कुसुम सोलार पंप 2022 साठी अर्ज सुरू झाले आहेत. अर्ज कसा भरावा? कागदपत्र बद्दल माहिती वाचा सविस्तर.

शेती

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

नमस्कार मंडळी, आज आपण शेतकर्‍यांच्या फायद्याची असलेली कुसुम सोलार पंप योजनेबद्दल रीतरस माहिती जाणून घेणार आहोत. शेतकर्‍यांना 90 ते 95 टक्के अनुदानावर कुसुम सोलार पंप योजने अंतर्गत सोलर पंप हा दिला जातो. यासाठी ऑनलाईन नक्की फॉर्म कसा भरायचा, तसेच कागदपत्रे कोणकोणती अपलोड करायचे आहेत, या कुसुम योजना अंतर्गत पेमेंट कसं करायचं आणि वेंडर सिलेक्शन कसं करायचं यासारवाची माहिती आपण या लेखाद्वारे घेणार आहोत. त्यामुळे हा लेख शेवटपर्यंत वाचा आणि आपल्या शेतकरी मित्रांसोबत शेअर करा.

काय आहे या योजनेचे उधीष्ट : केंद्र सरकार द्वारे सुरू करण्यात आलेल्या या योजनेचे मुख्य उधीष्ट म्हणजे शेतकर्‍यांना कमीत कमी खर्चात सौर पंप उपलब्ध करून देणे हा आहे. आपल्या सर्वांना माहीतच आहे की, सध्या कोळशाच्या महाराष्ट्रासहित देशातील अन्य राज्यांमध्ये लोडशेडिंगचा धोका निर्माण झालेला आहे. याचा सर्वाधिक फटका हा शेतकरी मित्रांना बसतो. इतर वेळा दिवसातून फक्त 10-12 तास वीज मिळणारे क्षेत्र म्हणजे शेती, त्यातच लोडशेडिंगच्या काळात फक्त 6-8 तासच शेतकर्‍यांना वीज उपलब्ध होते. अश्यामध्ये शेतकर्‍यांना खूप त्रास्स सहन करावा लागतो. त्यामुळे आपणास दिवसातून 12 तास उपलब्ध असलेल्या सौर ऊर्जेचा शेतकर्‍यांनी जास्तीत जास्त वापर करून शेतीचे कामे करावे यासाठी सरकार शेतकर्‍यांना प्रोत्साहन देत आहे.

या योजनेद्वारे, सरकार शेतकरी मित्रांना 60% इतके अनुदान तर 30% इतके कर्ज स्वरुपात रक्कम देणार आहे. त्यामुळे सोलार पंप बसवण्यासाठी सुरूवातीला शेतकर्‍यांना फक्त 10% इतकाच खर्च आपल्या खिशातून द्यावयाचा आहे. ही योजना खरोखरच शेतकर्‍यांच्या फायद्याची असल्याचे प्रथमदर्षणी दिसून येते.

कोण असतील या योजनेचे लाभार्थी :  कुसुम सोलार पंप 2022 या योजनेसाठी लाभार्थी निवडीसाठी काही निकष सरकारने घालून दिलेले आहेत. या निकषांद्वारे असे शेतकरी 1) ज्यांच्या शेतात विहीर, शेततळे, बोअरवेल किंवा इतर कोणताही पाण्याचा स्त्रोत असलेले शेतकरी. (2) कृषी सोलार पंपच्या इतर योजनेसाठी अर्ज केलेले शेतकरी ज्यांचा त्या इतर योजनेमध्ये अर्ज मंजूर झालेला नाही. (3) ज्या शेतकर्‍यांकडे पारंपरिक वीज कनेक्शन उपलब्ध नाही असे सर्व शेतकरी या योजनेचे लाभार्थी ठरू शकतात. या योजनेअंतर्गत २.५ एकर शेतजमीन असणार्‍या शेतकर्‍यांना 5 HP DC, ५ एकर शेत जमीन असणाऱ्या शेतकऱ्यांना ५ HP DC, ५ एकर पेक्षा जास्त असणाऱ्या शेतकऱ्यांना ७.५  HP DC तसेच अधिक क्षमतेचे सौर कृषी पंप यांसाठी अनुदान देय असेल.

