एक सामान्य मुंबईकर ते 450 हॉटेल्सचे मालक असा प्रवास।। ‘विठ्ठल कामत’ हॉटेल इंडस्ट्रीचे किंग यांचा जीवनप्रवास !!

अर्थकारण लोकप्रिय

विठ्ठल इंदिरा व्यंकटेश कामत यांचा जन्म मुंबई मध्ये झाला, त्यांचे वडील लहान असताना हॉटेल मध्ये कपबशी उचलण्याचे काम करत, अशातच आठ वर्षाचे असताना एकदा त्यांच्या हॉटेल मालकाला बाहेरगावी जावं लागलं, म्हणून त्यांनी हॉटेल च्या चाव्या विठ्ठल कामत यांच्या वडिलांकडे दिल्या, परंतु काही कारणास्तव मालकाला दीड वर्ष येताच आलं नाही, जेव्हा दीड वर्षांनी मालक परत आले तेव्हा त्या दीड वर्षात झालेला ३६००० रुपये चा नफा त्यांनी मालकाला दिला.

ते पाहून मालक खूप खुश झाले व त्यांना म्हणाले तू माझ्या मुलीशी लग्न कर व माझा जावई हो. त्यावर त्यांनी मालकाला सांगितलं की मी माझं स्वतः च हॉटेल उभं करेल आणि मग तुमच्या मुलीचा विचार करेल. विठ्ठल यांना मात्र फार कष्ट करावे लागले नाहीत, त्यांच्या वडिलांनि आईचे दागिने गहान ठेऊन त्यांना सत्कार नावच एक हॉटेल सुरू करून दिल होत. मात्र लहानपणापासूनच आई वडिलांचे संस्कार हे त्यांच्यावर झाले होते. विठ्ठल कामत सांगतात की एक वेळ घड्याळ चुकेल पण त्यांचे वडील नाही एवढे ते वक्तशीर होते.

दुसरं म्हणजे त्यांनी घाम हे अत्तर समजून कष्ट केले. आणि तिसर म्हणजे स्वभावाने कडक पण कनवाळू. आईबद्दल सांगताना ते म्हणतात की आई ने देखील त्यांना तीन महत्वाच्या गोष्टी शिकवल्या, एक म्हणजे जे पण काम करशील ते अतिशय चांगल कर, दुसर म्हणजे ज्या कामात तुला समाधान वाटेल तेच करावं तेव्हा पैशाचा विचार करू नये. आणि तिसरं म्हणजे हे की, बाळा अस काम कर की वडिलांपेक्षा मोठा हो.

एक दिवस विठ्ठल यांचे वडील त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले आज मला खूप आनंद होतोय, त्यांनी विचारलं काय झालं, तेव्हा ते म्हणाले आज पर्यंत लोक मला व्यंकटेश कामत म्हणून ओळखत होते आज विठ्ठल चे वडील म्हणून ओळखतात. पण यासाठी मला खूप खडतर प्रवास करावा लागला हे पण तितकंच खरं आहे. विठ्ठल कामत सांगतात की त्यांचे वडिल धोतर आणि सदरा घालत असत, लोक त्यांना हॉटेल वाले म्हणूनच ओळखायचे तर काही जण त्यांना कमीपणा दाखवायचे तेव्हा मला त्यांच्या डोक्यात हातोडी घालविशी वाटत असे.

हा माझा अहंकार नव्हता तर एक चीड होती, ताकद होती या लोकांना काहीतरी करून दाखवायची. ते सांगतात तुमच्या मनगटात जर बळ असेल तर तुम्ही काहीही करून दाखवू शकता. एक दिवस त्यांच्या गुजरात च्या एका मित्राने त्यांना सांगितलं की त्यांचं एक हॉटेल आहे जे हाय वे वर आहे पण तरी खूप तोटा झाला आहे आणि कुणीच त्यात नफा आणून देऊ शकत नाही. तेव्हा विठ्ठल यांनी फक्त एकच प्रश्न विचारला हॉटेल हाय वे वर आहे का? ते म्हणाले हो.

