नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
एक काळ होता, जेंव्हा सकाळी उठल्याबरोबर लोकांना ब्रश करून चहाचा आस्वाद घेण्याची सवय होती. आता काळ बदलला, ‘हेल्थ फ्रिक मंडळी’ आता चहा घेतच नाहीत आणि काही मंडळी तर रोज ब्रश देखील करत नाहीत. हा, पण एक गोष्ट लहाना पासून वयस्कर मंडळी सगळेच करतात ती म्हणजे जाग येताच पहिले हातात मोबाईल घेऊन WhatsApp उघडून बसतात. आपल्याला आलेले गुड मॉर्निंगचे मेसेज इतर ग्रुप्स मध्ये फॉरवर्ड करणे हे तर नित्य नियमाचे झाले आहे. आता WhatsApp ची इतकी जबरदस्त लोकप्रियता असेल तर त्याचा वापर करून घेण्यात सरकार तरी का मागे राहावे? त्यामुळेच केंद्र सरकारने आपली डिजी लॉकर ही सुविधा थेट WhatsApp सोबत जोडली आहे. चला तर मग जाणून घेऊया याबद्दल अधिक माहिती.
थोडासा इतिहास जाणून घेऊ : आपल्या पैकी किती लोकांना माहिती आहे की WhatsApp ची जेंव्हा सुरुवात झाली होती तेंव्हा ते आजच्या सारखे ‘फ्री’ सॉफ्टवेर नव्हते. एका वर्षासाठी WhatsApp हे फ्री वापरता येत असे, परंतु दुसर्या वर्षापासून WhatsApp वापरण्यासाठी ठराविक रक्कम आकारली जात आसे. परंतु कंपनीने भारतात एक-एक वर्ष म्हणत बरीच वर्षे Whatsapp ची सुविधा मोफत दिली. पुढे मार्क झकरबर्ग यांच्या फेसबुक कंपनीने WhatsApp विकत घेतले आणि WhatsApp हे कायमस्वरूपी मोफत राहील अशी घोषणा करून टाकली. तुम्हाला माहीत आहे फेसबुकने WhatsApp खरेदी करण्यासाठी 19 बिलियन डॉलर्स इतकी रक्कम मोजली होती! आता विचार करा, एवढी मोठी रक्कम मोजून whatsapp विकत घेतले आणि ते पुढे लोकांना मोफत वापरण्यास दिले तर कंपनीचा काय फायदा होणार? याची प्लॅनिंग देखील मार्क झकरबर्ग आणि त्याच्या फेसबुक कंपनीने WhatsApp खरेदी करण्यापूर्वीच करून ठेवली होती.
फेसबुकची प्लॅनिंग अगदी सोपी होती, WhatsApp जे पूर्वीही लोकप्रिय होतं त्याला इतकं भव्य-दिव्य करायचं की लोकांना त्याची सवय व्हावी. झालं देखील तसच. आज इतके सारे मेसेंजर असताना सुद्धा WhatsApp ची बरोबरी कोणी करू शकत नाही. पुढे या लोकप्रियतेचा फायदा घेत इतर कंपनी आणि बिजनेस यांना आपल्या ग्राहकांपर्यंत थेट पोहचण्यास WhatsApp चा वापर करायचा. त्या कंपन्या आणि बिजनेस कडून मोठी रक्कम घ्यायची आणि तुम्हाला-मला whatsapp ची सुविधा मोफत द्यायची. त्यामुळेच तर मोठ मोठे ब्रॅंड देखील आता WhatsApp द्वारे थेट आपल्या ग्राहकांपर्यंत पोहचतात. आता यामध्ये केंद्र सरकार देखील मागे राहिलेले नाही. पूर्वी कोव्हिडचे लसीकरण प्रमाणपत्र आणि आता थेट डिजी लॉकर whatsapp सोबत जोडले गेले आहेत.
डिजी लॉकर आता whatsapp वर : सर्वच सरकारी सेवा थेट जनतेपर्यंत पोहचतातच असे नाही, त्यामुळे जनता त्यांच्या फायद्याच्या बर्याचशा गोष्टींना मुकते. ही गोष्ट टाळण्यासाठी केंद्र सरकारने आपले डिजीटल लॉकर ही सुविधा थेट WhatsApp वर सुरू केली आहे. यामुळे जनतेला आपले महत्वाचे कागदपत्र जसे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, १०वी – १२वी चे मार्कमेमो आणि बरेच कागदपत्र थेट WhatsApp वर मिळणार आहेत. ज्या व्यक्ती अगोदर पासून डिजी लॉकरचा वापर करत आहेत त्यांना तर याचा फडा होणारच आहे, सोबत नवीन मंडळींना थेट whatsapp वरुन डिजी लॉकर खाते तय्यार करून सुविधांचा लाभ घेता येणार आहे.
सेव्ह करा हा नंबर : या सेवेचा लाभ घेण्यासाठी 9013151515 या नंबर वर आपल्या WhatsApp वरुन Hi किंवा नमस्ते असा मेसेज पाठवा. त्यानंतर bot मेसेजिंग द्वारे आपल्याला पुढील माहिती देण्यात येईल. या मध्ये आपण Cowin पोर्टल अथवा Digi Locker ही सुविधा निवडू शकता.
Digi Locker निवडल्या नंतर आपल्या Digi locker वर खाते आहे का याबद्दल विचारले जाईल. जर आपले खाते असेल तर Yes हा पर्याय निवडून पुढे योग्य ते पर्याय निवडून या सुविधेचा लाभ घेऊ शकता. जर आपले खाते नसेल तर No हा पर्याय निवडून आपण आपले खाते बनवू शकता. अश्या पद्धतीने अनेक महत्वाचे कागदपत्र जतन करून ठेवू शकता.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.