पिकलेली आणि गोड केळी कशी ओळखावी? केळी घेताना या 5 गोष्टी लक्षपूर्वक पहा.

लोकप्रिय

काल कधी नाही ते बाजार करण्यासाठी गेलो. फळ-भाज्यांचा योग्य भाव माहीत नसल्याने थोडासा तोटा नक्कीच झाला, पण घरी आल्यानंतर केळी वरुण महाभारत झाले. काल दिवसभरात केळी कमी आणि शिव्याच जास्त खाल्ल्या. या सर्व प्रकारावरून एक वाक्य आठवले, ”काम असे करावे की पुढच्या वेळी आपल्याला कोणी कामच सांगू नये.” असो, हा झाला विनोदाचा भाग. आता आपण आपल्या मुद्दयाकडे वळूया, ते म्हणजे एखादे फळ-भाजी खरेदी करताना त्याची योग्यता कशी ओळखावी? आजच्या या लेखामद्धे जाणून घेऊया केळी गोड आणि ताजी असल्याचे कसे ओळखावे? हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा, म्हणजे त्यांना बोलणे खाण्याची वेळ येणार नाही.

कच्ची केळी खाताना तोंडाची चव तर खराब होतेच, सोबत पचनास त्रास होतो, शरीराला पोषक तत्व पूर्णपणे उपलब्ध होत नाहीत त्यामुळे शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजे मिळत नाहीत. कच्ची केळी खाणे दातांसाठी देखील हानिकारक आहे. जर तुम्ही जास्त पिकलेली केळी खाल्ले तर ते आंबायला लागतात ज्यामुळे पुन्हा पचनास त्रास होतो, त्यांची चव चांगली नसते आणि पोषक तत्वे देखील योग्य प्रमाणात मिळत नाहीत. म्हणूनच आपण केळी खरेदी करताना ती योग्य प्रकारे पिकली आहे याची खात्री करणे आवश्यक असते. तर जाणून घेऊया असेच काही मार्ग जे तुम्ही केळी खरेदी करताना वापरू शकतात.

नैसर्गिकरित्या पिकलेली केळी एकसारखी दिसत नाही . ते गडद पिवळ्या रंगाचे असतात आणि त्यांच्यावर लहान तपकिरी आणि काळे ठिपके असतात. देठही काळे असतात. कृत्रिमरीत्या पिकवलेली केळी सारखीच पिवळी असते आणि त्यांची त्वचा चमकदार असते. कृत्रीमरित्या पिकावलेली केळी दिसायला तर चांगली दिसते पण त्यामध्ये चव आणि योग्य ते पोषक घाट नसतात.

या 7 गोष्टी तुम्हाला केळी खरेदी करताना फायदेशीर ठरतील, जेणेकरुन तुम्हाला कळेल की केळी केव्हा पिकतात आणि खायला चांगली असतात.

1) तपकिरी डाग : जपानी संशोधकांनी केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की ज्या केळीच्या सालीवर तपकिरी डाग असतात ते TNF (ट्यूमर नेक्रोसिस फॅक्टर) नावाचे पदार्थ तयार करतात जे कर्करोगाच्या पेशींशी लढण्यासाठी चांगले काम करतात. हिरव्या केळ्याऐवजी तपकिरी डाग असलेली केळी खाल्ल्याने आपल्या शरीरावर 8 पट जास्त चांगला परिणाम होतो.

त्यामुळे केळी खाण्याची सर्वोत्तम वेळ म्हणजे जेव्हा त्यावर काही तपकिरी डाग दिसतात. परंतु, लक्षात ठेवा की केळीवरील काळे लांब डाग हे तपकिरी डाग नसतात, परंतु ते सहसा एकाच ठिकाणी बराच काळ ठेवल्यामुळे होतात. त्यामुळे तपकिरी डाग लहान आहेत याची खात्री करा.

2) सहजता : हिरवी केळी पिळून बघा. आता एक पिवळी केळी पिळून बघा आणि शेवटी एक तपकिरी डाग असलेली केळी पिळून बघा. तुम्हाला फरक जाणवेल. तपकिरी डाग असलेली केळी खूप मऊ असते. हे सूचित करते की केळी कदाचित पिकलेली आहे.

3) देठ : सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे केळीचे देठ लक्षपूर्वक पहा. केळीचे देठ हिरवे असेल तर केळी घेणे टाळा. अशी केळी पिकलेली नसते.

4) केळी सहज सोलली जाते : केळीचे साल काढताना ते अगदी सहजतेने काढले जात असेल तर समजून घ्या की केळी खाण्यासाठी चांगली पिकलेली आहे. परंतु साल काढण्यास अवघड जात असेल तर समजून जा की केळी कच्ची आहे. जेंव्हा केळी अति-जास्त पिकलेली असेल तर केळीचे साल काढताच केळी तुटून पडू शकते.

5) कच्चे केळ दातांसाठी चांगले नसते : कच्ची केळी तुमच्या दातांसाठी फारशी चांगली नसतात कारण ती खूप पिष्टमय असतात आणि दातांमध्ये अडकतात. हे पचवण्यासाठी तुमच्या शरीराला खूप मेहनत घ्यावी लागते आणि यामध्ये तुमच्या दातांच्या दरम्यानचा समावेश होतो. कच्ची केळी तुमच्या दातांवर खूप डाग सोडेल पण पूर्ण पिकलेली केळी खाल्ल्यानंतर तुमचे दात एकदम स्वच्छ होतील.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.