सनी लिओनी ते तुषार कपूर…… हे सेलिब्रिटी सरोगसी पद्धतीने बनले पालक
नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
पालक होणं ही कोणत्याही दांपत्यांच्या जीवनातील सगळ्यात महत्त्वाचा क्षण असतो. आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनणारं, आपली ओळख असणारं मुल या जगात यावं यासाठी प्रत्येकजण उत्सुक असतात. तुमच्या आमच्याप्रमाणेच सेलिब्रिटीही त्यांच्या गुड न्युज शेअर करत असतात.
खरं तर यशाच्या शिखरावर असलेल्या अभिनेत्रीने आई होण्यासाठी ब्रेक घेणं बॉलिवूडमध्ये अजून रुजलं नाही. अशा वेळी सरोगसीचा पर्याय निवडला जातो. सरोगसी म्हणजे एखाद्या स्त्रिच्या गर्भाशयात आयव्हीएफ पद्धतीने स्त्री बीज रुजवून मुल जन्माला घालणं. थोडक्यात स्त्री गर्भाशय भाडेतत्वावर घेणं.
सध्या बॉलिवूडमध्ये सरोगसीचा ट्रेंड जोरात आहे. नुकतीच अभिनेत्री प्रियांका चोप्राने सरोगसीने अपत्यप्राप्ती झाल्याची बातमी शेअर केली. केवळ प्रियांकाच नाही तर अनेक बॉलिवूड सेलिब्रिटीही या पद्धतीने पालक बनले आहेत. पाहा कोण कोण आहेत हे.
एकता- तुषार कपूर : या यादीत सिंगल पॅरेंट म्हणून तुषार कपूरचं नावही आहे. तुषार सरोगसीच्या माध्यमातून एका मुलाचा पिता बनला आहे. तर त्याची बहिण एकतानेही सरोगसीच्या माध्यमातून बाळाला जन्म दिला आहे.
प्रिती झिंटा: प्रितीनेही नुकतच सरोगसीच्या माध्यमातून जुळ्यां मुलांची पालक झाल्याची बातमी शेअर केली आहे. तिला एक मुलगा आणि मुलगी आहे.
शिल्पा शेट्टी : शिल्पानेही सरोगसीच्या माध्यमातून मुलीचं स्वागत केलं आहे. शिल्पाने अनेक अपयशी गर्भधारणांनंतर सरोगसीचा पर्याय निवडल्याचं शिल्पाने एका मुलाखतीमध्ये सांगितलं होतं.
शाहरुख खान : शाहरुखने मुलगा अबरामच्या जन्माची बातमी देऊन सगळ्यांना आश्चर्याचा धक्का दिला होता. वयाच्या पन्नाशीनंतर शाहरुख सरोगसीच्या माध्यमातून अबरामचा पिता बनल्याने अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं होतं.
सनी लिओनी : एका दत्तक मुलीची आई बनल्यानंतर सनी लिओनी सरोगसीच्या माध्यमातून जुळ्या मुलांची आई बनली आहे.
श्रेयस तळपदे : मराठमोळा अभिनेता श्रेयस तळपदे आणि पत्नी दीप्ती सरोगसीच्या माध्यमातून मुलीचे पालक बनले आहेत.
आमीर खान : आमीर खान – किरण राव या जोडीचा मुलगा आझाद खान रावचा जन्मही सरोगसीने झाला आहे.
करण जोहर : निर्माता करण जोहरही सरोगसीच्या माध्यमातून सिंगल पॅरेंट बनला आहे. यश आणि रुही अशी त्याच्या मुलांची नावं आहे.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.