नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
सोशल मिडियावर प्रत्येकाला आपली कला दाखवण्याचा नवा मार्ग टिक टॉकमुळे मिळाला. या चिनी अॅपने ज्याला त्याला वेड लावलं. शॉर्ट व्हिडियो कंटेट बनवणा-या या अॅपने अनेक इनफ्लूएंसर बनवले.
गल्लोगल्ली टिकटॉकवर रुबाबात मिरवणारे कलाकार तयार झाले. कधी कौतुक तर कधी ट्रोलिंग या लोकांच्या वाट्याला आले. पण चिन विरोधातील मोहिमेने टिक टॉक बंद केलं. मग आला इन्स्टा रील्सचा ट्रेंड. जगभरात प्रसिद्ध करणा-या या रिल्सनी एक नवाच ट्रेंड सुरु केला.
आज इन्स्टाग्राम उघडलं की उघडलं रील्सचा पाऊस पडतो. अनेक गाण्यावर दमदार नृत्य करणारे, डायलॉग्जवर रील्स बनवणारे कायम दिसतात. पण याच रिल्सनी अनेकांना चंदेरी दुनियेचा दरवाजा उघडला आहे. पुढील कलाकार रील्स बनवून स्टारपदी विराजमान झाले आहेत. तुमचे लाडके स्टार कोण आवर्जून सांगा
सुरज चव्हाण : बॅण्ड इज बॅण्ड म्हणत सुरज चव्हाणने त्याचा एक ब्रॅण्ड सुरु केला. बोबडे उच्चार, यथातथा लूक पण हटके आणि विनोदी अंदाज यामुळे सुरज प्रेक्षकांच्या मनात भरला. सुरजचा आता रुपेरी पडद्यावरचा प्रवास आता सुरु होणार आहे. ‘का रं देवा’ असं या सिनेमाचं नाव आहे. एकंदरीत सुरजला त्याच्या व्यंगाने का होईना चंदेरी दुनियेत नेलं आहे.
सोनाली पाटील : कोल्हापुरी ठसका आणि लोभस एक्सप्रेशन्सने सोनालीने प्रेक्षकांच्या मनात घर केलं. त्यानंतर वैजू नं 1, देवमाणूस मालिका आणि बिग बॉस या शोमधून सोनाली घराघरात पोहोचली आहे. सोनालीच्या रिल्सचे चाहतेही अनेक आहेत.
शिवांजली पोरजे: गोड एक्सप्रेशन देणारी शिवांजलीचे चाहते अनेक आहेत. शिवांजलीने गोड लूक्सनी अनेकांना प्रेमात पाडलं होतं. शिवांजली अलीकडेच ‘कारभारी लयभारी’ मालिकेत दिसली होती. त्यावेळी तिच्या अदाकारीने प्रेक्षकांची मनं जिंकली.
मायरा वैकुळ : ‘माझी तुझी रेशीम गाठ’ मालिकेतील मायरा वैकुळ म्हणजेच परी कोणाला आवडत नाही. सोशल मिडियावर गोड गोड एक्सप्रेशन्सने मायरा खुपच लोकप्रिय बनली आहे. निरागस दिसणं आणि गोड हसणं यामुळे मायराने परीची व्यक्तिरेखा अगदी सहज साकारली आहे.
विकास पाठक : या सोशल मिडिया स्टारला तुम्ही या नावाने ओळखत नसाल. कारण याला आपण सगळेच हिंदुस्थानी भाऊ म्हणून ओळखतो. हिंदुस्थानी भाऊच्या व्हिडियोची लोकप्रियता एवढी वाढली की त्याला थेट हिंदी बिग बॉसमध्ये एंट्री मिळाली.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.