दुसऱ्याच दिवशी विठ्ठल यांनी चार हाल्फ पॅन्ट आणि चार शर्ट घेतले आणि तिथे जाऊन पाहणी केली, तेव्हा त्यांना वाटलं की हे चालू शकत, सगळ्यात आधी तत्यांनी तिथे खाली नाव लिहल रमत गमत विठ्ठल कामत. ते सांगतात की गुजराती लोकांना जर आकर्षित करायचं असेल तर तुमचं नाव आकर्षित असायला पाहिजे. परंतु त्यांना कोणी ओळखत नसल्यामुळे गर्दी होत नव्हती मग गर्दी वाढवायची कशी म्हणून विठ्ठल यांनी मित्रांकडून काही गाड्या मागवून घेतल्या आणि त्या अशा पार्क केल्या ज्यामुळे बाहेरून जाणाऱ्याना वाटायचं की आत खूप गर्दी आहे.

एकदा का ग्राहक आत आले की हॉटेल मधील नोकर त्या सर्वांची व्यवस्थित काळजी घेत व त्यांना जेवण वाढत असत. त्याचबरोबर विठ्ठल यांनी ठेवलेले काही नोकर आलेल्या ग्राहकांच्या गाडीच्या काचा साफ करत असत, वायपर बदलून देत त्यासाठी त्यांनी खास जर्मनी वरून वायपर बोलावले होते. त्यामुळे ग्राहक खुश होत आणि परत येत असत. अस करत करत गिऱ्हाईक वाढलं आणि हॉटेल चांगलं चालायला लागलं.

मग विठ्ठल यांनी आणखी हॉटेल विकत घेतली. एक दिवस त्यांना मुंबई ला हॉटेल विक्री ला असल्याचं कळलं आणि त्यांनी ठरवल की आपण आपलं हॉटेल जगावेगळं करायचं, जगावेगळं कस तर पहिलं हॉटेल कचरामुक्त हॉटेल, दुसरं म्हणजे इको फ्रेंडली हॉटेल. जेव्हा ते बँकेत गेले तेव्हा त्यांनी इको हॉटेल म्हणजे इकॉनॉमिक हॉटेल का अस विचारलं ही परिस्थिती होती तेव्हाची आता त्याच हॉटेल नि ३७४ अवॉर्डस जिंकले आहेत. ते सांगतात की हे तुम्ही ही करू शकतात जी पण आयडिया तुमच्या डोक्यात असेल तीचा टीम सोबत पाठपुरावा घ्या.

पुढे ते सांगतात की भाऊबंदकी खूप वाईट असते याचा त्यांना खूप वाईट अनुभव आला ते सांगतात जिंदगी से बडी कोई सजा नही, क्या जुल्म किया है पता ही नही, इतने हिस्सो बट गया हू मै, के खुद के लिये कुछ बचा ही नही. वाचलं होतं २८२ करोड रुपयांचं कर्ज पण जेव्हा त्यांच्या CA ने आणि काही घरच्यांनी त्यांना सांगितलं की orchid विकायला काढलंय तेव्हा त्यांनी ठरवल आता जगून काही उपयोग नाही, म्हणून ते निघाले विमानतळावर गेले, तिथून मुंबई ला गेले, सूर्य अस्ताला आला होता, संध्याकाळचे 6.30 वाजले होते, ते मित्राकडे गेले त्याला म्हटलं चल मला दारू प्यायची आहे, मित्र म्हणाला अरे थांब 7 वाजता घेऊ.

विठ्ठल खिडकीत बसले आणि बाहेर पाहत होते तर २४ व्या माळावर एक व्यक्ती सेफ्टी बेल्ट शिवाय पेंट मारत होता, यांना वाटलं आपण आपल्या कामगारांना सेफ्टी बेल्ट शिवाय काम करू देत नाही आणि हा ,अशा ने हा पडेल, ते त्यांच्याकडे पाहू लागले, तो२३ व्या माळ्यावर आला, २०व्या माळावर आला,अस करत करत तो खाली उतरला, तेव्हा विठ्ठल यांनी देवाचे आभार मानले, आणि तेव्हा त्यांचा विचार बदलला, आणि त्यांनी विचार केला.

अरे विठ्ठला तो माणूस ७००० रुपये साठी २४ व्या माळावरून खाली उतरला, आणि तू, तुझ्याजवळ तर सगळं आहे, हिम्मत आहे, जिद्द आहे, तू मेहनत करू शकतो, मग तुला आत्महत्या करायची काय गरज आहे? असा विचार करून विठ्ठल यांनी आपला विचार बदलला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी ते परत हॉटेल ला गेले, आज तोच डूबणारा सूर्य उगवला होता. विठ्ठल कामत आपल्या भाषणात सांगतात की मी तुम्हाला यशस्वी होण्यासाठी काही महत्वाचे फॉर्म्युले सांगत आहे फक्त त्याआधी दोन गोष्टी करा पहिली म्हणजे जे पण ज्ञान तुम्ही मिळवाल दुसऱ्याला द्या, जो पण पैसा तुम्ही कमावल त्यातला २०-२५% दुसऱ्या साठी वापरा.

दुसरं म्हणजे दरवर्षी २०० तरी झाड लावा. विठ्ठल सांगतात यशस्वी होण्याचा पहिला फॉर्म्युला म्हणजे, जे तुम्हाला आवडत तेच करा, तुमच्या मनाला जे पटत नसेल ते काम करू नका, दिमाग चाहे दिल ना चाहे वो काम करना मत, दौलत सबकुछ नही, बहुत कुछ के लिये सबकुछ खोना मत; दिमाग चाहे दिल ना चाहे वो काम कभी करना मत, कहता है विठ्ठल कामत. दुसरा फॉर्म्युला ते सांगतात आयुष्यात एक गुरू करा व गुरु आई वडील नको कारण त्यांना तुमची काळजी असते, गुरू असा असावा जो तुमच्या त्रुटी तुम्हाला सांगू शकेल.

तिसरा फॉर्म्युला ते सांगतात की स्वतःचे वीक पॉईंट, स्ट्रेंथ, काय आहेत ते जाणून घ्या तुम्हाला जे पण करायचा आहे त्याच्या एक्स्पर्ट जवळ काम करा, कुणी काम करताना रागावल तर वाईट वाटून घेऊ नका, आणि घड्याळ पाहून काम करू नका. अपघात, लहान सहान चुका, होणारच पण आपण टेनिस बॉल सारख व्हायचं लोकांनी जेवढं आपटलं तेवढं वर जायचं.

पुढे ते अस सांगतात की आपल्या डिक्शनरी मध्ये असलेला IMPOSSIBLE ह्या शब्दाला I Am Possible करायचं, का तर बरेच परप्रांतीय मला म्हणायचे तू तर घाटी आहेस तू काय हॉटेल चालवणार? पण आज मी जगातलं सगळ्यात जास्त पुरस्कार मिळवणार हॉटेल मी चालवतो. विठ्ठल कामत सांगतात मला एकदा प्रश्न विचारला गेला की तुमच्या आयुष्यातला सगळयात आनंदाचा क्षण कोणता? तेव्हा त्यांनी सांगितलं की जेव्हा मी हॉटेल ऑर्किड च उदघाटन केलं तेव्हा फक्त २१ लोक होते आणि माझ्या वडिलांनी जेव्हा समई लावली तेव्हा त्यांच्या डोळ्यातले अश्रू त्या समई त पडले तो माझ्या आयुष्यातला सगळ्यात जास्त आनंदाचा क्षण होता.

एकदा एका व्यक्ती ने त्यांना विचारलं When do you realize that You are a famous personality?, तेव्हा विठ्ठल यांनी उत्तर दिलं ,’The day when my signature turn into an autograph  ,I am the famous personality’. ते सांगतात देवाने तुम्हाला लोकांची मदत करायला पाठवलं आहे आणि मी ही तेच करत आहे. तुम्ही कुणाला माना किंवा नका मानू पण एका व्यक्तीला नक्की माना ती व्यक्ती म्हणजे स्वामी विवेकानंद. त्यांनी जे सांगितल ते लक्षात ठेवा, एक दिवस तुम्ही नक्की यशस्वी व्हाल.

1 thought on “एक सामान्य मुंबईकर ते 450 हॉटेल्सचे मालक असा प्रवास।। ‘विठ्ठल कामत’ हॉटेल इंडस्ट्रीचे किंग यांचा जीवनप्रवास !!

Comments are closed.