अँ’टी क’रप्शन क’म्प्लेंट (ला’चेची त’क्रार) ऑनलाईन कशी करावी ।। ऑनलाइन त’क्रार करण्याआधी कोणत्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे?।। पदाचा दुरू’पयोग ।। त’क्रार कुठे नोंदवता येईल? तक्रा’रदार राहतो त्या ठिकाणी की आ’रोपी लोकसेवक काम करतो त्या ठिकाणी? या सर्व गोष्टींची उपयुक्त माहिती !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो, जर ऑनलाईन ला’चलुचपत प्रतिबंधक कार्यालयाकडे स’रकारी अधि’काऱ्याविरुद्ध त’क्रार नोंदवायची असेल तर ती कशी नोंदवायची? याबाबत ही सविस्तर माहिती आहे. मित्रांनो ऑनलाइन ला’चलुचपत प्र’तिबंधक कार्यालयाने तक्रार नोंदवण्यासाठी वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे.

त्या वेबसाईट वरती आपल्याला ऑनलाईन तक्रार करता येते. आता आपण पाहू या ऑनलाइन लाचलुचपत प्रतिबंध कार्यालयाकडे ऑनलाईन सविस्तर त’क्रार कशी करायची? मित्रांनो ऑनलाइन त’क्रार करण्याआधी काही गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे.

1)सापळा रक्कम कुणाकडून पुरविली जाते? – सापळा रक्कम त’क्रार दाराकडून पुरविली जाते. 2)कोणत्या गु’न्ह्याचा तपास ए’सीबी कार्यालयामार्फत केला जातो? – शासकीय नोकराने ला’चेची मागणी, ला’च स्वीकारणे, ला’च देणे, अपसं’पदा व पदाचा दु’रुपयोग करून भ्र’ष्टाचार या गु’न्ह्याचा तपास एसीबी कार्यालयामार्फत केला जातो.

3)अपसं’पदा म्हणजे काय? – शासकीय नोकराने भ्र’ष्टाचारामार्फत मोठ्या प्रमाणात स्वतःची नावे किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीकडे पद धारण करण्याच्या कालावधीतील कोणत्याही वेळी समाधानकारक हिशोब देऊ शकणार नाही अशा आर्थिक साधनसंपत्तीचा किंवा त्याच्या ज्ञात साधनाचा विसंगत प्रमाणात मालमत्ता जमवणे याला अपसंपदा म्हणतात.

4)त’क्रारदार कोणाविरुद्ध ला’चेची मागणी संदर्भात त’क्रार देऊ शकतो? -लोकसेवक किंवा खाजगी इसम, जे लोक सेवकाच्या वतीने ला’चेची मागणी करेल व स्विकारेल त्याच्याविरूद्ध त’क्रार देऊ शकतो. 5)ला’चेच्या मागणी संदर्भात त’क्रार कोणत्याही लोकसेवक का विरुद्ध देता येते का? – ज्या लोकसेवकाकडे त’क्रारदाराचे का’यदेशीर काम प्रलंबित आहे, अशा लोकसेवक का विरुद्ध तसेच त्याच्याकडे काम प्रलंबित नसतानाही स्वतःच्या फायद्यासाठी पदाचा दुरुपयोग करत असेल अशा लोकसेवक विरुद्ध त’क्रार करता येते.

6)सापळा कारवाई म्हणजे काय? – लाचेची मागणी, ला’च स्वीकारताना व देताना एसीबी मार्फत सरकारी नोकरास रंगेहात पकडणे. 7)सापळा रक्कम त’क्रारदारास परत मिळते का? – होय. सापळा रक्कम त’क्रारदारास लवकरात लवकर परत मिळते. 8)लाचेच्या मागणीची त’क्रार केव्हा देता येते? – सरकारी नोकराकडून का’यदेशीर काम करण्याकरता तसेच का’यदेशीर काम न करण्याकरता पैशाची मागणी होत असेल तेव्हा त’क्रार करता येते.

9)सापळा कारवाई करिता त’क्रारदारास एसीबी कार्यालयात हजर राहावे लागते का? – होय. सापळा कारवाई दरम्यान तक्रारदारास प्रत्यक्ष हजर राहावे लागते. 10)एसीबी कार्यालयाची वेबसाईट कोणती आहे? – वेबसाईट www.acbmaharahtra .gov.in, फेसबुक पेज www.facebook .com/maharashtraACB. 11)त’क्रारदाराची ओळख एसीबी गुप्त ठेवते का? – होय, लाचेचा सापळा वगळता इथं सर्व गु’न्ह्यांची माहिती गु’प्त ठेवली जाते.

