नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
सोशल मिडियाशी जोडलेले असलेल्या ब-याच जणांना ‘Mostly sane’ हे नाव परिचित आहे. ही मोस्टली सेन युट्युब चॅनेलच्या माध्यमातून प्राजक्ता घराघरात पोहोचली आहे. तुमच्या आमच्या रोजच्या जीवनातील अनेक घटना विनोदी पद्धतीने सादर करत प्राजक्ता प्रेक्षकांचं मनोरंजन करत असते.
प्राजक्ताने सहावीत असल्यापासूनच आर जे बनयाचं ठरवलं होतं. त्यासाठी आवश्यक ती तयारी करत तिने आर जे म्हणून जॉब मिळवला. प्राजक्ताने लहानपणापासून पाहिलेलं स्वप्न पुर्ण झालं. पण तरीही आणखी काहीतरी कमतरता असल्याचं तिला सतत जाणवत होतं. मनासारखा जॉब असूनही प्राजक्ताने पुन्हा एकदा वेगळी वाट निवडायचं ठरवलं.
2015 मध्ये प्राजक्ताने तिचं युट्युब चॅनेल लाँच केलं. हा निर्णय तिच्यासाठी माईलस्टोन ठरल्याचं प्राजक्ता नेहमी सांगते. अशा वेळी कुटुंबाचा सपोर्ट महत्त्वाचा असतो. प्राजक्ताच्याबाबतही तिला कायमच कुटुंबाचा सपोर्ट मिळाला आहे.
प्राजक्ताने अभिनयातही डेब्यु केला आहे. खयाली पुलाव या शॉर्ट फिल्ममधून ती प्रेक्षकांच्या भेटीला आली आहे. प्राजक्ताच्या शिरपेचात नुकताच एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. प्राजक्ता UNDP ची युवा जलवायू चॅम्पियन बनली आहे.
हा मान मिळवणारी ती पहिली भारतीय सेलिब्रिटी आहे. प्राजक्ता आता ग्लोबल वॉर्मिंग, जैव विविधता नुकसान यांसारख्या मुद्द्यांवर युवापिढीशी संवाद साधताना दिसेल. प्राजक्ता यापुर्वी युट्युबचं ‘Creators For Change’ ची पहिली वैश्विक राजदुत आहे. याशिवाय No offense campaign च्या माध्यामातून ट्रोलिंग आणि होमोफोबिया या प्रश्नांकडे लोकांचं लक्ष वेधलं.
तिच्या No offense campaign ला आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिवसानिमित्त संयुक्त राष्ट्र कार्यालय, न्युयॉर्कमध्ये प्रदर्शित केलं गेलं होतं. युट्युबच्या ‘Creators For Change’साठी प्राजक्ताने 2020 मध्ये एक डॉक्युमेंट्री बनवली होती. तिच्या या प्रोजेक्टला प्रतिष्ठीत 48 व्या डे टाईम एमी अॅवॉर्डससाठी नामांकनही मिळालं होतं.
आपल्या शालेय जीवनात शिक्षण घेण्यासाठी संघर्ष कराव्या लागणा-या मुलींवर ही डॉक्युमेंट्री बेतली होती. या दरम्यान तिची मिशेल ओबामा यांच्यासोबतच्या भेटीची चर्चाही झाली होती.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा