पत्नीचा तिच्या पतीच्या प्रॉपर्टि वर अधिकार असतो का?।। असेल तर किती असतो?।। अर्धा हिस्सा हा पतीच्या प्रॉपर्टी मध्ये पत्नीचा असतो असे मानले जाते परंतु कायदेशीररित्या हे संपूर्ण सत्य आहे का?।। जाणून घेऊया महत्वाची माहिती !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो, आज आपण माहिती करून घेणार आहोत की, पत्नीचा पतीच्या प्रॉपर्टी वर कशा प्रकारे अधिकार असतो व किती प्रमाणात असतो. कारण की जनसामान्यामध्ये अशा प्रकारची धारणा आहे की, पत्नीचा आपल्या पतीच्या प्रॉपर्टी वर 50 टक्के हिस्सा असतो, म्हणजे जवळजवळ अर्धा हिस्सा हा पतीच्या प्रॉपर्टी मध्ये पत्नीचा असतो.

परंतु कायदेशीररित्या हे संपूर्ण सत्य आहे का? तर याचे उत्तर आहे की, कायदेशीर रित्या हे संपूर्ण सत्य नाही. कारण की अजून पर्यंत असा कोणताही कायदा नाही की पत्नीचा आपल्या पतीच्या प्रॉपर्टी वरती 50 टक्के हिस्सा हा प्रस्थापित होईल. हो, मात्र हेही सत्य आहे की, जर पती-पत्नी हे वेगळे राहत असतील.

एकमेकांपासून पती-पत्नी वेगळे राहत असेल, किंवा त्यांचा घटस्फोट झाला असेल तर मात्र पत्नी पतीकडून हिंदू विवाह कायदा कलम 24 व 25 नुसार मेन्टेनन्स मनी घेऊ शकते. त्यालाच आपण मराठीमध्ये खाओटी किंवा पोटगी असे म्हणतो. आता मेंटेनन्स मनी हा जो असतो तो पत्नीच्या निर्वाह किंवा भरण-पोषण यासाठी प्रत्येक महिन्याला कोर्टाने ठरवून दिलेली एक रक्कम असते

जी रक्कम पतीने पत्नीला दर महिन्याला द्यायचे असते अल्युमिनी जर असेल तर अशावेळी दोघांमध्ये म्युच्युअल डिवोर्स झालेला असतो. अशावेळी वन टाइम सेटलमेंट केली जाते असे असताना पत्नीला एकाच वेळेला एक ठराविक रक्कम दिली जाते. जसे दोन लाख, चार लाख, पाच लाख किंवा एक कोटी अशी जी काही असेल,

ती रक्कम एकाच वेळी पत्नीला दिली जाते व सेटलमेंट करून म्युच्युअल डिवोर्स घेतला जातो. पती द्वारे पत्नी ला जी पोटगी किंवा खाओटी मिळवण्यासाठी पत्नीला कायदेशीर गोष्टी कराव्या लागतात त्या आपण पुढील लेखात बघू.

मित्रांनो, या माहितीमध्ये आपण फक्त जर पती पत्नी एकमेकांपासून दूर असेल, किंवा त्यांचा घटस्फोट झालेला असेल, किंवा त्यांच्या घटस्फोटाची गोष्टही कोर्टापर्यंत गेलेली असेल तर अशा वेळेस पत्नीचा पतीच्या प्रॉपर्टी मध्ये कशाप्रकारे अधिकार असतो याबद्दलची ही संपूर्ण माहिती आहे.

कारण की जर समजा एखाद्या पत्नीचा पती हा जर मृत्यू पावला तर त्याच्या मृत्यूपश्चात पत्नीचा जो पतीच्या प्रॉपर्टी वर अधिकार असतो त्याविषयीची कायदेशीर तरतूद ही वेगळी आहे त्याबद्दल आपण दुसऱ्या लेखात आपण माहिती घेवूत. जर एखाद्या पती-पत्नीमधील कुठल्याही प्रकारची जर भांडण नसेल किंवा हेवा दावा नसेल, त्यांचा संसार सुरळीत चालू असेल तर मित्रांनो पत्नीचा पतीच्या प्रॉपर्टी वर किती अधिकार आहे किंवा नाही अशा काही गोष्टींचा प्रश्न हा उद्भवतच नाही.

तर मित्रांनो, पत्नीचा पतीच्या प्रॉपर्टी वर अधिकार हा कशाप्रकारे असतो? त्याबद्दलचे नियम: १) समजा जर लग्नानंतर पत्नीने स्वतः एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती स्वतः विकत घेतली असेल, त्या संपत्तीचे मुख्य नाव पत्नीच्या नावाने असेल किंवा ती संपत्ती पूर्णपणे तिच्या नावावर असेल तर ती प्रॉपर्टी तिची झाली.