12)सापळा कारवाईनंतर आरोपी लोक सेवकाकडून त’क्रारदारास ध’मकी प्राप्त होत असल्यास? -एसीबी मार्फत आ’रोपीविरुद्ध पु’रावे जमा करून आ’रोपी लोक सेवकाच्या जामीन रद्द होण्याकरिता न्या’यालयास विनंती केली जाते. 13)ला’चलुचपत विभागात खाजगी व्यक्ती समाविष्ट होऊ शकतो का? – नाही, भ्र’ष्ट अधिकाऱ्याची महिती कुणीही एसीबी कडे देऊ शकतो. 14)प्रत्येक जिल्ह्यात एसीबी कार्यालय उपलब्ध आहे काय? – होय.

15)त’क्रार कुठे नोंदवता येईल? त’क्रारदार राहतो त्या ठिकाणी की आ’रोपी लोकसेवक काम करतो त्या ठिकाणी? – कोठेही,1064 क्रमांक द्वारे. 16)एसीबी कोणाच्या देखरेखीखाली काम करते? -महासंचालक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, महाराष्ट्र राज्य, मुंबई. 17)त’क्रारदारांना पैशांच्या रकमेच्या स्वरूपात एसीबी कडुन बक्षीस दिले जाते का? – अपसंपदेच्या गु’न्ह्यामध्ये त’क्रारदारांना बक्षीस देण्याची तरतूद आहे.

18)त’क्रार नोंदविण्या करिता कोणता टोल फ्री क्रमांक उपलब्ध आहे का? – होय,1064 व 1800 222 021. 19)त’क्रार कशी नोंदविता येते? – वेबसाईट मार्फत, फेसबुक पेज मार्फत, मोबाईल ॲप्स मार्फत, टोल फ्री क्रमांक1064, लेखी अर्ज तसेच ला’चेची त’क्रार देण्याकरिता तक्रारदाराने स्वतः ऐसीबी कार्यालयात हजर राहणे गरजेचे आहे.

20)सापळा कारवाईनंतरही फिर्यादीचे काम प्रलंबित राहिल्यास एसीबी मार्फत कोणती पावले उचलली जातात? – एसीबी मार्फत संबंधित कार्यालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे का’यदेशीर काम पूर्ण होण्याकरिता पाठपुरावा केला जातो. 21)अपसंपदा प्रकरणांमध्ये आ’रोपीच्या मालमत्तेचे पुढे काय होते? – अपसंपदा प्रकरणांमध्ये गु’न्हा नोंदविल्यानंतर मा. न्या’यालयाद्वारे लोकसेवकाची मालमत्ता गोठविलली जाते.

22)गु’न्हा दाखल झाल्यावर त’क्रारदारास न्या’यालयात हजर रहावे लागते का? – न्या’यालयीन प्रक्रियेदरम्यान न्या’यालयात सा’क्षीकामी हजर राहणे आवश्यक असते. 23)अपसंपदा संदर्भात त’क्रार कोणत्याही लोकसेवका विरुद्ध देता येते का? – होय. ज्या लोकसेवकाने भ्र’ष्टाचारा मार्फत मोठ्या प्रमाणात स्वतःची नावे किंवा त्याच्या वतीने कोणत्याही व्यक्तीकडे पद धारण करण्याच्या कालावधीतील कोणत्याही वेळी तो समाधानकारक हिशोब देऊ शकणार नाही.

अशा आर्थिक साधनसंपत्तीच्या किंवा त्याच्या प्राप्तीचा ज्ञात साधनाच्या विसंगत प्रमाणात मालमत्ता जमवलेली आहे, अशा लोकसेवका विरुद्ध करता येते. 24)ऑनलाइन त’क्रार नोंदवण्याची सुविधा उपलब्ध आहे का? – होय.www.acbmaharashtra. gov.in वरील complant या सदराखाली व www.facebook .com./maharashtraACB या फेसबुक पेजवर lodge a complaint या सदराखाली.

25)लोकसेवकांनी घटनास्थळीच लाचेची मागणी केली किंवा लाच स्वीकारली तर एसीबी काय कारवाई करील?(उदा. रेल्वे टीसी, ट्राफिक पो’लीस, महानगरपालिकेचे नाका कर्मचारी, को’र्ट कर्मचारी त्यांच्याकडून श’पथपत्र दाखल करण्यासाठी ई.) – अशा ला’चेच्या घटनांची माहितीबाबत मोबाईल/ कॅमेरा मध्ये ऑडिओ/ व्हिडिओ टिपून घेऊन ती एसीबी ची वेबसाईट acbmaharashtra या mobile app वरील complant panel मधून पोस्ट करावी.