हे आहेत आवश्यक कागदपत्र : कुसुम सोलार पंप योजनेसाठी काही कागदपत्रांची आवश्यकता ऑनलाइन अर्ज भरतेवेळी असेल, त्यामुळे शेतकर्‍यांनी या आवश्यक कागदपत्रांची जुळवा-जुळव करूनच अर्ज भरण्याची तयारी करावी. या योजनेसाठी अर्जकर्त्याचे आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, आपल्या बँक खात्याचे पास-बुक यांची आवश्यकता असेल. तसेच, विहीर किंवा बोअर-वेलची नोंद असलेला आपल्या शेताचा सात/बारा उतारा देखील आवश्यक आहे. आपल्या सात/बारा उतार्‍यावर इतर भोगवटदारांची नावे असतील तर २०० रुपयांच्या मुद्रांक कागदावर इतर भोगवटदारांचे ना-हरकत प्रमाणपत्र आपल्याला आवश्यक असेल. आपल्या सात/बारा उतार्‍यावर विहीर किंवा शेती पंप हा सामाईक असेल तर त्या बाबतचे इतर व्यक्तींचे ना-हरकत प्रमाणपत्र आवश्यक असेल. हे सर्व कागदपत्र ऑनलाइन आपलोड करण्यासाठी आपण डिजिटल स्वरुपात (PDF) बनवून घेणे आवश्यक आहेत.

कुसुम सोलार पंप योजनेसाठी अर्ज कसा करावा? : या योजनेसाठी अर्ज करण्यासाठी प्रथम आपणास ऑफीशल वेबसाइला इथे क्लिक करून भेट द्यावी लागेल. वेबसाईट उघडल्यानंतर आपणास आपले आधार कार्ड क्रमांक, राज्य, जिल्हा, मोबाइल नंबर तसेच इतर माहिती भरून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला Payment For Online Application वर क्लिक करायचे आहे. इथे आपल्याला आपल्या गावासाठी आरक्षित असलेला सोलार पंपची संख्या दाखवण्यात येईल. सोलार पंप उपलब्ध असेल तरच आपण पुढील प्रक्रिया करून Proceed To Payment या बटन वर क्लिक करावे. पुढे एक नवीन विंडो ओपन होईल, ज्यामधे आपणास 100 रुपयांचे ऑनलाइन पेमेंट करून घ्यायचे आहे.

पेमेंट झाल्यानंतर आपल्या स्क्रीन वर Thank You! Payment has been done successfully असा मेसेज दिसेल. याप्रकारे आपले रजिस्ट्रेशन पूर्ण झाले आहे. यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाइल नंबरवर आपला युजरनेम आणि पासवर्ड पाठवण्यात येईल. जो पुढे आपल्याला गरजेचं ठरतो. आता पुढील प्रक्रियेकडे जाण्यासाठि आपल्याला या ठिकाणी क्लिक करून लॉग इन पेज वर जयचे आहे. याठिकाणी आपल्याला आपला युजरनेम आणि पासवर्ड टाकून लॉग इन करायचे आहे. ( महत्वाची सूचना : युजर नेम आणि पासवर्ड टाकण्यापूर्वी आपण oficial website वर आपले डिटेल्स भरतो आहे याची खात्री करून घ्यावी ) लॉग इन केल्या नंतर आपणास आपले नाव, मोबाईल नंबर सहित इतर माहिती व अर्जाची स्थिति अपूर्ण असे दाखवण्यात येईल.

पुढे आपणास ‘आपला फॉर्म भरा/ पुढे जा’ या बटन वर क्लिक करायचे आहे. नंतर नवीन विंडो ओपन होईल. यामध्ये आपणास अपूर्ण असलेली माहिती भरवयाची आहे. जसे की, अर्जदारचा निवासी पत्ता, पिकांची माहिती, पंपाची माहिती भरून ‘दाखल करा’ या बटन वर क्लिक करायचे आहे. या ठिकाणी आठव्या नंबरची स्टेप आहे ती म्हणजे कागदपत्र अपलोड करणे. याठिकाणी आपणास आवश्यक ते कागदपत्र, ज्या त्या रखान्यामद्धे अपलोड करावयाचे आहेत. त्यानंतर तिथे हमीपत्र मध्ये दिसत असलेली माहिती एकदा तपासून घ्या आणि घोषणापत्र वर हो असे टिक करून अर्ज दाखल करून घ्या. आता आपला फॉर्म पुर्णपणे भरलेला असून यामध्ये आपणास काहीही बादल करता येणार नाही हे लक्षात असुदया, त्यामुळे माहिती भरते वेळी योग्य तीच माहिती भरा व ती तपासून पहा. तिथे आपला अर्ज डाऊनलोड करा असा ऑप्शन दिसेल तिथून आपण आपला भरलेला अर्ज डाऊनलोड करू शकता. आपला अर्ज मान्य झाल्यानंतर आपणास मेसेज द्वारे कळवण्यात येते, तेंव्हा लॉगिन लिंक वर क्लिक करून आपण पैसे भरून घ्यावे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.