त्या संपत्तीवरती पतीचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसतो. 2)जर समजा, एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती पतीने स्वतः विकत घेतलेली असेल आणि ती संपत्ती त्याच्या स्वतःच्या नावावर जर असेल तर मित्रांनो त्या प्रॉपर्टी वरती पत्नीचा कुठल्याही प्रकारचा अधिकार नसतो.

3)समजा, पत्नीने जर एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती विकत घेतली. प्रॉपर्टी घेण्याकरता चे संपूर्ण पैसे स्वतः जवळचे वापरले मात्र त्या संपत्तीचे मुख्य नाव हे आपल्या पतीच्या नावाने केले असेल, म्हणजेच त्या पत्नीने ती प्रॉपर्टी आपल्या पतीच्या नावे विकत घेतली. अशा कंडिशन मध्ये त्या संपत्तीवरती पूर्ण अधिकार हा पतीचा होतो.

पण मात्र अशी प्रॉपर्टी पत्नीला मिळू शकते. पण ती मिळवण्यासाठी पत्‍नीला दिवाणी खटला दाखल करावा लागतो व पत्नीला हे स्पष्ट करावे लागेल की ही प्रॉपर्टी स्वतः विकत घेतली आहे. समजा ती महिला नोकरी करत असेल किंवा एखादा व्यवसाय करत असेल तर तिने नोकरीतून किंवा त्या व्यवसायामधून जी आवक आहे त्यातून ती प्रॉपर्टी घेतलेली आहे.

हे तिला सिद्ध करावे लागेल किंवा जर तिने ती प्रॉपर्टी घेताना वडिलांकडून मदत घेतली असेल किंवा तिच्या वडिलांनी तिला ती संपत्ती घेऊन दिलेली असेल तर तसं तिला सिद्ध करावं लागेल. त्यांनंतरच सदर मालमत्तेवर पत्नीला हक्क प्रस्थापित करता येईल.

4)जर समजा, एखाद्या पतीने एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती विकत घेतली व संपत्ती घेताना सर्व पैसे हे पती ने लावले आणि प्रॉपर्टीला नाव मात्र पत्नीचे लावले म्हणजे संपत्ती चे मुख्य नाव हे पत्नीच्या नावाने आहेत तर मित्रांनो ही प्रॉपर्टी कुणाची? तर मित्रांनो त्या प्रॉपर्टी वरती संपूर्ण अधिकार हा पत्नीचा होतो म्हणजे साधी गोष्ट आहे की,

प्रॉपर्टी घेताना पैसे कुणीही देवो मात्र त्या संपत्तीचे नाव ही ज्याच्या नावे आहे किंवा ती संपत्ती ज्याच्या नावावर आहे त्याचा त्या प्रॉपर्टीवर अधिकार होतो. अशा घडामोडी मध्ये जर पतीला ती संपत्ती मिळवायची असेल तर पतीला सुद्धा दिवाणी न्यायालयात खटला दाखल करावा लागतो व त्याला सुद्धा कोर्टासमोर सिद्ध करावं लागेल की ही संपत्ती घेताना त्याने स्वतः पूर्ण पैसा लावलेला आहे. जेव्हा कोर्टात हे सिद्ध होईल की ही पूर्ण संपत्ती याची आहे. तेव्हाच पतीचा त्या संपत्तीवर अधिकार सिद्ध होतो.

5)जर समजा एखादी प्रॉपर्टी किंवा संपत्ती पती व पत्नी या दोघांनी मिळून घेतली. ती प्रॉपर्टी घेताना पैसे सुद्धा दोघांनी लावले व त्या प्रॉपर्टी चे नाव सुद्धा दोघांच्या नावे आहे, म्हणजेच ती संपत्ती दोघांच्या नावावर आहे म्हणजे त्या प्रॉपर्टीला जे नाव आहे ते दोघांचे नाव आहे.

तर अशा वेळेस त्या प्रॉपर्टी वरती कुणाचा अधिकार असेल तर मित्रांनो अशा वेळेस त्या प्रॉपर्टीवर ती पती-पत्नी दोघांचाही अधिकार हा सारखाच असतो. मग अशा वेळेस त्या प्रॉपर्टीचे विभाजन कशा पद्धतीने केले जाते? अशी प्रॉपर्टी विकून जो काही पैसा येतो त्या पैशाचे सारखे दोन भाग केले जाते व आपला -आपला हिस्सा प्रत्येकाला दिला जातो. तर अशा प्रकारे पत्नीचा आपल्या पतीच्या प्रॉपर्टी वर कशा प्रकारे अधिकार असतो याबद्दलची ही थोडक्यात माहिती होती.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही सध्याच्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.