रिलीज होण्यापुर्वीच वादामुळे प्रकाशझोतात आले होते हे मराठी सिनेमे ! जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

मनोरंजन

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

कोणतीही कलाकृती खरं पाहता रसिकांनी निखळ आनंद घेण्यासाठी बनवलेली असते. प्रत्येक कलाकृतीमागे एखादा संदेश असतो. अनेकदा कलेच्या माध्यमातून समाजाच्या डोळ्यात अंजन घातलं जातं. तर त्यातूनच एक नवा दृष्टीकोन, नवा पैलू समाजासमोर आणला जातो. कलाकाराचं त्याच्या कलाकृतीवर पुत्रवत प्रेम असतं असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही.

कारण कोणतीही कला निर्माण करताना त्यावर कलाकाराचा हात अनेकदा फिरला असतो. त्या गोष्टीला त्याने अनेकदा वेगवेगळ्या पैलूतून पाहिलं असतं.सिनेमा सारख्या कलाकृतीमध्ये तर अनेक व्यक्ती समाविष्ट असतात. सिनेमा बनवताना त्यात अनेक हात राबत असतात.

समाजाचा आरसा समाजाला दाखवण्याचं काम सिनेमा करतो असं नेहमी म्हटलं जातं. पण काही सिनेमे समाजाच्या वर्मावर बोट ठेवतात आणि मग सुरु होतो वादाचा नवा सिलसिला. मराठी सिनेमांच्या मागेही अनेकदा वादाचं ग्रहण लागलं आहे. नुकतंच एका सिनेमातील आक्षेपार्ह दृश्यावरुन वाद निर्माण झाला होता. हा वाद संपला असला तरी यापुर्वीही पुढील सिनेमांना वादाला तोंड द्यावं लागलं आहे.

वरण भात लोन्चा, कोण नाय कोन्चा– क्राईम थ्रिलर जॉनर असलेल्या या सिनेमाचा वाद मागील काही दिवसांपासून चर्चेत होता. अल्पवयीन मुलगा आणि महिला कलाकार यांच्यातील बोल्ड दृश्यावर अनेकांनी आक्षेप घेतला होता. यावर महिला आयोगाच्या सुचनेनुसार हा ट्रेलर सर्व प्लॅटफॉर्मवरुन हटवण्यात आला.

NCW objects to trailer of Mahesh Manjrekar's upcoming film Nay Varan Bhat Loncha Kon Koncha | Entertainment News – India TV

अश्लील उद्योग मित्र मंडळ– या सिनेमाच्या प्रमोशनपासून वाद निर्माण झाला होता. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान पुण्यात जागोजागी ‘सविताभाभी तू इथंच थांब’ असं लिहिलेलं पोस्टर लागलं होतं. पण सविता भाभी हे कॉमिक कॅरेक्टर आपलं असल्याचं दावा निलेश गुप्ता यांनी केला होता. याशिवाय या सिनेमाच्या नावावरही ब्राम्हण महासंघाने आक्षेप घेतला होता.

Ashleel Udyog Mitra Mandal Movie Review: A tad confusing coming-of-age story

ठाकरे– मराठी माणसासाठी बहुप्रतिक्षित असा हा सिनेमा होता. या सिनेमात नवाजुद्दीन सिद्दीकीने बाळासाहेबांची भूमिका साकारली होती. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये नवाजुद्दीनचा मूळ आवाज होता. पण यावर प्रेक्षकांनी नाराजी दर्शवल्याने पुन्हा बाळासाहेबांच्या आवाजात चेतन सशिथल यांनी डब केला. यानंतर दिग्दर्शक अभिजीत पानसे यांना प्रमोशनमधूनही डावलल्याची चर्चा सुरु होती.

Thackeray First look: Thackeray First Look Photogallery, Thackeray Wallpapers, Thackeray Pictures

न्युड – अत्यंत वेगळ्या विषयावर बेतलेला मराठी सिनेमा म्हणून या सिनेमाकडे पाहिलं जातं. पण या सिनेमाशीही वाद जोडलेला आहेच. लेखक मनिषा कुलश्रेष्ठा यांनी न्युड हा सिनेमा त्यांच्या कालिंदी या कथेवर बेतला असल्याचा कोर्टात दावा केला होता.

Nude Marathi Film Poster

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.