हेल्थ इन्शुरन्स काढताना घ्या ही काळजी. अन्यथा क्लेम सेलटमेंट वेळी येतील अडचणी.

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

व्यक्तीच्या आयुष्यात कोणतीही अडचण सांगून येत नाही. आजकालच्या धकाधकीच्या आयुष्यात लोकांचा फास्ट फूड कडे वाढलेला कल कित्येक आजारांना निमंत्रण देत आहे. मागील काही वर्षात भारतीयांचे वाढत्या आजारामुळे दवाखाने आणि मेडिकलचा खर्च वाढत चाललेला आहे. आशयामध्ये जर आपल्याकडे हेल्थ इन्शुरन्स नसेल तर काही दिवसांचा दवाखान्यातील मुक्काम देखील खिशाला कात्री मारणारा ठरतो. कोरोनाकाळात भारतात भरपूर हेल्थ इन्शुरन्स विकले गेले. लोकांना इन्शुरन्स चे महत्व लक्षात आले. काही लोकांनी पॉलिसी स्वस्त आहे म्हणून तर काही लोकांनी मित्र सगतोय म्हणून इन्शुरन्स काढून घेतला. कित्येक लोकांनी पॉलिसीचे नियम, अटी न वाचताच विमा उतरवला. ही बाब पुढे खूप त्रासदायक ठरू शकते. कित्येक लोकांना या गोष्टीमुळे आपल्या इन्शुरन्स  क्लेमला मुकावे लागते. त्यामुळे कोणताही हेल्थ इन्शुरन्स  घेण्यापूर्वी काही महत्वाच्या गोष्टी माहीत करून घेणे खूप आवश्यक आहे. चला तर मग जाणून घेऊया पॉलिसी घेतेवेळी कोणत्या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

क्लेम सेटलमेंट : हेल्थ अथवा अन्य कोणताही इन्शुरन्स खरेदी करताना सर्वात अगोदर त्या इन्शुरन्स कंपनीच्या क्लेम सेटलमेंट टक्केवारीकडे पाहणे आवश्यक आसते. क्लेम सेटलमेंट टक्केवारी म्हणजे १०० पैकी किती क्लेम कंपनीने मंजूर केले याबाबतची माहिती. जर कंपनीची क्लेम सेटलमेंट टक्केवारी कमी असेल तर अश्या कंपनी पासून दूर राहिलेले फायदेशीर ठरते. अश्या इन्शुरन्स कंपनी क्लेम सेटलमेंटच्या वेळी वेगवेगळे कारण सांगत ग्राहकांचे क्लेम रिजेक्ट करतात. त्यामुळे आपण इन्शुरन्स घेते वेळी कंपनी कडे क्लेम सेटलमेंटच्या टक्केवारी बाबत माहिती विचारली पाहिजे, पुढे ती माहिती इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माध्यमांद्वारे तपासून घेतली पाहिजे.

वेटिंग पिरीयड : इन्शुरन्स खरेदी करताना आपल्या पॉलिसी मध्ये नमूद केलेला वेटिंग पिरीयड तपासून घेणे अत्यंत गरजेचे असते. पॉलिसी काढल्यानंतर किती दिवसांनी ती क्लेम साठी पात्र ठरते याबाबत माहिती असणे गरजेचे आहे. तसेच पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी असलेले आजार पॉलिसी मध्ये किती काळानंतर कव्हर होतात याबाबत सर्व माहिती पॉलिसी खरेदी करण्यापूर्वीच समजून घ्यावी, जेणेकरून भविष्यात क्लेम सेटलमेंटच्या वेळी आपल्याला कोणताही अडथळा येणार नाही.

पॉलिसी प्रीमियम आणि कव्हर : बरेच लोक इन्शुरन्स खरेदी करते वेळी पॉलिसी स्वस्त आहे म्हणून कुठचाही विचार न करता ती खरेदी करतात. परंतु असे करणे पुढे आर्थिक खर्चाचे कारण ठरू शकते. त्यामुळे पॉलिसीचे प्रीमियम आणि पॉलिसी कव्हर तपासून पाहणे आवश्यक ठरते. पॉलिसी कव्हर अधिक असेल तर दवाखान्याचा अधिक खर्च झाल्यास उर्वरित रक्कम आपल्या खिशातून देण्याचा आवश्यकता नसते.

कॅशलेस सुविधा : सध्या बर्‍याच इन्शुरन्स कंपनी कॅशलेस सुविधा पुरवतात. याचा अर्थ असा की दवाखान्यात झालेला खर्च आपल्याला आपल्या खिशातून देण्याची आवश्यकता नसते. इन्शुरन्स कंपनी स्वतः हॉस्पिटलची पेमेंट करतात. काही इन्शुरन्स कंपन्या पॉलिसी होल्डरच्या अकाऊंट मध्ये पैसे जमा करतात. हॉस्पिटल मध्ये किती खर्च होईल, त्या घडीला आपल्याकडे पैसे आसतीलच असे नाही. अश्या वेळेला इन्शुरन्स असून देखील इतरांसमोर हात पसरण्याची वेळ येऊ शकते, कारण इन्शुरन्सचा क्लेम उशिरा मिळत असतो. यामुळे इन्शुरन्स पॉलिसी खरेदी करण्यापूर्वी कंपनी कॅशलेस सुविधा देत असेल तर प्राधान्य देणे फायद्याचे ठरू शकते.

इन्शुरन्स मध्ये समाविष्ट होत नाही या गोष्टी : आपण इन्शुरन्स घेतो तेंव्हा प्रत्येक वेळी क्लेम सेटल होईलच असे नाही. बहुतांश इन्शुरन्स कंपन्या खलील प्रकरणांमध्ये इन्शुरन्स क्लेम रिजेक्ट करतात. त्यामुळे या गोष्टी ध्यानात ठेवा;

  • भांडणात झालेल्या दुखापती आणि त्यावरील उपचारासाठी इन्शुरन्स कंपनी क्लेम नाकारू शकतात.
  • चश्मा, नकली दात, हियरिंग डिव्हाईस ई. गोष्टींचा खर्च इन्शुरन्स कंपनी देत नाही
  • दातांशी संबंधित क्लेम हेल्थ इन्शुरन्स मध्ये समाविष्ट नसतात, त्यामुळे कंपन्या दातांसंबंधी क्लेम नाकारू शकतात. दातांसंबंधी इन्शुरन्स साठी बर्‍याच कंपनी वेगळी पॉलिसी विकतात.
  • भारतात घेतलेले हेल्थ इन्शुरन्स भारतामध्ये होणार असलेल्या उपचारांचा खर्च देते, त्यामुळे भारताबाहेर उपचार घेण्याची आवश्यकता असल्यास इन्शुरन्स क्लेमच्या भरोश्यावर अवलंबून राहू नका.

अटी, शर्ती वाचा : इन्शुरन्स पॉलिसी तेंव्हाच आपला आर्थिक फायदा करू शकते जेंव्हा आपण त्या पॉलिसीच्या सर्व अटी आणि शर्ती वाचून घेता. प्रत्येक इन्शुरन्स पॉलिसीच्या वेगवेगळ्या अटी, शर्ती असतात. क्लेम सेटलमेंटच्या वेळी कोणताही अडथळा टाळायचा असेल तर अटी, शर्ती वाचून घेणे फायद्याचे ठरते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा