरता किंवा त्या कराराअंतर्गत मिळालेल्या अधिकारांच्या रक्षणाकरता ज्या व्यक्तीचे अधिकार बाधित होत आहेत किंवा धोक्यात येत आहे अशी व्यक्ती दिवाणी न्यायालयात निश्‍चितपणे दाद मागू शकते.

आणि जर आपण दाद मागू शकलात आपल्याला त्या गुणवत्तेवर न्याय मिळवू शकला तर त्या विहिरीच्या वापराचे किंवा विहिरीच्या पाण्याचे वापराचे आपले अधिकार अबाधित राहतील. हाच जर आपण नुसता तोंडी व्यवहार केला किंवा अनोंदणीकृत करार केला.आणि भविष्यात जर वाद उद्भवला तर त्या तोंडी किंवा अनोंदणीकृत कराराच्या आधारावर आपल्याला दिवाणी न्यायालयात जाता येईलच किंवा दिवाणी न्यायालयात जरी गेलो तरी त्याला यश येईलच याची शक्यता काहीशी कमी आहे. त्यामुळे जेव्हा आपल्याला विहिरीचा किंवा विहिरीतील पाण्याचा वापर करायचा असेल

त्याच्याकरता आपल्याला अधिकार संपादित करायचा असेल आणि त्या अधिकारांना मूर्त आणि कायदेशीर रूप द्यायचं असेल तर त्याच्याकरता विहिरीच्या वापराचे किंवा विहिरीच्या पाण्याच्या वापराचे रीतसर करार करून ते नोंदणीकृत करून घेणे हे आपल्या हक्कांच्या दीर्घकालीन फायद्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे ठरेल आणि असा कराल आपल्यालाच नव्हे तर आपल्या वालीवारसांना सुद्धा निश्चितपणे फायद्याचा ठरेल.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “आपल्याकडे असलेल्या विहिरीचे अधिकार काय असतात? ।। विहिरीचे व्यवहार करता येतात का ? विहिरीचे व्यवहार कसे करावे ? याबाबत थोडक्यात आणि महत्वाची माहिती या लेखात जाणून घेऊया !

  1. शेजारील गटातील विहीर ढासळत आपल्या गटात आल्यास त्यावर हक्क सांगता येतो का?

Comments are closed.