नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
साधरणत: कोणत्याही सिनेमाचा फॉर्मॅट हिरो, हिरॉईन, व्हिलन असा असतो. या तिघांभोवतीच मुख्य कथानक फिरत असतं. अशा वेळी ताटात असलेल्या लोणच्या प्रमाणेच साईड अॅक्टर सिनेमाला वेगळीच चव आणतात. अनेक व्यक्तिरेखा वाटताना साध्या वाटतात. पण कलाकाराच्या टॅलेंटने ही व्यक्तिरेखा एका वेगळ्याच उंचीवर पोहोचते.
बॉलिवूड सिनेमांनीही अशा काही अतरंगी व्यक्तिरेखा प्रेक्षकांना दिल्या आहेत, ज्यानी पैसा वसून मनोरंजन केलं आहे. पाहुयात कोण कोण आहेत हे कलाकार –
व्हायरस ( बोमन इरानी ) – थ्री इडियट्स हा सिनेमा कोणाला आवडत नाही. कमाल कथानक आणि उत्तम अभिनय यामुळे हा सिनेमा आजही कित्येकांचा लाडका आहे. यातील अनेक व्यक्तिरेखांमध्ये व्हायरस – वी. रु . सहस्त्रबुद्धे ही व्यक्तिरेखा खास गाजली. अभिनेते बोमन इराणी यांचं या भूमिकेसाठी कौतुक झालं.
गणेश ( विजय राज ) – अभिषेक बच्चनचा रन सिनेमा फारसा प्रभाव पाडू शकला नाही. पण हा सिनेमा लक्षात राहिला तो कौव्वा बिर्याणीच्या सीनमुळे. या सिनेमातील विजय यांची अॅक्टींग प्रेक्षकांचं खास मनोरंजन करुन गेली.
पांडुरंग ( गोलमाल ) – या व्यक्तिरेखेने गोलमाल या विनोदी सिनेमाला आणखी मजेदार तडका लावला. व्रजेश हिरजीनेही व्यक्तिरेखा साकारली होती. त्याच्या अतरंगी अभिनयाने प्रेक्षकांच्या पसंतीची पावती मिळवली.
सर्किट ( मुन्नाभाई एम. बी. बी. एस )- मुन्नाची गोष्ट सर्किटशिवाय अपुर्ण आहे असं म्हटलं तर चुकिचं होणार नाही. अर्शद वारसीने ही व्यक्तिरेखा इतकी उत्तम साकारली की त्याच्याशिवाय दुस-या कोणत्या सर्किटची कल्पनाच करवत नाही.
आखरी पास्ता ( हाऊसफुल 4) – चंकी पांडेंचा अभिनय कायमच हास्याचे चौकार घेतो. हाऊसफुल 4 मधील आखरी पास्ता ही व्यक्तिरेखा प्रेक्षकांना खास आवडली.
बाबूलाल ( बाजीगर) – या यादीत थोडं मागं गेलं तर बाबूलाल ही व्यक्तिरेखा आठवते. ही व्यक्तिरेखा जॉनी लिवर यांनी साकारली. सतत विसरणारा, कामात काहीना काही गोंधळ घालून ठेवणारा बाबूलाल यावेळी प्रेक्षकांना हसवून गेला.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.