26)मुद्दा क्रमांक 25 मध्ये नमूद केलेल्या घटनांवर आळा बसण्यासाठी व त्यात प्रतिबंध करण्यासाठी एसीबी काय पावले उचलत आहे? तसेच त्याकरीता एसीबीला जनतेकडून कोणत्या कार्याची अपेक्षा आहे? – होय. लाचेच्या घटनांची माहितीबाबत मोबाईल/ कॅमेरा मध्ये ऑडिओ/ व्हिडिओ टिपून घेऊन

ती एसीबीचे www.acbmaharashtra.net या mobile app वरील complant panel मधून पोस्ट करावी. मित्रांनो तुमच्या मोबाईल मध्ये कोणताही ब्राउजर असेल त्या ब्राउझर ला ओपन करायचं आहे. एसीबी महाराष्ट्र टाईप करून गूगल वरती सर्च करायचे आहे. गूगल वरती सर्च केल्यानंतर तुम्हाला जी पहिली वेबसाईट दिसेल या वेबसाइटला तुम्हाला ओपन करायचे आहे.

त्याच्यानंतर तुम्हाला ऑनलाईन तक्रार हा ऑप्शन दिसेल त्या ऑप्शन वरती तुम्हाला ऑनलाईन त’क्रार करण्यासाठी क्लिक करायचे आहे. तक्रार नोंदविण्यासाठी तुमच्या समोर तीन पर्याय असतील त्यापैकी पहिला पर्याय आहे, लाचेच्या मागणीची तक्रार, दुसरा आहे अपसंपदेची तक्रार, तिसरा आहे पदाचा दुरुपयोग.

तुमची तक्रार जी असेल त्यात पर्यायावरती तुम्हाला क्लिक करायचे आहे. ज्याची तक्रार करायची असेल ती कशी करायची त्याची माहिती पाहूया. पहिल्या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचे आहे मग तुम्हाला डायलॉग बॉक्स दिसून येईल नंतर always show वरती क्लिक करायचं.

त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर लाचेच्या मागणीसंदर्भात तक्रार करायचा अर्ज दिसेल मग तक्रार धारकांनी तो अर्ज स्वतः भरायचा आहे, त्यावरती तुमचे नाव टाकायचे आहे.याच्यानंतर तुम्हाला तुमचा दहा आकडी मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्याच्यानंतर लोकसेवकाचा तपशील टाकायचा आहे.

लोकसेवकाची माहिती,नाव टाकायचे आहे. तुम्हाला लाचेची रक्कम टाकायची आहेत. ज्या जिल्ह्यात तक्रार नोंदवायची आहे ते टाकायचे आहे. तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील पुरावा जो काही असेल व्हिडिओ, ऑडिओ तो टाकायचा आहे.फाईल मध्ये अनेक फोटो किंवा अनेक व्हिडीओ तुम्ही पुरावा म्हणून टाकू शकता.

त्याच्यानंतर तुम्हाला तक्रार नोंदवा म्हणून हा पर्याय दिसेल. त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आहे,त्याच्यानंतर आम्ही लवकरात लवकर कारवाई करू असा तुम्हाला मेसेज येईल. अशाकारे तुम्ही तक्रार नोंदवू शकता. त्यानंतर आपल्या अपसंपतेची तक्रार करण्यासाठी तुम्ही अपसंपदा या ऑप्शन वर क्लिक करू शकता.

मग तुम्हाला समोर फॉर्म ओपन होईल, तुम्हाला तो भरायचा आहे. त्यानंतर तुम्ही तक्रार नोंदवा या ऑप्शन वरती क्लिक करून तक्रार नोंदवू शकता. अगोदर भरलेल्या माहितीप्रमाणे इथे ही आपण अपसंपदेची माहिती भरायची आहे. त्यानंतर पदाचा दुरुपयोग एखाद्या अधिकाऱ्यांनी केला असेल तर त्याची तुम्ही तक्रार नोंदवू शकता.

पदाचा दुरुपयोग यावरती क्लिक करायचे आहे मग तुम्हाला पदाचा दुरुपयोग संबंधित तक्रार करायचा अर्ज तुमच्यासमोर येईल, त्याचप्रमाणे तो फॉर्म भरायचा आहे. पूर्ण अर्ज भरून तक्रार नोंदवा या बटन वर क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुम्हाला मेसेज दिसेल.

आम्ही याबाबतीत लवकरात लवकर कारवाई करू. तर मित्रांनो, अशाप्रकारे तुम्ही ऑनलाइन तक्रार नोंदवू शकता. ही तक्रार नोंदविण्यासाठी तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च येत नाही. धन्यवाद. (वरील माहिती www.youtube.com/techwithrahul या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे).

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती हीसध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “अँ’टी क’रप्शन क’म्प्लेंट (ला’चेची त’क्रार) ऑनलाईन कशी करावी ।। ऑनलाइन त’क्रार करण्याआधी कोणत्या गोष्टी माहिती असणे आवश्यक आहे?।। पदाचा दुरू’पयोग ।। त’क्रार कुठे नोंदवता येईल? तक्रा’रदार राहतो त्या ठिकाणी की आ’रोपी लोकसेवक काम करतो त्या ठिकाणी? या सर्व गोष्टींची उपयुक्त माहिती !

Comments are closed.